ज्युनियर पीसी सरकारांनी दोन मिनिटासाठी ताजमहाल गायब केला होता..

भारतात एका पेक्षा एक सरस जादूगार होऊन गेले त्यांची जादू बघून लोक आश्चर्याने तोंडात बोट घालत असत. विज्ञान सुद्धा यांची जादू कधी पकडू शकला नाही. भारतामध्ये हजारो गारुडी- मदारी आहेत जे चौकाचौकात, रस्त्या-रस्त्यावर खेळ करून आपली जादू दाखवत असतात आणि आपली रोजीरोटी चालवत असतात. मध्यकाळात याच भारतीय जादूगार लोकांकडून पाश्चात्य देशातील लोकांनी ही ट्रिक शिकली आणि हीच ट्रिक वापरून परदेशात नाव कमावलं त्याला आधुनिक रूप दिलं आणि स्टेशन म्हणून नावलौकिक कमावला.

भारतामध्ये के. लाल मोहम्मद छैल आणि जादूगार आनंद यांच्यासारखे शेकडो जादूगार झाले. त्यापैकीच एक होते जादूगर पी सी सरकार पण या पीसी सरकारपेक्षा त्यांच्या मुलाने म्हणजे ज्युनिअर पीसी सरकार यांनी भारतामध्ये भरपूर नाव कमावलं होतं तर जाणून घेऊ या पीसी सरकार यांच्याबद्दल आणि ज्युनियर पिसी सरकार यांचा एक किस्सा ज्यात त्यांनी साधासुधा नाही तर थेट ताजमहल गायब केला होता.

पी सी सरकार यांचा जन्म 1913 मध्ये बंगालमध्ये झाला. बंगाल ज्या क्षेत्रात येतं तो देश आता बांगलादेश आहे पन्नासच्या दशकात प्रसिद्ध शो इंद्रजालच्या माध्यमातून जगाला वेड लावणारे पीसी सरकार बंगालचे जादूगार म्हणून ओळखले जाऊ लागले. पीसी सरकार भारतातले नामी जादूगार होते.Nजगभर जादूचे खेळ करून पी सी सरकार यांनी आपला जलवा दाखवून दिला होता त्याच मुळे भारत सरकारने 1964 मध्ये पद्मश्री हा पुरस्कार देऊन पी सी सरकार यांना सन्मानित केलं होतं.

पी सी सरकार यांचा जादूचा शो इंद्रजाल भारत मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाला होता 1930 साली पीसी सरकार चर्चेत आले जेव्हा त्यांनी कोलकत्ता आणि जपानमध्ये जादूचे शो करण्यास सुरुवात केली.

लोकांनी पीसी सरकार यांनी तयार केलेली मुलीला हवेत उडवण्याची टेक्निक म्हणा किंवा जादू म्हणा मोठ्या प्रमाणात डोक्यावर घेतली. त्यांच्या फेमस जादुपैकी हवेत उडणारी चटई हे सुद्धा फेमस होती पण हवेमध्ये मुलगी उडवण्याची ट्रिक मोठ्या प्रमाणावर फेमस झाली.

पीसी सरकार हे आपल्या परिवारातले जादुगरी करणारे सातवे पिढीचे सदस्य होते. 6 जानेवारी 1971 रोजी जपानमध्ये शो करतेवेळी वयाच्या 58 व्या साली हृदय विकाराचा झटका पडल्याने जादूगर पी सी सरकार यांच निधन झालं.पीसी सरकार गेल्यानंतर त्यांच्या मुलाने अर्थात पीसी सरकार ज्युनियर यांनी जादूची परंपरा कायम ठेवली.

भारताचे प्रसिद्ध जादूगार पी सरकार ज्युनियर यांनी नव्वदच्या दशकामध्ये कोलकत्ता मधल्या विक्टोरिया मेमोरियल आणि एका चालत्या ट्रेनला गायब केलं होतं. हे तर काहीच नाही जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या ताजमहालाला दोन मिनिटांसाठी जादूगार जूनियर पी सी सरकार यांनी गायब केलं होतं.

आता हे ताजमहल गायब केला बर्‍याच लोकांना खोटं वाटत असेल किंवा खरं वाटत असेल सत्यता काय माहित नाही पण जूनियर पीसी सरकार यांनी बाजारात असे काही जादूचे प्रयोग आणले होते आणि ते इतके खतरनाक होते की ताजमहाल ही गायब होण्यावर लोक विश्वास ठेव होते. संपूर्ण भारतभरात ताजमहल गायब केल्याची चर्चा होती आणि हे सगळं घडवून आणलं होतं जादूगार पी सी सरकार ज्युनियर यांनी. या घटनेमुळे जादूगार ज्युनिअर पीसी सरकार यांच्या शोला तुडुंब गर्दी होऊ लागली आणि जादूगार जुनियर पीसी सरकार भारत भारत प्रसिद्ध झाले.

जापानी आणि स्पॅनिश भाषा येत असलेल्या सरकार यांना दोन्ही देशांकडून भरपूर प्रेम मिळतं त्यात सेवीला याठिकाणी जादूगर पी सी सरकार ज्युनियर यांनी एकूण 50 पेक्षा जास्त शो केले आहेत. जादूगार ज्युनियर पी सी सरकार यांच्या लोकप्रियतेचा अंदाज याच गोष्टीवरून लावला जाऊ शकतो की दर वर्षी पी सी सरकार ज्युनियर यांचे 400 बुक असायचे आणि सगळेच्या सगळे हाऊसफुल असायचे. पीसी सरकार जुनियर सांगतात की माझे वडील शाही अंदाजातले कपडे घालायचे कारण माझे वडील जादूचे शहंशा होते त्यामुळे त्यांची वेशभूषा त्या धाटणीची असायची. पण ताजमहाल गायब करण्याच्या घटनेवरून जादूगर पी सी सरकार ज्युनियर बऱ्याच लोकांच्या गळ्यातील ताईत बनले होते.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.