हिजाब गर्ल मुस्कान विरुद्ध गोल्डविनर बॉक्सर निखत कोणाला जास्त सन्मान मिळाला?

”कधी कधी नातेवाईक किंवा मित्र म्हणायचे की मुलीने असे खेळ खेळू नयेत ज्यात तिला शॉर्ट्स घालावी लागते. पण आम्ही ठरवले होते की  निखतला काहीही हवे असले तरी तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही सदैव तिच्या पाठीशी उभे राहू आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन ठरली”

वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकणाऱ्या निखत जरीन हिच्या वडिलांची ही प्रतिक्रिया. समाजातून होणारा विरोध डावलून निखतच्या वडिलांनी निखतला बळ दिलं आणि पोरीनं संधीचं सोनं केलं.

मेरी कोम हिच्यानंतर भारताच्या महिला बॉक्सईंगला अजून एक सुपरस्टार निखत जरीन हिच्या रूपाने भेटली आहे.

एवढं सगळं असताना निखतला तिच्या धर्मामुळे प्रश्न हिझाबचे प्रश्न विचारले गेले नसते तर नवलंच. त्यावर निखतने हिजाब घालणे हा प्रत्येकाच्या वयक्तिक इच्छेचा भाग असल्याचं सांगता देशात शांतता आणि सौदार्ह्यचं वातावरण राहावं अशी अशा व्यक्त केली.

हिजाबवरून आपल्या लक्षात येते ती म्हणजे हिझाब विवादाची पोस्टर गर्ल ठरलेली कर्नाटकमधील हिजाब गर्ल मुस्कान खान हिची.

फेब्रुवारीमध्ये कर्नाटकात शाळेत हिजाब घालून येण्यावरून वातावरण पेटलं असताना मुस्कान त्या हिजाब वादाची पोस्टर गर्ल झाली होती. कॉलेजमध्ये हिंदुत्वाद्यानी हिजाब घालून आल्यांनतर आडकाठी करण्यास सुरवात केल्यानंतर मुस्कानने मोठ्या धौर्यने त्या जमावाला सामोरं जात अल्लाहू अकबरच्या घोषणा दिल्या होत्या.

निखतच्या गोल्ड जिंकण्याचं आणि मुस्कानच्या जमावाला धैर्याने सामोरं झाल्याच्या जोरदार चर्चा झाल्या. त्यामुळं एकदा लिस्ट काढली कोणाला लोकांनी किती डोक्यावर घेतलं आणि अवॉर्ड दिले याची.

सुरवात करू मुस्कानपासून. फेब्रुवारीतल्या हिजाब वादानंतर मुस्कानची चर्चा राष्ट्रीय नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचली. मुस्कानचा अनेकांनी सत्कार केला.

जमियत उलेमा ए- हिंद संघटनेनं हिजाब गर्ल मुस्कान हिला ५ लाखांचं रोख पारितोषिक जाहीर केलं होतं. 

त्यानंतर झारखंडमधील अंजुम इब्रार फाउंडेशन या सामाजिक संस्थेने मुस्कान खानला एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केलं होतं. त्यानंतर साझा मंच झारखंड (समाज) फाऊंडेशनने जाहीर केलं की ते दरवर्षी कोणत्याही क्षेत्रात सक्रिय भूमिका बजावणाऱ्या महिलेला फातिमा शेख सावित्री बाई फुले पुरस्कार प्रदान करेल आणि या वर्षासाठी मुस्कानचे नाव पहिल्या पुरस्करसाठी निश्चित करण्यात आलं.

त्यानंतर नंबर लागला मुंबईमधील काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांचा. झिशान सिद्दीकी यांनी मुस्कानच्या घरी जाऊन तिला आयफोन आणि स्मार्टवॉच गिफ्ट केल्याचं सांगण्यात येतं. 

 

त्यानंतर कौतुक करायला पुढे आल्या मालेगावच्या पहिल्या महिला महापौर ताहेरा शेख रशीद. महापौर  ताहेरा शेख रशीद यांनीही शहरातील ‘उर्दू घर’ला मुस्कान खान हिचे नाव देण्याची घोषणा केली.

 त्यानंतर देशभरता तिचा सत्कार होत होता. महाराष्ट्रातील औरंगाबादमध्येही मुस्कानचा सत्कार करण्यात येणार होता मात्र पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी दिली नसल्याने तो कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला.

आता येऊ निखत झरीन हिच्या पुरस्करांकडे. निखत झरीन हिचं ही देशभर कौतुक झालं मात्र त्या कौतुकाचं रूपांतर मानधनात फार कमीच झालं. विशेषतः एकाद्या स्पोर्ट्स प्लेयरला आर्थिक मदतीची किती गरज असते हे आपल्याला माहित असतेच.  

निखत झरीनला मदत करण्यास ना जमियत उलेमा ए- हिंद पुढे आली ना झिशान सिद्दीकी. 

झिशान सिद्दीकीच्या ट्विटर वॉलवर निखतचं अभिनंदन करणारं साधं एक ट्ववीट सुद्धा दिसलं नाही.

तेलंगणा काँग्रेसकडून निखतला ५ लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं. 

त्यानंतर मग तेलंगणाच्या रस्ते बांधकाम मंत्र्यांनी १ लाख रुपयांची मदत जाहीर केली. ते सोडून तिला भरीव अशी अर्थिक मदत झाली नाही. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी निखतला २०१४ मध्ये ५० लाखांची मदत केली होती अशी माहिती निखतच्या वडिलांनी दिली आहे. 

निखत जेव्हा बॉक्सईंगसाठी तयारी करत होती तेव्हा तिला जयतीर्थ उर्फ जेरी राव यांच्यातर्फे इंडियन महिला बॉक्सर्सना मदत केली जाते त्याचा थोडयाफार प्रमाणात फायदा झाला होता.

जयतीर्थ उर्फ जेरी राव हे इम्फासीस या सॉफ्टवेअर कंपनीचे फाउंडर आहेत आणि उजव्या विचारांचे अभ्यासक म्हणून ओळखले जातात.

एवढंच नाही तर भारताच्या पुरुषांच्या बॅडमिंटन टीमने नुकताच थॉमस कप जिंकल्यानंतर स्पोर्ट्स मिनिस्ट्रीकडून संघाला १ कोटीचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं. मात्र जेव्हा स्पोर्टस मिनिस्टर अनुराग ठाकूर यांनी जेव्हा निखतचा सत्कार केला तेव्हा मात्र तिला अशी कोणतीच आर्थिक देण्यात आली नाही.

याआधी खेळाडू जिंकत होते तेव्हा त्यांना पैश्यांबरोबरच जमिनी, त्यांच्या नावाने स्टेडियम अशा घोषणा केल्या जातात मात्र निखताला अजून तरी असं कोणतंच बक्षीस देण्यात आलं नाही.

त्यामुळं देशातलं जे धर्माच्या नावावर दूषित झालेलं वातवरण आहे ती या प्रकारणांत ही घुसला आहे का? हा प्रश्न पुन्हा पुन्हा उभा राहतो.

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.