अजान ऐकताना “अल्लाह्..” इतकचं कळतं… पुढे नक्की काय म्हणतात ते माहित आहे का..?

भोंगा..भोंगा..भोंगा…

दिवसभर मिडीयात तेच चालू आहे. एकजण म्हणत होता मिडीयाचा भोंगा कोणतर बंद केला पायजे. तावातावाने चर्चा सुरू झाल्यावर त्या चर्चा अजाण आणि भोंगा यावर जरा व्यवस्थित होवू लागल्या. समोरचा म्हणाला,

ते सगळं ठिकाय पण नेमका प्रॉब्लेम काय आहे माहिताय का…? तर ते अजान असतय अरबी मध्ये त्यामुळं काय होतय ते काय बोलतेत ते कळत नाय. आपल्या ओळखीच, माहितीचं असलं की जरा बर पडतय…

चर्चा झाली पण गड्याचा मुद्दा बरोबर होता. म्हणजे कसय तर अजान मध्ये नेमकं म्हणतात काय तेच आपल्याला माहिती नसतय. बरं अजान असते कशी आणि का हे पण माहिती नसतय. ते भोंग्यावरून द्यायची का नाही तो नंतरचा विषय पण बेसिक सॉल्व्ह केलं पाहीजे म्हणून हा विषय..

तर इस्लाम धर्मात दिवसातून ५ वेळा नमाज पडली जाते.

पहिली नमाज ही सूर्योदयापुर्वी पडली जाते. तिला नमाज-ए- फजर म्हटले जाते. दुसरी नमाज ही सूर्य उगवल्यानंतर म्हणजे सूर्य डोक्यावर आल्यावर पडतात. तिला नमाज-ए- हुजूर म्हटले जाते. तिसरी नमाज जी सूर्यास्ताच्या काही वेळा पूर्वी होते तिला नमाज-ए- असर म्हटले जाते.

चौथी नमाज ही सूर्यास्तानंतर लगेच होते तिला नमाज ए मगरीब म्हटले जाते. तर दिवसातील शेवटच्या नमाजला नमाज -ए- इशा म्हटले जाते. ही नमाज सूर्यास्तानंतर साधारण दोन ते अडीच तासांनी पडली जाते.

अजानचा अर्थ होतो

अल्लाहु अकबर, (दोन वेळा)

अल्ला / ईश्वर सर्वश्रेष्ठ आहे,

अश-हदू अल्ला-इलाहा इल्लल्लाह

अल्ला / ईश्वर एकचं आहे त्या शिवाय दुसरा कोणी अल्ला नाही.

अश्हदु अन-न मुहम्मदर्रसूलुल्लाह

मी ग्वाही देतो की मुहम्मद हा ईश्वराचा प्रेषित आहे

हय-य अलस्सलाह। हय-य अलस्सलाह।

नमाज पडण्यासाठी, आल्लाची प्रार्थना करण्यासाठी एकत्र या.

हय-य अलल फलाह। हय-य अलल फलाह।

यशाकडे / मुक्तीकडे या जाण्यासाठी एकत्र या

अल्लाहु अकबर। अल्लाहु अकबर।

अल्ला / ईश्वर सर्वश्रेष्ठ आहे,

ला इला-ह इल्लल्लाह

एका ईश्वरा/ अल्ला शिवाय दुसरा कुणी ईश्वर नाही

असिस्लातु खैरुम्मिनन्नौम, अस्सलातु खैरुम्मिन्नौस।’

झोपे पेक्षा प्रार्थना अधिक योग्य

अजान का दिली जाते ?

मशिदीच्या बाहेर म्हणजेच घरी, दुकानात, ऑफिस, रस्त्यावर असं कुठेही असणाऱ्या लोकांना माहिती व्हायला पाहिजे की, पुढच्या १० ते १५ मिनिटांत मशिदीत सामूहिक नमाज पडण्यात येणार आहे. जे लोक मशीद मध्ये जाऊन नमाज पडू शकतात त्यांच्यासाठी अजान दिली जाते.

थोडक्यात सांगायचं म्हणजे ईश्वराची प्रार्थना करण्यासाठी दिलेली हाक म्हणजे अजान होय.

मशिदीवरून मौलवी बांग देत नाही. त्यासाठी एक वेगळ्या व्यक्तीची निवड केली जाते त्याला ‘बांगी साहब’ असं भारतात म्हणतात तर अरेबिक भाषेत मुअझ्झीन असं म्हटले जाते. तेच दिवसातून ५ अजान देतात. एक अजान साधारण ३ ते ४ मिनिट दिली जाते.

यानंतर नमाज पडण्यासाठी लोकं मशीद मध्ये जमतात. प्रत्येक मशीद मध्ये एक मौलवी असतात त्यांना इमाम साहब म्हणतात. नमाजावेळी ते सगळ्यात पुढे असतात. त्यांना इमाम साहब म्हणण्याचे कारण म्हणजे ते इमानत करतात. त्याचा अर्थ होतो प्रतिनिधित्व. ते नमाज पडणाऱ्यांचे प्रतिनिधित्व इमाम करतात.

नमाज ही एकत्रित येऊन पठण केली जाते. यात कुराणातील श्लोक इमाम म्हणतात. इमाम जी प्रार्थना म्हणतात त्याच्यामागे मनातल्या म्हणत इतर लोकं म्हणत असतात. 

नमाजचे इस्लाम धर्मातील महत्व

याबाबत समीर दिलावर शेख यांनी बोल भिडूशी बोलतांना सांगितले की,

इस्लाम धर्मात ५ महत्वाचे तत्व सांगितले आहे. त्यातले एक म्हणजे दिवसातून ५ वेळा नमाज पडणे. मुस्लिम धर्मियांना दिवसातून ५ वेळा नमाज पडणे बंधनकारक आहे. ते पण एकत्र येऊन.

नमाज पडल्याने तुम्ही सत्य मार्गावर लागाल. तसेच ईश्वराकडे जाण्याचा मार्ग सापडेल असंही कुराणात सांगितलं आहे. ईश्वराची उपासना म्हणजे नमाज होय. लहान मुलांना सोडून नमाज पडणे प्रत्येक मुस्लिम धर्मीयाला बंधनकारक आहे.

कुराण मध्ये बऱ्याच ठिकाणी नमाज संदर्भात उल्लेख आढळतो. तुमचा ईश्वर उपासनेच्या लायक आहे. तुम्ही एकाच ईश्वराची उपासना करा. ईश्वराने ऍडम पासून मोहमद्दा पर्यंत जगाच्या कानाकोपऱ्यात एक लाख २४ हजार प्रेषित पाठविले. आणि त्या प्रेषितासोबतच त्या ईश्वराची प्रार्थना करण्याची वेगवेगळी पद्धत होती.

त्यामुळे मोहम्मद पैगंबरांनी इस्लाम धर्म स्थापन केला तेव्हा ईश्वराची उपासना करण्याची पद्धत आणली त्याला नमाज असं म्हटलं जातं. कुराण मध्ये नमाज पडणे सोडू नका असं सांगितलं आहे.

नमाज हा पर्शियनय शब्द आहे अरबी मध्ये सलात म्हणतात. तर अजान हा शब्द अरेबियन आहे.

अजान म्हणजे प्रार्थना करण्यासाठी दिलेली दवंडी. त्यामुळे कुराण मध्ये अजान विषयी काही विशेष नाहीये. सकाळची नमाज ही तीन मिनिटाची असते तर सर्वात मोठी नमाज ही रात्रीची असते.

हे ही वाच भिडू  

Leave A Reply

Your email address will not be published.