राणेसाहेब, प्रकाश शेडेकर आणि चिखलाचं नात जन्मापासून राहिलं आहे.

सत्तरीतलं दशक. शिकण्याची जिद्द उराशी बाळगून एक आठ दहा वर्षाचा पोरगा खांद्याला पिशवी टाकून शाळेची वाट धरायचा. घरात वडिलांची कडक शिस्त आणि त्यांच्याच शाळेत शिक्षक म्हणून असण्याचा धाक. घराच्या उंबऱ्यापासून शाळेच्या पायरीपर्यन्त चालत जाताना पायात पायतान नसायचं.

कधी पायात खडं बोचायची तर कधी पावसात पायभर चिखल तुडवला जायचांय याच चिखलातून वाट काढत शाळेच कास धरणाऱ्या आणि पुढे अधिकारी होणाऱ्या प्रकाश शेडेकरांना राणेंनी विचारलं, 

तुला चिखल काय असतो माहिती आहे का ? 

प्रकाश शेडेकर या अधिकाऱ्यांवर चिखल ओतण्यात आला. घटना चुक की बरोबर याची चर्चा सुरू झाली. घटना घडवली जात होती तेव्हा शेडेकर यांना प्रश्न विचारण्यात येत होता, तुला चिखल काय असतो माहिती आहे का?

शेडेकर यांच आयुष्यच एक चिखलवाट आहे. ते कोण आहेत हे सांगण्याचा बोलभिडूचा हा प्रयत्न. 

गडहिंग्लजवळच करंबळी हे छोटसं गाव. सत्तरच दशक. शेडेकरांचे वडिल प्राथमिक शिक्षक तर आई शेतीत राबणारी. तुमच्या आमच्यासारखीच त्यांची आई. आपल्या पोरांन मोठ्ठ व्हावं अस तीच स्वप्न. तिला जास्त कळत नव्हतं पण पोरानं इजनयिर व्हावं हे स्वप्न ती सारखं बोलून दाखवायची. घरची परिस्थिती जेमतेमच. आज प्राथमिक शिक्षक म्हणल्यानंतर किमान मध्यमवर्गीय घर डोळ्यासमोर येत तस त्या काळात नव्हतं. पायात चप्पल, शाळेत जाताना निटसं दप्तर अशा कोणत्याच गोष्टी नव्हत्या. नाही म्हणायला घरातलं सगळं कुटूंब शेतात राबायचं. लहान असणारे प्रकाश शेडेकर देखील आईसोबत शेतात राबायचे.

गडहिंग्जच्या भाताच्या शेतीतला चिखल असो कि शाळेत जाताना पायाला लागणारा चिखल. प्रकाश शेडेकरांची वाट लहानपणापासूनच चिखलाची होती. 

चिखलाच्या वाटेतूनच पुढं जायचा हा विचार करुन शेडेकर शिकले. शेतीला साक्षी ठेवून इंजनिरिंगच शिक्षण पुर्ण केलं. कोवळ्या वयात आईनं पेरलेलं स्वप्न पुर्ण झालं. दरम्यानच्या काळात वडिल रिटायर झाले होते. काहीतरी काम करणं गरजेचं होतं. त्याचवेळी अधिकारी होण्याच स्वप्न देखील खूणावत होतं. 

इंजिनियरींग झालं आणि काहीतरी काम करायचं करायचं म्हणून त्यांना वारणा कॉलेजमध्ये तात्पुरती नोकरी धरली. पगार कमी पण अभ्यासाला वेळ मिळायचा. UPSC, MPSC ची तयारी सुरू केली. याच दरम्यान त्यांच लग्न झालं. पोरं झाली पण MPSC, UPSC करण्याचा नाद त्यांनी सोडला नाही. पोरगं कधीतरी साहेब होईल हिच इच्छा. झालं तसच लग्न झालं, संसार सुरू झाला तरी न थांबता त्यांनी प्रयत्न केले आणि एकदिवस सरकारी अधिकारी झाले. शिक्षणात पुढे जायचं ठरवून शेडेकर कुटूंबातला प्रत्येकजण कष्टातून शिकला. गावात त्यांची अशीच ख्याती आहे म्हणूनच आज दोन पिढ्याच चार सिव्हिल इंजिनियर त्यांच्या घरात आहेत. 

नितेश राणेंनी जेव्हा त्यांना प्रश्न विचारला तूला चिखल माहित आहे का? 

तेव्हा हि चिखलवाट त्यांना माहिती नसावी. सरकारी दप्तरी कामांची दिरंगाई, शासकिय प्रशासकिय कामांवर होणारा वेळ या सगळ्यांची उत्तर एखाद्या माणसांच्या अंगावर चिखल टाकून सुटत नसतात. असो, 

बोलभिडूने जेव्हा प्रकाश शेडेकर यांचे भाऊ महेश शेडेकर यांच्याशी संपर्क साधला तेव्हा,

ते म्हणाले प्रामाणिकपणा आणि नम्रपणा हाच माझ्या भावाचा गुण आहे. त्याचा स्वभावच तसा आहे म्हणून जेव्हा अंगावर चिखल टाकला जात होता तेव्हा तो शांतपणे उभा होता. राणे बोलत होते तेव्हा एकही शब्द त्याने विरोधात काढला नाही हाच नम्रपणा त्याच्यात कुटून भरलाय. तो सध्या टेन्शनमध्ये आहे. तो कोणाशी बोलत देखील नाही. पण एकदिवस तो या परिस्थितीतून बाहेर येईल आणि सगळ्यांसमोर एक आदर्श म्हणून उभा राहिल याची खात्री आम्हाला आहे. 

  • लेख पुर्नमुद्रित / पुर्नप्रकाशित केल्यास Copyright अंतर्गत कारवाई केली जाईल. 
3 Comments
  1. Pravin jamdar says

    छान लेक डोळ्यातून अगदी अश्रु अनाननारा लेख

  2. प्रविण जामदार says

    या वर्षी राजकारनातून बाहेर खेचल पाहिजे यांना
    तर अक्कल येईल ते कोणत्याही पक्षात जाउदेत आम्ही आहोत पाठीशी पैशे यानी खायचे उत्तर अधिकारी देणार साध सरळ आहे अंध भक्त नाही मान्य करणार हे सर्व आत्ता सर्वाना सर्व काही माहित आहे प्रत्येकाने आपल्या गावात जनजागृति केली पाहिजे

Leave A Reply

Your email address will not be published.