या भिडूने टाईमपासमध्ये गाडीत बसून गाणं बनवलं आणि आज तेच गाणं इन्स्टाग्रामवर ट्रेंड करतंय…

आजचा जमाना आहे सोशल मीडियाचा, जेवायचे स्टेटस, फिरायचे स्टेटस, व्यायामाचे स्टेटस, दोस्तांचे स्टेटस, पोरगी सोडून गेली त्याचे स्टेटस, पोरगी रिटर्न पॅचअप करायला आली, त्याचे स्टेटस अशा सगळ्या गोष्टी आपण पाहत असतो त्यातच मागच्या वर्षा दोन वर्षात एक गजब शोध लागला होता तो म्हणजे टिकटॉक जाऊन रिल्स आले आणि सगळेच हिरो बनले. याचा बऱ्याच लोकांना फायदा झाला म्हणा आणि बरीच चांगली गाणी आणि टॅलेंट जगासमोर आलं. ट्रेंड हा प्रकार यामुळे वाढला असंच एक गाणं पूर्ण 2021 वर्षभर ट्रेंडिंग होतं ते म्हणजे कींना चार. इन्स्टाग्रामवर टॉप मोस्ट ऑडिओ सॉंग म्हणून हे गाणं फेमस आहे. तर जाणून घेऊया काय विषय आहे हा.

2018 साली कौशिक राय या मुलाने आपल्या कारमध्ये गाणं म्हणलं होतं तकदां ही जांवा, एन्ना तेंनू चांवा..हे गाणं आजही दोन चार रिल्स मध्ये दिसून येतं म्हणजे तुम्ही फक्त स्क्रोल करा हे गाणं आलंच म्हणून समजा. तीन वर्षांपूर्वी हे गाणं झालं होतं आणि ज्याने हे गाणं बनवलं होतं त्याच अकाउंट बंद पडूनसुद्धा 3 वर्ष झालीत तरी हे गाणं आजही ट्रेंडिंगला आहे हे विशेष.

 

18 मार्च 2018 रोजी कौशिक राय या मुलाने त्याच्या आयडी वरून हे गाणं टाईमपास म्हणून पोस्ट केलं होतं पण हळूहळू त्याची हुकलाईन गाजली आणि हे गाणं ट्रेंड करायला लागलं. गाडीत बसून कौशिक राय किना चार या गाण्याच्या चार ओळी गाताना आपल्याला दिसतो तेही विदआउट म्युझिक. या गाण्याच्या ओळीसुद्धा तितक्याच भारी होत्या आणि म्हणूनच त्या गाजल्या.

गल संग वाली सारी मिटा देनिए
फोटो दिल के कोने विच जो लुका के सी मेने रखी
आज अख्खाके सामने खडा देनीए
तकदा ही जांवा इंना तेंनू चांवा

2018 ला हे गाणं पोस्ट झालं तेव्हा ते फक्त कौशिक राय आणि त्याच्या मित्रांनीच ऐकलं होतं बाकी कोणालाच या गाण्याबद्दल माहिती नव्हतं. डिसेंबर 2021 मध्ये या गाण्याला 1.9 मिलियन व्हिवज मिळाले. मग मात्र 2021 साली हे गाणं सगळ्यात जास्त व्हायरल ट्रॅक म्हणून पुढे आलं. नंतर काही दिवसांनी इन्स्टाग्रामवर कौशिक राय परत आला तेव्हा त्याने स्वतःच्या गाण्याखाली हजारो कमेंट बघितल्या आणि मग त्यालाही कळलं की गाणं जास्तच व्हायरल झालेलं आहे. त्याच क्षणी 40 हजार फॉलोवर त्याचे जागेवर वाढले.

आता तर हे गाणं 8 मिलियनच्याही पुढे गेलंय आणि सेलिब्रिटी लोकसुद्धा या गाण्यावर रिल्स बनवत आहेत. आज कौशिक राय एका गाण्यामुळे स्टार बनला आहे. टाईमपास सुद्धा अश्या प्रकारे फेमस करून देऊ शकतो याच हे जिवंत उदाहरण आहे, व्हायरलच्या जमान्यात काहीही होऊ शकतो त्यामुळे गाफील राहायचं नाय भिडू…!

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.