राहूल गांधी आयकीडो मध्ये ब्लॅक बेल्ट आहेत.. 

मध्यंतरी राहूल गांधी यांचा मच्छिमारांसोबत समुद्रात पोहतानाचा फोटो व्हायरल झाला. या फोटोनंतर राहूल गांधीच्या फिटनेसची चर्चा झाली. काही लोकांनी त्यांच्या ॲब्सचे फोटो देखील प्रसिद्ध केले. 

तो धुरळा बसत नाही तोच आज राहूल गांधींचे पुशअब्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला. 

मागच्या वेळी ज्या लोकांनी राहूल गांधींच्या फिटनेसचं कौतुक करताना धीर धरलेला त्यांनी देखील त्यांच्या या फिटनेसच आज कौतुक केलं. 

थोडक्यात काय तर सोशल मिडीयात सध्या राहूल गांधींच्या फिटनेसने जोर धरला आहे.  साधारण 2017 मध्ये देखील आपल्या अशाच एका गोष्टीमुळे राहूल गांधी चर्चेत होते आणि ती गोष्ट म्हणजे त्यांचा ब्लॅक बेल्ट.. 

राहूल गांधींचा खालील फोटो तेव्हा व्हायरल झालेला. आयकीडो नावाच्या या प्रकारात राहूल गांधी हात आजमावत होते. 

Screenshot 2021 03 01 at 6.05.50 PM

आत्ता मुख्य मुद्दा फिटनेसचा चालला आहे म्हणूनच हा विषय, हे आयकीडो काय असतं आणि या प्रकारात राहूल गांधी यांनी कुठेपर्यन्त झेप घेतली आहे… 

आयकीडो या क्रिडाप्रकाराचा जन्म जपानमधला. आयकिडो या खेळाला बंधुत्वाचा रस्ता वगैरे टाईप देखील म्हणलं जातं. म्हणजे या खेळात एकमेकांचा द्वेष करायचा नसतो तर एकत्र राहण्यासाठी व आत्मसंरक्षणासाठी हा खेळ असतो. या खेळात एकमेकांना उचलणे, फेकणे, जॉईन्ट लॉकिंग सारखे वेगवेगळे प्रकार असतात. 

सोबतच यात हत्यार देखील वापरले जात. म्हणजे जपानची सुप्रसिद्ध समुराई तलवार, चाकू वगैरे. १९०० च्या काळानंतर हा प्रकार प्रसिद्ध झालं. आपलं कराटे आणि तायक्वांदो टाईपचाच हा खेळ. मोरहेई येशिबा नावाचे व्यक्ती होते त्यांनी हा प्रकार सुरू केला.  हा माणूस तायक्वांदोत बाप होता. त्यांनी खूप परिश्रम करून हा खेळ सुरू केला. येशिबा यांनी हा खेळ सुरू केल्यानंतर एक मंत्र दिलेला. तो म्हणजे एकदा शिकलं आणि झालं अस नाही. वारंवार खेळत राहिल्यानेच यात मास्टरी मिळवता येईल. 

आयकीडो चा उदय आणि इंडियन कनेक्शन.. 

आयकीडो मध्ये भारताचं कनेक्शन आहे. भारताच्या ध्यान धारणेची परंपरा यात आहे. येशिबो यांनी चीन मध्ये विकसित असणारे मार्शल आर्ट्स आणि जपानमध्ये असणारे मार्शल आर्ट्स यांचा सुवर्ण संगम साधून ही कला विकसित केली. त्याच वेळी भारतात असणारी योग व ध्यानधारणा यांचा समावेश देखील यामध्ये करण्यात आला. 

कुंफू, कराटे आणि आयकीडो यात बेसिक फरक काय आहे..? 

यातला बेसिक फरक आहे ते या दोन गोष्टी कशासाठी शिकायच्या.  पिक्चरसारखे स्टंट मारून एका दमात पाच पन्नास लोकांना गोळा करायचं असेल तर कूं फू आणि कराटे हे पर्याय आहेत. पण आत्मसंरक्षणासाठी शिकणं आणि शरीरातील प्रत्येक अवयवाचा व्यायाम करणं हा उद्देश असेल तर आयकीडो आहे म्हणजे एकीकडे आपल्या सुर्यनमस्कार किंवा योगा सारखा देखील प्रकार आणि दुसरीकडे गरज पडली तर पुढच्याला उलटा करण्याचा देखील प्रकार असा सुवर्णमध्य साधलेला आहे. 

आत्ता सर्वात महत्वाचा मुद्दा राहूल गांधींनी या खेळात कितपत मजल मारली आहे. 

आयकीडो सुरवात करणाऱ्याकडे व्हाईट बेल्ट असतो.  ही १२ वी रॅंक.  त्यानंतर यल्लो, रेड, ग्रीन अशी रॅंक वाढत जाते. सर्वात शेवटी व एक नंबरची रॅंक आहे ती ब्लॅक बेल्टची. राहूल गांधी यांच्याकडे देखील ब्लॅक बेल्ट आहे. याचा खुलासा राहूल गांधी यांनी विजेंदर सिंह यांच्या एका प्रश्नावर केला होता. यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की ते ब्लॅक बेल्ट आहेत. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.