गावरान पोरांना कमी समजू नका. भदानाने फक्त युट्युबच्या जोरावर ५० कोटी कमवले..

You tube चा वापर करणाऱ्या लोकांचं एक वेगळं जग आहे. इथं बरेच कंटेंट तयार होतात, उत्तमोत्तम माहिती बघायला ,ऐकायला मिळते. आणि यू ट्यूबवर आपले पर्सनल फेवरेट यूट्युबर्स सुद्धा असतात त्यापैकीच एक म्हणजे अमित भदाना. आज हे नाव क्वचितच कुणाला माहीत असेल. अमित भदाना याने आपली अशी ओळख निर्माण केली आहे की लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच त्याचे चाहते आहेत. तो त्याच्या देसी स्टाइल कॉमेडी व्हिडिओसाठी खूप प्रसिद्ध आहे. अमित भदाना याची स्वतःची वेगळी शैली आहे. त्याची देसी स्टाइल चाहत्यांना खूप आवडते. मनोरंजक आणि मजेदार व्हिडिओंद्वारे आज तो देशातील नंबर वन यूट्यूबर बनला आहे.

आता हा कोण आहे अमित भदाना ? डिटेलमध्ये पाहू.

अमित भदाना मूळचा दिल्लीचा असून त्याचा जन्म ७ सप्टेंबर १९९४ रोजी फरीदाबाद येथे झाला. अमितने दिल्लीतील जोहरीपूर येथील ‘लव्हली बड्स पब्लिक स्कूल’मधून शिक्षण घेतले आहे. शालेय शिक्षणासोबतच ते खेळ आणि मनोरंजनातही निष्णात होता. अमित भदाना यानी दिल्ली विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली आहे.

डबस्मॅश व्हिडिओंमुळे प्रसिद्ध व्हायची संधी चालून आली.

अमित भदाना लहान असतानाच त्याच्या वडिलांचे निधन झाले. मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या त्याच्या आईने त्याला खूप संघर्ष करून वाढवले. मुलाने अभ्यासानंतर चांगली नोकरी करावी, अशी आईची इच्छा होती, पण अमितला शालेय जीवनापासूनच विनोदवीर बनण्याची आवड होती. ग्रॅज्युएशनच्या पहिल्या वर्षांनंतरच्या सुटीत त्याने फेसबुकवर स्वतःचा एक व्हिडिओ डब करून अपलोड केला. काही दिवसांनी मी फेसबुकवर लॉग इन केल्यावर व्हिडिओवर अनेक लाइक्स आणि कमेंट आल्याचे त्याला दिसले.

आपल्या या छोट्याशा यशाने अमित खूप खूश झाला. यादरम्यान मित्रांनीही त्याचे खूप कौतुक केले आणि त्याला असे आणखी व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा दिली. यानंतर त्याने आणखी काही व्हिडिओ बनवले आणि फेसबुकवर अपलोड केले आणि प्रत्येक व्हिडिओला त्याला चांगला प्रतिसाद मिळू लागला. यादरम्यान, ‘बॉर्डर’ चित्रपटाचे संवाद असलेला एक डबस्मॅश फेसबुकवर इतका व्हायरल झाला की त्याला 10 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले. लोकांचा उदंड प्रतिसाद पाहिल्यानंतर, अमितने थोडा चांगला आणि वेगळा कंटेंट बनवण्याचा निर्णय घेतला, जो लोक त्यांच्या कुटुंबासह पाहू शकतात.

त्यानंतर अमित भदाना याने YouTuber होण्याचा निर्णय घेतला. जेव्हा अमितने त्याच्या यूट्यूब करिअरला सुरुवात केली. यादरम्यान घरच्यांनी त्याला हे काम करण्यास वारंवार नकार दिला होता आणि काही चांगलं काम करण्याची सूचनाही केली होती, मात्र अमितने आपले स्वप्न जगण्याचा निर्णय घेतला. 2012 मध्ये त्याने आपल्या स्वप्नाला पंख देण्यासाठी YouTube च्या जगात प्रवेश केला.

अमित भदाना याने 24 ऑक्टोबर 2012 रोजी त्याचे यूट्यूब चॅनल सुरू केले. पण त्याने त्याचा पहिला व्हिडिओ 17 मार्च 2017 रोजी यूट्यूबवर अपलोड केला. वर्षभरातच त्याचे नाणे यूट्यूबवर जमू लागले. गेल्या 5 वर्षात अमित त्याच्या मेहनतीच्या जोरावर भारताचा नंबर वन यूट्यूबर बनला आहे. त्याच्या ‘अमित भदाना’ या यूट्यूब चॅनलवर सध्या 23.6 दशलक्षाहून अधिक सदस्य आहेत. YouTube वरून तो दरवर्षी 4 कोटींहून अधिक कमावतो. सध्या त्यांची एकूण संपत्ती ५० कोटींच्या जवळपास आहे.

हे रेकॉर्ड अमित भदानाच्या नावावर आहेत

2018 मध्ये, अमित भदानाचा एक YouTube व्हिडिओ ‘ग्लोबल टॉप 10 व्हिडिओ’च्या यादीत समाविष्ट करण्यात आला आहे. तसेच सलग 3 दिवस यूट्यूबवर नंबर 1 चॅनल, 1 दिवसात यूट्यूबवर 9 दशलक्ष व्ह्यूजचा रेकॉर्ड, यूट्यूबवर जगभरातील सर्वाधिक ट्रेंडिंग व्हिडिओ, 1 दिवसात फेसबुकवर 7 दशलक्ष व्ह्यूज आणि सर्वाधिक लाइक केलेले व्हिडिओ हा विक्रम त्याच्या नावावर आहे.

अमित भडाणाला 2019 मध्ये भारतातील सर्वोत्कृष्ट YouTuber म्हणून ‘दादा साहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार’ देखील मिळाला आहे. याशिवाय CAMA पुरस्कार सर्वोत्कृष्ट YouTuber (2019), MTV Viral King of the Year (2019), राष्ट्रीय अकादमी पुरस्कार (2018) आणि राष्ट्रीय शिखर पुरस्कार (2018) पुरस्कार मिळाले आहेत. अशा प्रकारे लोकांना चांगला कन्टेन्ट पुरवून अमित आज यू ट्युबचा किंग बनलेला आहे.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.