पुणेकरांना मध्यरात्री पोहे खाण्याची सवय लावली ती नळस्टॉपच्या अमृतेश्वर हॉटेलने.

पोहे…

महाराष्ट्राचा नाष्टा…मुलगी बघायला गेल्यावर, पाहुणे घरी आल्यावर, सासरवाडीला गेल्यावर, माहेरला गेल्यावर सर्वात पहिला काय खायला मिळतं तर पोहे. मात्र पोह्यांच्या बाबतीत पुणे शहराची थोडी वेगळी ओळख आहे. इथं मध्यरात्री भूक लागल्यानंतर पोहे खाल्ले जातात. यात विद्यार्थी, रात्रीची शिफ्ट संपवून घरी जाणारे, नाईट आऊट मरणाऱ्यांच्या सहभाग असतो.  

पुणेकरांना मध्यरात्री, पहाटे पोहे खाण्याची सवय लावली ती अमृतेश्वर हॉटेलने. 

१९७५ मध्ये नळस्टॉपच्या अभिनव चौकात अमृतेश्वर हॉटेल सुरु करण्यात आले.

अनिल आणि सुदाम दिघे या दोघा भावंडानी अमृतेश्वर हॉटेलची सुरुवात केली. दिघे कुटुंबीय मूळचे मुळशी तालुक्यातील कोंढुर- मुठा गावाचे. त्यांचे पूर्वज कामानिम्मित पुणे शहरात आले आणि इथंच स्थायिक झाले.  

अनिल आणि सुदाम दिघे हे बंधू बाणेर येथून पेरू आणून जंगली महाराज रस्ता, डेक्कन परिसरात विकायचे. जंगली महाराज रस्त्यावर आता ज्या ठिकाणी मॅकडोनाल्ड आहे इथं अनिल आणि सुदाम दिघे या भावंडानी जागा भाड्याने घेऊन रसवंती गृह सुरु केले होते. 

८ ते १० वर्ष हे रसवंती गृह चालवल्यानंतर जागा मालकाने जागा मालकाने ती दुसऱ्याला विकली. त्यामुळे  अनिल दिघेंना ती जागा खाली करावी लागली. त्यामुळे १९७४ मध्ये दिघेंनी रसवंती गृह सुरु करण्यासाठी नवीन जागेचा शोध सुरु केला होता. त्यावेळी नळस्टॉप चौक म्हणजे एक प्रकारे पुणे शहराचा शेवटचे टोक समजले जात होते.

पुढे कोथरूड, पौड रोज, वारजे हा भाग तास ग्रामीण भाग म्हणून समजला जात जात होता. अनिल दिघेंना एकाने सांगितले की, अभिनव चौकात एक जागा असून ते विकणार असल्याचे समजले होते. तेव्हा या या भागातील सगळे रस्ते मातीचे होते आणि आजूबाजूला वडाचे झाडे होती.  

तेव्हा अनिल दिघेंनी ही जागा कालेवाल बिल्डरकडून विकत घेतली आणि तिथे १९७५ मध्ये अमृतेश्वर रसवंती गृह सुरु केले.   

दिघेंच मूळ गाव असणाऱ्या कोंढुर- मुठा येथे अमृतेश्वराचे मंदिर आहे त्यावर हे नाव ठेवण्यात आले. पहिले काही दिवस अमृतेश्वर येथे मध्ये फक्त उसाचा रस मिळत होता. मात्र हा व्यवसाय फक्त सिजनल होता. म्हणजे वर्षातील दोन ते तीन महिनेच रस विकला जात होता. त्यामुळे अनिल आणि सुदाम दिघे यांनी अमृतेश्वर मध्ये चहा विकायला सुरुवात केली होती. आजूबाजूला खूप कमी हॉटेल होते. त्यामुळे लोकांची वाढू लागली होती.  

दिघे हे दिवसभर काम करून रात्री हॉटेल मध्येच राहत होते. 

नळस्टॉपच्या आजूबाजूला फिल्म इन्स्टीट्युट ऑफ इंडिया (FTII), लॉ कॉलेज, सिम्बॉयोसिस कॉलेजे  बीएमसीसी, फर्ग्युसन कॉलेजच्या हॉस्टेल मध्ये राहणारे काही विद्यार्थी नाटकाची रियसल करायचे, परीक्षेच्या वेळी रात्रभर अभ्यास करून कुठे काही खायला मिळत का म्हणून शोध घेत फिरायचे.       

अमृतेश्वर मध्ये चहाबरोबर खारी आणि क्रीम रोल मिळू लागली होती. हॉस्टेल मध्ये राहणाऱ्या मुलांना माहित होते की, हॉटेलचे मालक आणि कामगार मध्येच राहत असल्याचे माहित होते. त्यामुळे होस्टेलचे मुलं भल्या पहाटे अमृतेश्वर येऊन दार वाजवायचे आणि खायला काही आहे का असे विचारायचे. यामुळे अनिल दिघेंनी अमृतेश्वर हॉटेल सकाळी ७ ऐवजी पहाटे ५ वाजता उघडायला सुरुवात केली. 

सकाळी चहा आणि क्रिम खाण्यासाठी विद्यार्थी तर येऊच लागले त्याच बरोबर कामाला जाणारे नागरिक, मुंबईला जाणारे प्रवासी चहा प्यायला थांबू लागले. हळूहळू हॉस्टेलची विद्यार्थी पहाटे ५ ऐवजी ४ वाजता येऊन हॉटेल समोर थांबू लागले होते. हळूहळू मग साडे तीन, मध्यरात्री तीन वाजता हॉटेल उघडले जात होते.    

पचहा बरोबर अजून दुसरं काही  ख्यायला मिळेल का म्हणून हे विद्यार्थी विचारायचे. त्यामुळे १९९० मध्ये चहा, खारी, क्रिम बरोबर वडापाव, कांदा भजी, मिसळपाव सारखे पदार्थ अमृतेश्वर हॉटेल मध्ये मिळू लागले. नंतर १९९१ मध्ये अमृतेश्वर मध्ये पोहे करायला सुरुवात केली.  

रात्री अडीच वाजता द्रोणात दिले जाणारे गरमागरम पोहे ही अमृतेश्वरची खरी ओळख ठरली. 

विद्यार्थ्यांबरोबर आयटी कंपन्यात काम करण्याची रात्रीची शिफ्ट संपल्यानंतर हे कमर्चारी इथं पोहे खायला थांबू लागले. त्याच बरोबर पेपर विक्रेते, दूध टाकणारे, प्रवासाला जाणाऱ्या या सगळ्यांचा अड्डा अमृतेश्वर झाला होता. नेते, अभिनेते सुद्धा अनेकवेळा इथं पोहे खातांना दिसतात. 

अमृतेश्वर हॉटेल जरी दिवसभर सुरु असले तरीही ते ओळखले जाते रात्रींच्या पोह्यासाठी.

आजही रात्री अमृतेश्वर पोहे खाणाऱ्यांपैकी विद्यार्थ्यांची संख्या जास्त असते. परीक्षा काळात सर्वाधिक गर्दी विद्यार्थ्यांची असते. द्रोणात दिले जाणारे गरम पोहे आणि त्यावर मिळणार सांबर गेली ३० वर्ष हे समीकरण सुरु आहे.  

आता अनिल दिघे यांची मुलं सुनील आणि रघुनाथ हे अमृतेश्वर हॉटेल सांभाळतात. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.