अब्दुल कलामांमुळे तो ड्रायव्हर पुढे जावून इतिहासाचा प्राध्यापक बनला.. 

१९८२ चा काळ, डॉक्टर अब्दुल कलाम त्यावेळी हैद्राबादच्या डिफेन्स अॅण्ड रिसर्च लेब्रोरेटरी चे डायरेक्टर होते. या काळात त्यांचा नेहमीच्या ड्रायव्हरला त्यांनी काहीतरी वाचताना पाहिलं. कुतूहल म्हणून ते जवळ गेले.

डॉक्टर अब्दुल कलाम यांचा ड्रायव्हर वर्तमान पत्र आणि इतिहासाची पुस्तके वाचत होता. कलामांनी त्याला विचारलं, हे कधीपासून वाचतोस. कोणत्या विषयात रस आहे. इतिहासाची आवड सांगून तो कलामांसोबत बोलू लागला. डॉ. कलाम म्हणाले

तू शिकायला हवस, प्रयत्न कर. यशस्वी होशील मी आहेच सोबत. 

काथीरेसन अस त्या ड्रायव्हरच नाव.

काथीरेसन १९७९ मध्ये भारतीय लष्करामध्ये सहभागी झाले होते. पुढे त्यांनी हैद्राबाद येथील DRDL मध्ये डॉ. अब्दुल कलाम यांचे चालक आणि सहाय्यक म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं.

काथीरसेन यांच्याबद्दल सांगायचं तर ते त्यांच्या वडिलांच अचानक निधन झालं. पुढे शिकण्याचं स्वप्न अर्ध्यावर सोडून ते लष्करात सामील झाले व विशेष नियुक्तीवर अब्दुल कलाम यांचे ड्रायव्हर देखील झाले.

अब्दुल कलाम यांनी त्यांना जेव्हा वाचताना पाहिल होतं तेव्हा त्यांनी शिक्षणाच्या या अपुर्ण स्वप्नाबद्दल त्यांना सांगितलं होतं. त्यानंतर मात्र अब्दुल कलाम त्यांच्या अभ्यासासाठी त्यांना विशेष रजा देवू लागले.

१९८२ ते १९९२ ते अब्दुल कलाम DRDL चे डायरेक्टर होते.

या दरम्यान सुमारे पाच वर्ष काथीरेसन हे त्यांचे ड्रायव्हर म्हणून काम पहात होते. यानंतर अब्दुल कलाम दिल्लीला गेले आणि काथीरसेन पुन्हा शिक्षणाकडे वळले त्यांनी इतिहास या विषयात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पुर्ण केलं.

मुदराई विद्यापीठात त्यांनी शिक्षण घेण्यास सुरवात केली. आपल्या शिक्षणाकडे लक्ष देता याव म्हणून त्यांनी नोकरी देखील सोडली व पुर्णवेळ आपल्या शिक्षणासाठी त्यानंतर कुटूंबाची ओढाताण पाहूण ते तुरूनवेल्लीच्या मुख्याधिकाऱ्याकडे पर्यवेक्षक म्हणून रुजू झाले. या काळात देखील त्यांनी आपण शिक्षण चालूच ठेवलं. 

पुढे मुदुराई विद्यापीठातूनच त्यांनी Phd च शिक्षण पुर्ण केलं.

अरिंगर सरकारी महिविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू झाले. आज ते याच कॉलेजमध्ये प्राध्यापक आहे. प्राध्यापक झाल्यानंतर त्यांनी अब्दुल कलाम यांच्याशी संपर्क केला होता. ते म्हणतात,

“मी त्यांना एक पत्र पाठवलं होतं व त्यांनी मला दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल आभार मानलं होतं व आज झालेली माझी प्रगती त्यांना सांगितली होती. माझं पत्र वाचून त्यांनी मला पत्र पाठवलं होतं. त्यामध्ये त्यांनी माझं कौतुक केलं होतं. त्यांच पत्र आजही मी जपून ठेवलं आहे.  “

हे ही वाचा. 

Leave A Reply

Your email address will not be published.