केंद्र सरकारने सलग सातवं आंतरराष्ट्रीय विमानतळ अदानीच्या ताब्यात दिलंय.

 

पिंक सिटी जयपूर ! जयपूरला सौंदर्याने परिपूर्ण सिटी म्हणली जाते. दरवर्षी इथे लाखो पर्यटक पिंक सिटीचा आनंद घ्यायला येतात. त्यामुळे येथील जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वांच्याच ओळखीचे बनले आहे. पण जरा आता तुम्ही या पिंक सिटीला गेलात तर आता हेच आंतरराष्ट्रीय विमानतळ अदानीचे असेल.

कारण आता या विमानतळाच्या चाव्या अदानी ग्रुपकडे गेल्या आहेत. विमानतळाचे संचालक जे.एस. बल्हारा यांनी सोमवार, ११ ऑक्टोबर रोजी अदानी जयपूर इंटरनॅशनल लिमिटेडचे ​​मुख्य विमानतळ अधिकारी विष्णू झा यांना विमानतळाच्या चाव्या दिल्या.

थोडक्यात अदानी ग्रुपने या विमानतळाचे नियंत्रण भारतीय विमानतळ प्राधिकरणकडून ताब्यात घेतले आहे. अदानी ग्रुप एविएशन सेक्टरमध्ये आपली पकड मजबूत करायच्या रेस मध्ये आहे. अदानीच्या ताब्यात आत्तापर्यंत  ७ विमानतळ आले आहेत, जयपूर या यादीतील ७ वे विमानतळ आहे. अदानी समूहाची उपकंपनी असलेल्या अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेड आता देशातील सर्वात मोठी विमानतळ कंपनी बनली आहे.

अलीकडेच अदानीकडे मुंबईच्या विमानतळाची जबाबदारी देण्यात आलीये अन आता जयपूर.

भारत सरकारमध्ये आणि अदानी समूहामध्ये ५० वर्षांचा करार झाला आहे. सरकारने जयपूर विमानतळ तब्बल ५० वर्षांसाठी भाड्याने दिले आहे.

सरकारच्या म्हणण्यानुसार विमानतळ चालवायची म्हणजे एक मोठी खर्चिक जोखीम आहे. त्यासाठी हे सरकारला झेपत नसेल तर अशा विमानतळाची जबाबदारी एखाद्या खासागी ग्रुप ला देण्यात शहाणपण आहे असं सरकार मानते. आणि मग अशाप्रकारे भारत सरकारने मोठ-मोठ्या खासगी कंपन्या ज्या कि आर्थिकदृष्ट्या मजबूत आहेत, तसेच ज्या कंपन्यांना विमानतळ चालवण्याचा अनुभव असावा अशाच  कंपन्यांना विमानतळ भाडेतत्वावर देण्यासाठी बोली लावते. थोडक्यात बोलीचा लिलाव करते. जी कंपनी बोली योग्य लावते त्यांना एका ठराविक कालावधीसाठी विमानतळ सोपवलं जाते.

देशातील प्रमुख विमानतळांचे मॅनेजमेंट खासगी लोकांच्या हातात देण्यासाठी केंद्र सरकारने २०१९ मध्ये निविदा काढली होती. सरकारने फक्त जयपूरचं विमातळच नाही तर अहमदाबाद, लखनऊ, मँगलोर, गुहावटी, जयपूर आणि तिरुवनंतपुरम ही विमानतळे साठी जगभरातील कंपन्यांकडून बोली मागवण्यात आली होती. यात सर्वाधिक बोली लावली ती म्हणजे अदानीची कंपनी

पण अदानी ग्रुप कडे विमानतळ सोपवण्याचा अर्थ काय ? भारत सरकार विमानतळ चालवू शकत नाही का?

थोडक्यात आता येत्या ५० वर्षीची विमानतळाची जबाबदारी हि अदानी  ग्रुपची असेल. विमानतळावर होणाऱ्या प्रत्येक ऑपरेशनसाठी अदानी ग्रुप जबाबदार असेल. हे विमानतळाची देखभाल आणि त्याचे मॅनेजमेंट देखील. म्हणजेच पब्लिक टू प्रायव्हेट भागीदारी. पण या भागीदारीचा अर्थ असाय कि, अदानी ग्रुप भारत सरकारला हे विमानतळ संचालनासाठी भारत सरकारला ठराविक रक्कम देईल आणि भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या नियम आणि नियमांनुसार विमानतळ चालवेल.

देशातील सर्व विमानतळाची शान आणखी वाढवणार याची खात्री आम्ही खात्री देतो. असा दावा अदानी समूहाकडून करण्यात आला आहे.

पण सरकारच्या सार्वजनिक मालमत्ता घेऊन त्याला विकसित करण्यात अदानी ला काय फायदा होणार ?

जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत असलेल्या अदानींकडे आलेले जयपूर विमानतळ हे सातवे विमानतळ आलं आहे. याआधी अदानींकडे सहा विमानतळांची जबाबदारी आहे. अदानी समुहाने जुलै महिन्यातच मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ताब्यात घेतले होतं. पण आता इतक्या मोठ्या संख्येने अदानीकडे  विमानतळ आहेत म्हणजे साधी गोष्ट नाही. कंपनी आणि सरकारमध्ये ५० टक्क्यांची भागीदारी आणि त्यात अजून विमानतळ चालवण्याचे नियोजन आणि आर्थिक जबाबदारी देखील कंपनीची मग त्यांना यातून फायदा काय मिळणार?

सोप्यात सांगायचं झालं तर, विमानतळ हे असं मध्यम आहे ज्याद्वारे कमाई दोन प्रकारे केली जाते. एरोनॉटिकल सर्व्हिस आणि दुसरं म्हणजे कमर्शियल ऍक्टिव्हीटी. 

म्हणजेच वैमानिक सेवा आणि दुसरी व्यावसायिक कृती. एरोनॉटिकल सर्व्हिसमध्ये विमान कंपन्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधांच्या बदल्यात विमानतळ शुल्क आकारतात. उदाहरणार्थ, विमान कंपन्यांकडून भरलं जाणारं इंधन, मालवाहतूक सेवा असेल यासाठी पैसे आकारले जाते. एअरलाइन्स आपल्याकडून हे पैसे घेत असतात. याशिवाय, विमानतळ चालवणारी कंपनीचं नियंत्रण आणखी एका गोष्टीवर असते ते म्हणजे विमानतळावर असलेल्या सर्व्हिस म्हणजे दुकानं आणि तेथील कॅफे वेगेरे.

आपण पाहतोच कि, विमानतळावर काही मोठी शोरूम्स आणि कॅफे असतात. अशा कॅफे आणि शोरूम्स चे भाडे हे विमानतळ चालवणाऱ्या कंपनीला मिळत असते. भारतात खूप कमी विमानतळे आहेत जिथे विमानतळ चालवणाऱ्या कंपन्या रग्गड फायदा मिळवत आहेत. असाच नफा अदानी ग्रुप देखील कमवेल यात शंका नाही.

सद्याच्या परिस्थितीवरून तरी असंच दिसतंय कि भविष्यात आणखी कितीतरी विमानतळ अदानी-अंबानीच्या नियंत्रणात गेलीच तर आश्चर्य वाटायला नको.

हे हि वाच भिडू :

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.