भगतसिंग सारखं जगणं आणि चे गव्हेरा सारखं मरण हवं असणारा चंद्रशेखर प्रसाद…

ही माझी व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा आहे की भगतसिंग सारखं जगणं आणि चे गव्हेरा सारखं मरण मला यायला हवं… हे वाक्य होतं चंद्रशेखर प्रसाद यांचं.

31 मार्च 1997 रोजी जेएनयुच्या विद्यार्थ्यांना खबर मिळाली की दोन वेळा जे एन यु व छात्र संघाच्या अध्यक्षपदी राहिलेले चंद्रशेखर प्रसाद यांना बिहारच्या सिवानमध्ये भर बाजारात गोळ्या घालून त्यांची हत्या करण्यात आली. चंद्रशेखर प्रसाद हे आपल्या मित्रांमध्ये चंदू या नावाने प्रसिद्ध होते.

चंद्रशेखर प्रसादे आपल्या जे एन यु मधल्या विद्यार्थ्यांना मित्रांना सांगायचे की आपल्या येणाऱ्या पिढ्या आपल्याला प्रश्‍न करतील की जेव्हा सामाजिक ताकद मोठ्या प्रमाणात उभी राहत होती तेव्हा तुम्ही कुठे होता ? ते विचारतील जेव्हा लोक प्रत्येक दिवशी जगण्या मरण्यासाठी झगडा करत होते, आपल्या हक्कांसाठी संघर्ष करत होते आपल्या कमी आवाजात संघर्ष करत होते तेव्हा तुम्ही कुठे होता ? ते आपल्याला प्रश्‍न करतील म्हणून सावध राहा.

त्याकाळात बिहारमध्ये धर्मनिरपेक्षता सामाजिक न्याय आणि मागासवर्गीयांचा मसिहा म्हणून लालूप्रसाद यादव यांच सरकार होतं. चंद्रशेखर प्रसाद यांच्या हत्येने जे एन यु मधले विद्यार्थी पेटून उठले. पेटून उठलेल्या विद्यार्थ्यांचा जमाव न्याय मागण्यासाठी दिल्लीत गेला तेव्हा पोलिसांनी त्यांचे स्वागत गोळ्यांनी केलं. चंद्रशेखर प्रसाद यांच्या हत्येचा आरोप लालूप्रसाद यादव यांच्या पार्टी चे सदस्य शहाबुद्दीन आणि आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर गोळी चालवणाऱ्या पोलिसांसोबत साधु यादव यांच्यावर होता.

राजकारण्यांनी भरलेले खिसे आणि गरीब लोकांचे हाल हे न पहावे झाल्यामुळे चंद्रशेखर प्रसाद यांनी आवाज उठवला जे एन यु मधून त्यांनी विद्यार्थी संघटित केले. महाविद्यालयीन निवडणुका लढवल्या. चंद्रशेखर प्रसाद हे भारताला राजकीयदृष्ट्या एक वेगळे स्वरूप देऊ इच्छित होते आणि भारताचा कायापालट करणार होते. बिहार मध्ये जनसंहार आणि घोटाळे यांचे विरुद्ध 2 एप्रिल 1997 रोजी बिहार मध्ये बंद पुकारण्यात आला होता या बंदा साठी 31 मार्च रोजी संध्याकाळी चार वाजता जी पी चौक वर एक सभा संबोधित करण्यासाठी चंद्रशेखर आणि त्यांचे सहकारी श्यामनारायण आणि इतर सहकारी सुद्धा आले होते पण या ठिकाणी अज्ञात व्यक्तीने येऊन चंदू आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर गोळीबार सुरू केला या गोळीबारात चंद्रशेखर प्रसाद यांचा मृत्यू झाला.

चंद्रशेखर प्रसाद हे भगतसिंग यांसारखे इंग्रजांविरुद्ध लढताना शहीद झाले नाही पण लढताना येणारा मरण ही त्यांची इच्छा होती. भ्रष्टाचारी आणि राक्षसी राजकारण विरुद्ध लढताना ते भर बाजार मारले गेले. चंद्रशेखर प्रसादी अशा युवकांमध्ये होते व्यवस्थेविरुद्ध टक्कर घेण्यात सक्षम होते जे जनतेसोबत उभा राहून भ्रष्ट तंत्र आणि राजकारण बदलून टाकण्याचे स्वप्न बघत होते. जे गरीब मजूर दलित आणि महिलांना संबोधित करायचे पण चंद्रशेखर प्रसाद यांना भारताच्या राजकारणात पसंत नव्हते. चंद्रशेखर प्रसाद हे बिहारच्या जनतेसाठी एक आशेचा किरण म्हणून उगवले होते महाविद्यालयीन राजकारणातून चंद्रशेखर प्रसाद हे पुढे आले पण राजकीय कारकीर्द बहरण्याअगोदरच, आणि सक्षम भारताचा रूप पाहणे अगोदरच चंद्रशेखर प्रसाद यांची हत्या करण्यात आली.

आजही भारतातल्या हायप्रोफाईल केस मधल्या महत्वाच्या केसेस पैकी चंद्रशेखर प्रसाद यांची ही केस हायप्रोफाईल मानली जाते.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.