एक व्हिडिओ व्हायरल झाला अन आमदाराला दिल्ली पोलिसांनी अटक केली.

काँग्रेसचे माजी आमदार आसिफ मोहम्मद खान कायमच वादात सापडणारे नेते म्हणून ओळखले जातात. आत्ताही वादात सापडले अन त्याचमुळे त्यांना डायरेक्ट जेलची हवा खायला लागली.

सद्या याच प्रकरणाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यामुळे काँग्रेसचे माजी आमदार आसिफ मोहम्मद खान यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. 

अटक करेपर्यंत विषय असा झाला कि, 

आसिफ खान यांनी एमसीडीच्या लोकांना मारहाण आणि शिवीगाळ केली. एमसीडीच्या लोकांना कोंबडा बनवल्याचा आरोपही आहे. या प्रकारामुळे त्यांना छळवणूकीच्या आरोपातून अटक केली आहे. शाहीनबाग पोलिसांनी आसिफ मोहम्मद खान याला अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आसिफ मोहम्मद खानला सात दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 

एमसीडी अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी आसिफ मोहम्मद खान यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.

एमसीडी निरीक्षकांनी दिलेल्या तहरीरच्या आधारे शाहीनबाग पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. एमसीडीच्या इन्स्पेक्टरच्या तक्रारीत आसिफ मोहम्मद खान यांच्यावर एमसीडी कर्मचाऱ्यांना शिवीगाळ आणि मारहाण करून कोंबडा बनवल्याचा आरोप करण्यात आला आहे.

दिल्ली पोलिसांनी एमसीडीचे निरीक्षक राम किशोर यांच्या तक्रारीवरून काँग्रेसचे माजी आमदार आसिफ मोहम्मद खान यांच्याविरुद्ध आयपीसी कलम १८६/३५३/३३२/३४ अंतर्गत गुन्हा दाखल केलाय.

एमसीडी कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत कोंबडा बनविण्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

वादात सापडलेले माजी आमदार आणि काँग्रेस नेते आसिफ मोहम्मद खान यांना शाहीन बाग पोलिसांनी अटक केली आहे. माजी आमदाराने त्यांच्या फार्म हाऊसबाहेर महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना ओलीस ठेवून गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये ओखला विधानसभेतून काँग्रेसच्या तिकिटावर दोन वेळा आमदार राहिलेले माजी आमदार आसिफ मोहम्मद खान यांनी एमसीडी कर्मचाऱ्यांना ओलीस ठेवून मारहाण आणि गैरवर्तन करतांना दिसले. खरं तर, आसिफ खान आरोप करत होते की, परिसरातील रस्त्यांवर काही काँग्रेस नेत्यांची पोस्टर्स आणि होर्डिंग्ज जाणीवपूर्वक काढली जातात.

या व्हिडिओमध्ये असिफ मोहम्मद खान त्यांच्या फार्म हाऊसबाहेर उघडपणे कर्मचाऱ्यांना लाठ्या-काठ्या मारत असल्याचे दिसत आहे. याशिवाय त्यांच्यावर जबरदस्तीने कोंबडा बनवण्यासाठी दबाव आणत आहेत. जी लोकं कोंबडा होत नाहीयेत त्या लोकांना असिफ मोहम्मद खान लाठीमार करतायेत असं त्या व्हिडिओ मध्ये दिसून येतंय. 

व्हिडिओमध्ये, मागून आणखी काही लोकं एमसीडी कर्मचार्‍यांना कोंबडा होण्यास सांगत आहेत. दुसऱ्या व्हिडिओमध्ये आसिफ रस्त्याने जाणाऱ्यांना शिवीगाळ करतांना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये ते  आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्ला खान यांनाही शिवीगाळ करताना दिसत आहे. वरून असंही बोलतायेत कि, मी एमसीडी कर्मचाऱ्यांना धडा शिकवलाय.

जेंव्हापासून त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला तेव्हा आसिफ मोहम्मद खान यांच्यावर सर्वच स्तरातून जोरदार टीका होतेय….

दुसरीकडे, लाजपत नगर झोनमध्ये तैनात असलेल्या एमसीडीचे इन्स्पेक्टर राम किशोर यांनी स्वत: आणि कर्मचाऱ्यांसोबत गैरवर्तन केल्याची तक्रार दिली.  त्यानंतर पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणणे, कर्तव्यात अडथळा आणणे यासह अन्य कलमांखाली गुन्हा दाखल केला. जिल्हा पोलिस उपायुक्त ईशा पांडे यांनी सांगितले की, शुक्रवारीच तक्रार आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर आता माजी आमदाराला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. तपासानंतर आणखी लोकांना अटक होण्याची शक्यता आहे असं बोललं जातंय.

कोण आहेत आसिफ मोहम्मद खान ??

केरळचे विद्यमान राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांचे आसिफ मोहम्मद खान हे धाकटे बंधू आहेत. तसेच त्यांनी ओखला मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आणि ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य आहेत.

आसिफ मोहम्मद खान यांनी १९९७ मध्ये दिल्ली महानगरपालिकेच्या ओखला प्रभागातून अपक्ष उमेदवार म्हणून पहिली निवडणूक लढवली आणि जिंकली होती. त्यांनी दुसर्‍यांदा नगरपरिषदेची निवडणूक जिंकली आणि २००७ पर्यंत ते नगरसेवक राहिले.  त्यानंतर २००८ ची दिल्ली विधानसभेची निवडणूक ओखला येथून राष्ट्रीय जनता दलाच्या तिकिटावर लढवली परंतु परवेझ हाश्मी यांच्याकडून केवळ ५४१ मतांनी त्यांचा पराभव झाला होता.

पण हाश्मी यांना राज्यसभेवर उमेदवारी दिल्यानंतर, खान यांनी पुन्हा २००९ ची पोटनिवडणूक लढवली आणि विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले. त्यानंतर २०१३ मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.  २०१३ च्या विधानसभा निवडणुकीत ते दुसऱ्यांदा विजयी झाले. त्यानंतर २०१५ ची दिल्ली विधानसभा निवडणूक हरले.

आणि त्यानंतर मात्र २०२० च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने खान यांना तिकीटच दिले नाही. कारण पक्षाने खान यांच्या ऐवजी ओखलाचे माजी आमदार परवेझ हाश्मी यांना उमेदवारी दिली होती…असो आता ते कितीही मोठे असले तरीही नेहेमीच वादात सापडणारे नेते सुद्धा कोणत्या-ना कोणत्या वादामुळे जेलची हवा खाऊ शकतात हे मात्र राजकीय नेत्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे.

 हे हि वाच भिडू :

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.