हा आहे खरा तेल लावलेला पहिलवान, जो गेली ४५ वर्ष भारतीय अर्थव्यवस्थेला गंडवतोय.

तेल लावलेला पैलवान कोण आहे? साहजिक शरद पवारांच नाव येईल. काहीजण देवेंद्र फडणवीसांच्या नावाचा उल्लेख करतील. काही चंद्रकांत दादांना तेल लावलेला पहिलवान म्हणतील. राजकारण प्रत्येकजण आपआपल्या ठिकाणी तेल लावलेला पहिलवान आहे याबद्दल काही शंका नाही.

पण आम्ही आज एका अस्सल तेल लावलेल्या पहिलवानाबद्दल सांगतोय. कारण या माणसाने,

भारतातल्या नियमांचा अचूक फायदा घेतला आहे. ते पण किती वर्ष तर गेली ४५ वर्ष. गेली ४५ वर्ष तो सांगून गंडवतोय तरिही त्याला कोणी पकडू शकलेलं नाही.

त्याचं कारण देखील तितकचं भन्नाट आहे.

एक काम करा. तुमच्या घरात पॅराशूट तेलाची बाटली असेल. त्या बाटलीवर हेअर ऑईल अस लिहलय का बघा. तुम्हाला कुठेही त्या निळ्या बाटलीवर हेअर ऑईल अस दिसणार नाही. त्यावर फक्त कोकोनट ऑईल असा उल्लेख आहे. दूसरी गोष्ट खाण्यासाठी ज्या प्रमाणे व्हेज नॉनव्हेजसाठी हिरवा आणि लाल रंगाचा लोगो असतो तसा लोगो देखील यावर दिसेल. प्युअर व्हेजचा लोगो या बाटलीवर आहे.

म्हणजे काय तर तुम्ही डोक्याला लावता ते तेल केसांना लावायचं नसून ते खाद्यतेल आहे.

आत्ता मुद्या येतो अस का आणि ही काय भानगड आहे. 

मारिको अस त्याच्या कंपनीचं नाव आहे. ही कंपनी वेगवेगळ्या ब्रॅण्डसाठी ओळखली जात असली तर कंपनीचा मुख्य ब्रॅण्ड पॅराशुटची निळी बाटली हाच राहिला आहे.

त्याच्या यशाची सुरवात होते ती १९७१ साली. बॉम्बे ऑईल इंडस्ट्री नावाची त्याची घरची कंपनी होती. या कंपनीचा कराभार तरुण असणाऱ्या हर्ष मारीवाला यांच्या हातात आला. तरुण रक्त असल्याने या पठ्याने वेगवेगळे प्रयोग करण्यास सुरवात केली. त्यातला सर्वात भारी प्रयोग होता तो कोकोनट तेल कस विकावं याचा. त्या काळी कोकोनट ऑईल हे खाद्यतेलापासून केसांना लावण्यासाठी वापरलं जातं होतं.

पण त्याचा सर्वात मोठ्ठा तोटा होता तो म्हणजे ते पत्र्याच्या मोठ्या डब्यातून मिळायचं. यामुळे काय व्हायचं तर मध्यमवर्गीय लोकं असं ते घेवून डोक्याला लावणं नापसंत करायची. त्यासाठी काहीतरी आकर्षक पॅकिंग करून तेल विकलं पाहीजे अस हर्ष मारिवालाच्या सुपीक डोक्यात चालू होतं. 

त्याने चौकशी कऱण्यास सुरवात केली. आपल्या कंपनीची टिम त्यासाठी कामाला लावली. तेव्हा त्याला समजंलं की प्लॅस्टिकच्या डब्यातून कोकोनट तेल विकण्याचा प्रयोग यापुर्वी देखील एका कंपनीने केला होता. पण कोकोनट तेल आणि प्लॅस्टिक हे कॉम्बिनेशन उंदरांना प्रंचड आवडल्याने एकही बाटली ग्राहकांच्या हाताला लागली नाही.

पण हर्ष मारीवाला मुळातच तेल लावलेला पहिलवान होता. उंदरांच्या हाती सुद्धा सापडू नये म्हणून त्याने एक आयडिया केली. त्यानं काय केलं तर प्लॅस्टिकच्या कॅनच रुपांतर बाटलीत केलं. बाटली गोलाकार ठेवली आणि उंदरांवर प्रयोग केला. झालं अस की बाटली गोलाकार असल्यामुळे उंदरांच्या तोंडात ती सापडतं नव्हती. प्रयोग यशस्वी झाला.

आत्ता दूसरा प्रयोग होता तो म्हणजे पॅराशुटचं ब्रॅण्डिंग. 

खाद्यतेलावर आत्तापर्यन्त कर नव्हता. त्यामुळे खाद्यतेल स्वस्त:त विकून चांगला फायदा मिळवता येत होता. पण हेच तेल ब्युटी प्रॉडक्ट म्हणून विकलं तर मात्र त्याला मोठ्या प्रमाणात कर द्यावा लागणार होता. त्याने कोकोनट ऑईल हे खाद्यतेल म्हणून विकण्यास सुरवात केली. १९७५ पासून पॅराशूटची बाटली खपू लागली. हळुहळु घरतली मोक्याची जागा तिने मिळवली. पॅराशुटची निळी बाटली नसणारं घरं सापडणं मुश्किल झालं. भारतासोबत वेगवेगळ्या देशात ते आपलं तेल विकू लागले. कंपनीने चांगल नाव कमावलं.

या दरम्यान पॅराशुटची जाहिरात सुरू झाली. मात्र काळजीपुर्वक जाहिरात पाहिल्यानंतर लक्षात येईल की कोणत्याही जाहिरातीत समोरची ललना तेल घेवून ते केसांना लावताना दिसत नाही. एकीकडे ललना दूसरीकडे बॉटल. हा त्या ललनेचे केस लांबसडक असायचे मात्र ती कुठेही हे तेल डोक्याला लावा अस सांगायची नाही. 

मध्यतरी कोणीतरी कंपनीची तक्रार केल्याची माहिती इंटरनेटवर मिळते.

पण यात चुकीचं काय आहे. आम्ही खाद्यतेलच विकतोय आत्ता त्याचं काय करायचं ते ग्राहक ठरवतील. त्यामुळे कंपनीचे मालक कुठल्याही नियमांचा भंग करत नाहीत. थोडक्यात काय तर हा माणूस अस्सल ते लावलेला पहिलवान आहे ते यामुळेच. सध्याही GST च्या वेगवेगळ्या स्लॅबमध्ये खाद्यतेलावर कमी कर आहे. आजही ही कंपनी पॅराशूट विकते. त्यांच्या साईटवर गेल्यानंतर मात्र केसांना तेल लावल्याचे उल्लेख आणि बाटली दिसते. पण काळजीपुर्वक पाहिल्यानंतर लक्षात येतं की हे कंपनीचे वेगळे प्रॉडक्ट आहेत. पॅराशुटनतंर काढलेलं जॅस्मिन तेल किंवा स्पेशल हेअर ऑईल, क्रिम अशी जाहिरात करुन हे प्रॉडक्ट काढण्यात आले आहेत. पण त्याची संख्या जाहिरातीतच आहे. प्रत्यक्षात विक्री पॅराशूटच्या नेहमीच्या बाटलीची आहे.

दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात स्वयपाक करण्यासाठी देखील खोबरेल तेल वापरतात. ते थेट पॅराशूटची बाटलीच वापरतात. आपल्याकडे हे तेल डोक्याला लावतात. साधारण ८० टक्के लोकं खोबरेल तेल डोक्याला लावण्यासाठीच वापरतात. आणि कंपनी चांगला फायदा घेते.

मारिको कंपनीचे सध्या २४ देशांमध्ये व्यवसाय आहे. बांग्लादेशात सर्वाधिक खपणारा ब्रॅण्ड म्हणून पॅराशूटला ओळखले जाते विशेष म्हणजे हर्ष मारीवाला हे भारतातल्या श्रीमंतांच्या यादीत ३४ व्या नंबरला येतात. ते ही कोणतीही लबाडी न करता फक्त अक्कलहूशारी करून. 

हे ही वाच भिडू

1 Comment
  1. रूपेश says

    अक्कल नाही लेखकाला
    कोणते तेल फक्त केसासाठीच आहे,

Leave A Reply

Your email address will not be published.