माणसात आणणारे ३५ दिवसांचे क्वारंटाईन: पु.ल. उभे राहिले अन् अवचटांनी करुन दाखवलं

१९८० च दशक. त्या काळातल्या पिक्चरमध्ये व्हिलन ब्राऊन शुगरची तस्करी करत असल्याचं दिसतं. या काळात मुंबईचं अंडरवर्ल्ड ब्राऊन शुगरवर आधारलेलं होतं. अस वाटतं की ब्राऊन शुगर म्हणजे कुठल्यातरी मोठ्या बापाचा मुलगा याचं व्यसन करत असेल.

त्या काळातला खलनायक संजय दत्त किंवा पिक्चरमध्ये येणारं विकी नावाचं कॅरेक्टर यांच्यापुरतच ब्राऊन शुगर मर्यादित असेल.

पण तसं नव्हतं. १९८० च्या दशकात ब्राऊन शुगरने संपुर्ण मुंबईला विळखा घातलेला. टॅक्सी ड्रायव्हर पासून ते हातगाडीवाले, हमाल, मोलमजूरी करणारे कामगार अशा प्रत्येक थरात ही ब्राऊन शुगर पोहचलेली. ब्राऊन शुगरचं दुसरं नाव गर्द होतं. तिथूनच गर्दचं व्यसन करणारे ते गर्दुले हा शब्द आला असावा.

गर्द म्हणजे नेमकं काय असायचं तर अफूच्या बोंडावर प्रक्रिया करुन जे प्युअर हिरॉईन मिळतं त्यामध्ये भेसळ करुन तपकिरी रंगाची पावडर तयार केली जात तिलाच ब्राऊन शुगर म्हणायचे. याच खास गोष्ट म्हणजे एकदा ब्राऊन शुगर घेतली की त्याच व्यसन हमखास लागायचं.

झालं अस की जेष्ठ पत्रकार डॉ. अनिल अवचट यांच्या संबधिंतांचा मुलगा या व्यसनाच्या नादी लागला.

अनिल अवचट यांच्या पत्नी डॉ. अनिता अवचट या येरवडा मनोरुग्णांच्या हॉस्पीटलमध्ये उच्चपदावर कार्यरत होत्या. त्या मनोवैद्य होत्या.  म्हणून संबधित व्यक्तिंना आपल्या मुलाला लागलेल्या व्यसनाची गोष्ट अनिल अवचट यांच्या कानावर घातली.

अनिल अवचट व अनिता अवचट यांना एक मार्ग दिसला. तो म्हणजे या मुलाला आपल्याजवळ ठेवून घेवू. त्याला व्यसनमुक्त करण्याचा प्रयत्न करु. पण प्रश्न होता तो म्हणजे ब्राऊन शुगरचं व्यसन असणाऱ्या मुलावर नेमके कोणते उपचार करायचे. त्या काळात इंटरनेटची सुविधा नसल्याने अशा केस स्टडी करणं ही कठिण गोष्ट होत.

तरिही हा मुलगा अनिल अवचट यांच्या घरी राहू लागला. अनिल अवचट व अनिता अवचट त्याला बोलतं करु लागले. दिवसभर तो त्यांच्यासोबतच घरी रहायचा आणि रात्री अनिल अवचट यांच्यासोबत फिरायला जायचा. या दरम्यानच्या गप्पागोष्टींमध्ये अनिल अवचट यांच्यासारख्या हाडाच्या पत्रकारासमोर व्यसनी लोकांच एक वेगळं विश्व उघडलं गेलं.

ब्राऊन शुगरने किती लोक पोखरले गेले आहेत इथपासून ते असे ड्रग्स कुठे मिळतात, त्यांचा व्यापार कसा चालतो. कोणकोणत्या घरातले लोक, तरुण मुलं अशा गोष्टींत गुरफटून गेले आहेत हे सगळं अनिल अवचटांच्यासमोर उलगडत गेलं.

अनिल अवचटांसारख्या पत्रकाराने या गोष्टींचा माग घेतला.

त्यासाठी ते मुंबईच्या प्रसिद्ध मनोविकार तज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांना जावून भेटले. मुंबईचे व्यसनी विश्व त्यांनी जवळून पाहिलं आणि त्यावर अभ्यासपुर्ण लेखमाला वर्तमानपत्रातून प्रसिद्ध केली.

ही लेखमाला प्रसिद्ध झाली आणि संपुर्ण महाराष्ट्र हादरून गेला. लोकांसाठी हे विश्व नवीनं होतं. आपल्या आजूबाजूच्या किती जणांना या व्यसनाने पोखरलं असेल याचा विचार देखील करता येवू शकत नव्हता.

हि लेखमाला वाचणाऱ्यांमध्ये एक मोठं नाव होतं ते म्हणजे,

पु.ल. देशपांडे यांच.

पु.ल. देशपांडे यांनी अनिल अवचट व अनिता अवचट यांना घरी बोलावून घेतलं. व्यसनांच हे विश्व समजून घेतलं आणि पुल म्हणाले,

अशा व्यसनी व्यक्तिंच्या उपचारासाठी तुम्ही काही कराल का? पैशाची काळजी करु नका.

पुलं च्या या सुचनेवर एकाही क्षणाचा विलंब न लावता अनिता अवचट यांनी होकार दिला आणि मुक्तांगणची पायाभरणी झाली.

२९ ऑगस्ट १९८६ रोजी पुल देशपांडे यांनी नामकरण केलेल्या मुक्तांगणची स्थापना करण्यात आली. व्यसनमुक्ती केंद्राच्या शुभारंभाच्या या कार्यक्रमासाठी बाबा आमटे, डॉ. ह.वि. सरदेसाई असे लोक आले होते. एकूण ३५ दिवस उपचारांसाठी ठरवण्यात आले. या दरम्यान व्यसनांच्या आहारी गेलेल लोक इथेच राहतील दैनंदिन कार्यक्रम ठरवून देण्यात येतील व त्यानूसार काम पाहिले जाईल असे वेळापत्रक तयार करण्यात आले.

डॉ. अनिता अवचट यांनी व्यसनी व्यक्तींच्या आई म्हणून भूमिका संभाळली. इथून जे लोक बाहेर पडू लागले तेच व्यसनमुक्तीचे कार्यकर्ते होवू लागले. कधीकाळी व्यसनांच्या आहारी गेलेला व्यक्ती आज व्यसनांच्या विरोधात इतक्या पोटतिडकीने बोलतोय हे पाहून अनेक व्यसनी लोक इथे येवून उपचार घेवू लागले. या सर्व गोष्टींमध्ये डॉ. आनंद नाडकर्णी देखील सोबत राहिले.

१० फेब्रुवारी १९९७ रोजी डॉ. अनिता अवचट यांचे निधन झाले. २७ जानेवारी २०२२ ला अनिल अवचट यांचेही निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांची मुलगी मुक्ता अवचट यांनी संस्थेची जबाबदारी स्वीकारली. मुक्ता अवचट संपुर्ण भारतात मनोसोपचार विषयात प्रथम क्रमांकाने उतीर्ण झाल्या होत्या.

नंतरच्या काळात संस्थेने नावलौकिक मिळवला. देशभरात मुक्तांगणची ओळख झाली. आजही व्यसनी लोकांना हमखास माणसांमध्ये आणण्याचं काम अविरत चालू आहे. पण या संस्थेची स्थापना एका लेखमालेने आणि एका लेखकाच्या पाठींब्याने झाली हे विसरून चालणार नाही.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.