हातभट्टीच्या दारूत असा काय माल मिक्स केला जातो की थेट जीवच जातो ?

काल म्हण बाबुरावचा पगार तो झाला
अन इळमाळ दिसभर लै दारू पेला,
वर तंगड्या करून गटारात गेला
तोंड वासून संध्याकाळी पटकन मेला
श्रीराम बोला तुम्ही जय राम बोला…..

असं एक लोकगीत मराठीत दारू पिऊन आयुष्याची राखरांगोळी करू नका म्हणून भरपूर गाजलं होतं. देशी पितो इंग्लिश मला काय जमत नाय जास्तं असंही मध्यंतरी एक गाणं आल होतं. काहींना इंग्लिश दारू भंग्री वाटते आणि देशी टॉप class वाटते, ज्याची त्याची टेस्ट असते म्हणा त्याला आपण काहीच करू शकत नाही. पण आपल्याकडे देशीवाद जपणारे लोकं जास्त आहेत म्हणून ब्रँड इज ब्रँड म्हणून देशी दारू मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाली. पण मग दरवेळी एक प्रश्न येतोच की हातभट्टीच्या दारू प्यायल्यावर तिच्या नशेने मृत्यू कसा होतो, नक्की हातभट्टीच्या दारूत असा काय माल मिक्स केला जातो की थेट जीवच जातो ?

हातभट्टीच्या 

दारूला कच्ची दारुसुद्धा म्हणतात. जनरली ही देशी दारू बनवण्यासाठी मोहाची फुलं, ऊस किंवा खजुराचा रस असे अनेक इंग्रिडीएंट लागतात तेव्हा दारू मजबुत बनते आणि डोक्याला मुंग्या आणते.

कधी कधी जर मन लाऊन पेपर वाचला असेल तर विषारी दारू पिऊन अनेक बेवडे मरून पडल्याच्या बातम्या झळकत असतात. कधी कधी हा मरणाऱ्यांचा आकडा 100- 150 च्याही वर जातो. ही प्रकरण जास्तीत जास्त देशी दारू प्यायल्यामुळे होतात. या सगळ्या प्रकरणाकडे जर नीट लक्ष देऊन पाहिल्यावर आपोआप उत्सुकता चाळवली जाते की देशी दारूत असा काय माल टाकत असेल ज्यामुळे माणसाचा गेम होतो ?

कशी बनवली जाते हातभट्टीची दारू ?

आता लगेच घरी बनवत बसू नका, वाचली माहिती की लागले बनवायला अरे रुको जरा सबर करो, तर कुठं होतो आपण हा देशी दारूला कच्ची दारू सुद्धा म्हणतात. देशी दारू बनवणे एकदम साधी गोष्ट आहे साधारणतः मोहाची फुलं, ऊस किंवा खजुराचा रस, साखर, जवस, मका, नासलेले द्राक्षे, बटाटा, तांदूळ, खराब झालेले संत्रे अशा अनेक गोष्टींचा उपयोग ही देशी दारू बनवायला होतो. हे सगळ एक प्रकारचं विशुद्ध अल्कोहल असतं. याला इथेनॉल सुद्धा म्हणतात. स्टार्च असलेल्या या गोष्टींना एकत्र करून त्यात ईस्ट टाकलं जातं आणि या सगळ्यांचे मिश्रण फर्मेंटेशन करण्यासाठी ठेवलं जातं.

विषारी दारू कशी बनते ?

खरी मेख इथेच आहे म्हणजे इथूनच सुरूवात होते विषारी दारू बनण्याची, जेव्हा देशी दारू मध्ये नशा जास्त होण्यासाठी आणि ती टीका होण्यासाठी इतर गोष्टी टाकल्या जातात. म्हणजे यामध्ये युरिया आणि बेसरमबेलची पाने टाकली जातात. ते सडवण्यासाठी त्यात ऑक्सिटोसिन वापरलं जातं. असं म्हटलं जातं की ऑक्सिटोसिनमुळे नपुसकता आणि नर्व्हस सिस्टिमशी निगडित अनेक भयंकर आजार होऊ शकतात. इतकच नाही तर दृष्टीही जाऊ शकते. सोबतच कच्च्या दारूमध्ये युरिया आणि ऑक्सिटोसिन सारखे केमिकल पदार्थ ॲड केल्यामुळे मिथाईल अल्कोहोल बनवलं जातं. हे मीथाईल अल्कोहोलच दारूला विष बनवण्याचं काम करत.

मिथेनॉल या मिथाइल अल्कोहोलचा वास एकदम इथेनॉल सारखाच असतो पण हे पिण्यासाठी मुळीच नसतं याचा वापर अँटी फ्रिजर म्हणजे फ्रीजिंग पॉईंट कमी करण्यासाठी आणि दुसऱ्या पदार्थांचा मिक्सर बनवण्यासाठी केला जातो. इंधनच्या रूपात सुद्धा याचा वापर केला जातो.

मिथाइल अल्कोहोल शरीरात गेल्याबरोबर केमिकल reaction वेगाने सुरू होते. खरतर त्याचं रूपांतर फॉर्मेल्डाइड नावाच्या विषामध्ये होतं, याचा परिणाम सगळ्यात जास्त डोळ्यांवर होतो. मिथाइल अल्कोहोलच सेवन जास्त केल्याने फॉर्मिक acid नावाचा पदार्थ शरीरात तयार होऊ लागतो, याचा परिणाम थेट मेंदूवर होतो. इतकंच नाही तर शरीराच्या आतील भागात सुद्धा बधिरता येऊन ते ते भाग बंद पडू लागतात. शरीर पूर्णपणे damage होऊ लागतं. उलट्या, जळजळ, खोकला आणि तमाम इतर आजार जाणवू लागतात, काही लोकांवर याचा परिणाम हळूहळू होऊ लागतो तर काही लोकावर तात्काळ याचा परिणाम होऊ लागतो आणि लवकरात लवकर इलाज न केल्याने मरण येत.

त्यामुळं दारू सुद्धा कोणती, कुठली आणि कधी प्यायची याविषयी सुद्धा माहिती करून घेणं गरजेचं असतं. नुसतं पीत बसून करियर बरबाद करण्यात काहीच हाशिल नाहीय, काम करा, पैसे कमवा, दारू पिऊन फकाट होऊ नका….

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.