झुनझुनवाला मोदी भेट काल व्हायरल झाली आणि आज टाटांचे शेअर्स वाढले…!

काल राकेश झुनझुनवाला आणि नरेंद्र मोदी यांच्या भेटीची सोशल मिडिया वर दिवसभर चर्चा होत होती . आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की शेअर्सच्या किमतीमध्ये वाढ झालीये तर यामध्ये या भेटीचा काय संबंध. तर या भेटीचा सरळ सरळ संबंध हा शेअर्सच्या किमतीमध्ये झालेल्या वाढीशी आहे असा अर्थ शेअर्स मार्केट मधील तज्ञांनी लावला आहे. याचे कारण सुद्धा असेच आहे.

आधी सगळं व्यवस्थित एक्सप्लेन करतो.

भारतामधील सर्वात मोठ्या दानवान कुटुंबियांमध्ये टाटा घराण्याचा समावेश होतो. अलीकडेच कोरोना ची महामारी चालू असताना कोरोना मध्ये आरोग्य क्षेत्रासाठी केलेली मदत असू देत किंवा कोरोना मुळे मृत्यू झालेल्या कंपनी च्या कर्मचार्यांच्या कुटुंबियांना सुरु केलेले पेन्शन असू देत कायमच रतन टाटा आणि त्यांची कंपनी लोकांचा फायदा कसा होईल यावर लक्ष दिल्याच दिसून येत. आज कंपनी ने फायदा करून दिलाय तो कंपनी च्या गुंतवणूकदारांचा.

आपण आज टाटांच्या अशा दोन कंपनी बद्दल जाणून घेणार आहोत ज्यांच्या शेअर्स च्या किमतीत आज जबरदस्त वाढ झाली. त्यामुळे कंपनी मध्ये गुंतवणूक करणार्यांना भरगोस नफा झाला.

पहिली कंपनी आहे टायटन लिमिटेड जिच्या शेअर्स च्या किमतीत १०% पेक्षा जास्त वाढ झाली. वॉचेस,ज्वेल्लरी, आदी मध्ये प्रसिद्ध असलेली टायटन कंपनी ही १९८४ मध्ये होसूर तामिळनाडू मध्ये घड्याळांची कंपनी म्हणून स्थापन करण्यात आली होती . १९९१ पासून टायटनने घड्याळाव्यतिरिक्त इतर उत्पादन निर्मिती ला सुरुवात केली बघता बघता कंपनी २०२० पर्यंत २१००० कोटी महसूल असणारी कंपनी बनली. कंपनी च्या शेअर्सच्या किमतीत १०% ची झालेली वाढ रुपयांमध्ये सांगायचं झाल्यास शेअर च्या किमतीत २२९.४० रुपयांची वाढ झाली आहे.

उदाहरण देऊन सांगायचं झाल्यास समजा एखाद्या व्यक्तीकडे टायटन कंपनी चे १०००शेअर्स असतील तर त्यांना २,२९,४०० चा फायदा झाला असेल.

दुसरी कंपनी आहे टाटा मोटर्स

आज टाटा मोटर्सच्या गुंतवणूकदरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आनंदच वातावरण असायला कारण सुद्धा तसच आहे. कंपनी च्या शेअर्सच्या किमतीत १२ % वाढ झाली आहे. रुपयांमध्ये सांगायचं तर ४०.४० रुपये एवढी वाढ झाली. २०२१ मध्ये ३१९,२४७ कोटी महसूल असणारी टाटा मोटर्स कंपनी ही १९४५ मध्ये जेआरडी टाटा यांनी स्थापन केली होती. ज्या कंपनीची वाढ करून एक मोठी कंपनी बनवण हे रतन टाटांच एक स्वप्न होत. टाटाच्या मेहनतीने उत्तरोत्तर कंपनी ची वाढ होत गेली आणि त्याचं कंपनी ने आज तिच्या गुंतवणूकदारांना मालामाल केलं.

या दोन कंपनी व्यतिरिक्त ग्रुपच्या ११ कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ झालेली दिसून आली .

आता राकेश झुनझुनवाला टाटांचे शेअर्स वाढले त्यात अचानक कुठून आले हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. 

तर विषय असा आहे की टाटा ग्रुप च्या ज्या कंपनी च्या शेअर्स  मध्ये तेजी आली त्या कंपनीपैकी असणारी टायटन लिमिटेड ह्या कंपनी मध्ये झुनझुनवाला यांचे ७८,३३३,२६६ इतके शेअर्स असून त्यांची एकूण किंमत ही ६५५.३ कोटी इतकी आहे. तसेच टाटा मोटर्स या कंपनी मध्ये एकूण ३७,७५०,००० शेयर्स असून त्याची एकूण किंमत १,४२१ कोटी इतकी आहे. 

योगायोगाने पंतप्रधान मोदी झुनझुनवालाना भेटले काय , त्यांचे फोटो व्हायरल झाले काय आणि आज झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओ मध्ये असलेल्या टाटाच्या कंपन्यांचा शेअर्स वाढतो काय. सगळंच अनाकलनीय आहे.

दोन व्यक्तींची भेट ही शेअर्स मार्केट मध्ये किती तेजी किंवा मंदी आणि असू शकते हे यावरून लक्षात येतं. त्यामुळे गुंतवणूकदारांकडून मार्केट मधील चालू घडामोडींकडे गांभीर्याने बघून मार्केट गुंतवणूक करावी असच तज्ञ मंडळी सांगतात.

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.