भंगारात पडलेलं विमान 100 रुपयांना खरेदी केलं आज त्यातून ती कमावतेय करोडो रुपये…

बऱ्याचदा आपण हे विसरतो की आपल्या जुन्या वस्तू हे देखील कोणाच्या तरी उदरनिर्वाहाचे साधन आहे. आपण घराची रद्दी आपल्या घराची साफसफाई करण्यासाठी भंगार विक्रेत्याला देतो आणि तीच रद्दी भंगारवाल्यांचं घर चालवते. मात्र आज ज्या महिलेचा किस्सा आपण जाणून घेणार आहोत त्या महिलेने भंगार विकत घेऊन घरचा उदरनिर्वाह तर केलाच शिवाय त्यातून करोडोंची कमाईही केली. माणसाला हवे असेल तर मातीतूनही सोने कसे निर्माण करता येते याची ही कथा. ही कथा ब्रिटिश एअरवेजमध्ये काम करणाऱ्या सुझान हार्वेची आहे.

अवघ्या 100 रुपयात विमान खरेदी केले

सुझान हार्वे या महिलेची तिच्या दूरदर्शी विचारसरणीमुळे आज जगभर चर्चा होत आहे. हार्वेने भंगाराचे रूपांतर सोनेरी अंडी देणाऱ्या कोंबडीत केले. खरंतर हार्वेने एक भंगार विमान केवळ 100 रुपयांना विकत घेतले आणि आज ती त्या भंगारातून करोडो रुपये कमवत आहे. हार्वेच्या या दूरदर्शी विचारसरणीला आज जग सलाम करत आहे कारण तिने काय केलं याचा कोणी विचारही केला नसेल.

विमानाने 26 वर्षे सेवा दिली

हार्वेने भंगारातून खरेदी केलेल्या या विमानाने 15 फेब्रुवारी 1994 रोजी ब्रिटिश एअरवेजसाठी पहिले उड्डाण केले. 26 वर्षात 13,398 फ्लाइट्ससह 118,445 तासांमध्ये सुमारे 60 दशलक्ष मैलांचा प्रवास केल्यानंतर, या विमानाने 6 एप्रिल 2020 रोजी मियामी ते हिथ्रोपर्यंतचे शेवटचं उड्डाण केलं. त्याच वर्षी हार्वेने हे विमान विकत घेतले. कोरोनाच्या काळात सेवेतून निवृत्त झाल्यानंतर हे विमान केवळ भंगारात पडून राहिलं. या भंगारात करोडो रुपयांचा खजिना सापडल्याचे हार्वेच्या डोळ्यांना जाणवले. असा विचार करून तिने ते फक्त 1 पौंड म्हणजेच सुमारे 101 रुपयांना विकत घेतले.

भंगारात सडत असलेल्या प्लेनमधून करोडोंची कमाई

खरंतर हार्वेचा विचार होता की ती एका झटक्यात या जंक प्लेनचं रूपांतर भारी काहीतरी करेल. असा विचार करून तिने या विमानाचे आतून नूतनीकरण करण्यासाठी ५ कोटी रुपये खर्च केले. त्यानंतर त्यात एक आलिशान आणि भव्य बार बांधण्यात आला ( आता बार म्हणल्यावर समजून घ्या काय माहोल असेल तिथं ) आज हार्वे या जंक प्लेनच्या मदतीने करोडो रुपये कमवत आहेत.

विमानात पार्ट्या होतात, तासाला १ लाख लागतात

हार्वेचा हा प्लेन बार पार्टी करणाऱ्या लोकांना भाड्याने दिला जातो. 100 रुपयांना विकत घेतलेले हे विमान बार बनवून हार्वे आता येथे पार्टी करणाऱ्यांकडून एका तासासाठी 1 लाख रुपये घेते. विशेष म्हणजे एवढी मोठी रक्कम लोकांना देण्यास काहीच हरकत नाही. ते इथे आनंदाने पैसे उडवतात आणि पार्टी करतात आणि मोक्कार दारू पितात. बसण्यासाठी आरामदायी खुर्च्या, दिवे इत्यादी सर्व गोष्टी या विमानासारख्या बारमध्ये बसवण्यात आले आहेत. पार्टीचा मूड तयार करण्यासाठी सर्वत्र रंगीबेरंगी दिवे लावण्यात आले आहेत. वाढदिवसापासून ते कॉर्पोरेट आणि प्रोडक्ट लॉन्च पार्ट्यांपर्यंत सगळा माहोल इथं असतो.

‘पार्टी प्लेन’ म्हणून प्रसिद्ध झालेल्या या विमानात लोक आता जोरदार पार्टी करतात आणि हार्वे या विमानातून करोडोंची कमाई करत आहेत.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.