उर्दू फक्त मुस्लिमांचीच भाषा म्हणत असला तर तुम्ही चुकताय..

आज काल आपल्याकडं कशाचा इशू होईल याचा नेम नाही राहिलाय. आता विषय उकरून काढण्यात आलाय हल्दीरामच्या पाकिटावर उर्दूत मजकूर छापण्यावरून. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, सुदर्शन न्यूज टीव्हीची एक रिपोर्टर हल्दीरामच्या दुकानात एका महिला कर्मचाऱ्याशी  हुज्जत घालताना  दिसत आहे. 

नवरात्रीत उपवास करणाऱ्या लोकांसाठी बनवलेल्या पदार्थाच्या पाकिटावर उर्दूमध्ये माहिती का लिहिली होती ?

असा प्रश्न ती रिपोर्टर ती हल्दीरामच्या  कर्मचाऱ्यांना विचारताना ऐकू येत आहे. बार इथंच ती थांबली नाही तिने उर्दूचा संबंध जोडत विचारलं की तुमच्या या चिवड्यामध्ये “प्राण्यांचे तेल, गोमांस तेल” आहे का? जे तुम्ही उर्दूमध्ये  लिहून लपवताय.

सुरवात झाली आणि मग लगेच इशू ट्रेंडिंग. हल्दीरामला शिव्या घातल्याच पण त्याबरोबरच लोकांची जुबां उर्दूवर पण घसरली. पार उर्दू परधर्माची ते परदेशाची भाषा असं म्हणत उर्दूचं ट्रोलिंग चालू झालं. पण त्यांचा इतिहास पुन्हा कच्चाच.

त्यामुळं तुम्ही पण आधी इतिहास बघा..

सुरवात करू उर्दूचा उगम कुठं झाला इथपसनं

भाषा तज्ज्ञांच्या मते, उर्दू भाषेचा उगम भारतातच अनेक शतकांपूर्वी झाला होता. भारतातील तीन ठिकाणी उर्दू डेव्हलप झाल्याचे रेफरन्स आढळतात.

सुरवात भारताच्या पंजाबमध्येच झाल्याचं आढळतं. इंडियन एक्सप्रेसच्या एका रिपोर्टमध्ये पंजाब युनिव्हर्सिटीचे प्रो. अली अब्बास सांगतात की, ऐतिहासिक संदर्भ असे दर्शवतात की उर्दूची उत्पत्ती भारतातील पंजाब राज्यात झाली होती.

महान कवी अमीर खुसरो यांनी त्यांच्या ‘घुरत-उल-कमाल’ या पुस्तकात असे लिहिले होते की मसूद लाहोरी जो एक प्रसिद्ध कवी होता त्याने ११ व्या शतकात  हिंदवी (उर्दू) मध्ये कविता रचली होती जीला  त्यावेळी देहलवी देखील म्हणत. 

या कवीने त्याचा आयुष्याचा बराच काळ लाहोरमध्ये व्यथित केला होता. त्यामुळे जरी ही कविता लाहोरमध्ये लिहली गेली असली तरी तेव्हा लाहोर हा भारताचाच भाग होता .

उर्दूचे काही मूळ शब्द फारसी आणि अरबी भाषेतून आले असले, तरी भारतात जेव्हा उर्दू डेव्हलप होत होती तेव्हा यातले अनेक शब्द भारतात उर्दू भाषेत नव्याने आले.

उर्दूला तिचं उर्दू हे नाव मिळण्यापूर्वी तिला  हिंदुस्थानी, हिंदवी, देहलवी आणि रेखता या नावांनीही ओळखले जात होते.

उर्दू उजवीकडून डावीकडे लिहिली जाते, तशीच पंजाबीमधली शाहमुखी उजवीकडून डावीकडे लिहिली जायची.

त्यामुळे फारसी लिपी असूनही  उर्दू ही एक भारतीय भाषा आहे. कारण देशाबाहेरून आलेल्या लिपींमध्ये लिहिलेल्या  भारतीय भाषांची अनेक उदाहरणे आहेत.  उदाहरणार्थ, पंजाबी शाहमुखी भाषा देखील पर्शियन लिपीत लिहिली जाते.

दिल्लीमध्ये पण उर्दूची जडणघडण झाली.

१२व्या ते १६व्या शतकापर्यंतच्या ‘दिल्ली सल्तनत’च्या काळात आणि नंतर १६व्या शतकापासून १९व्या शतकापर्यंत दिल्लीतील ‘मुघल साम्राज्या’च्या काळात दिल्लीत उर्दूचा विकास आणि भरभराट झाल्याचं  इतिहासकार सांगतात. अनेक दरबारी कवींनी आपल्या कवितेत ही भाषा वापरली होती. यात मिर्झा गालिब आणि शेवटचा

उर्दूच्या जडणघडणीत आपल्या दख्खनचे पण योगदान मोठे आहे. 

जेव्हा दिल्ली सल्तनत आणि नंतर मुघल साम्राज्याने दख्खनकडे आपला मोर्चा वळवला तेव्हा दिल्लीतील उर्दू भाषिक लोकांनी दक्षिणेकडे ही भाषा पसरवली. त्यामुळे दक्षिणेतील प्रामुख्याने महाराष्ट्र, कर्नाटक,  तेलंगणा, केरळ आणि तामिळनाडूचा या दख्खनच्या राज्यांमध्ये उर्दू विकसित झाली. भाषेने या राज्यांतील स्थानिक भाषांचे अनेक शब्द देखील घेतले आणि उत्तरेकडील उर्दू भाषेपेक्षा थोडी वेगळी असलेली ‘दखनी’ भाषा निर्माण झाली.

आपल्या महाराष्ट्राचे पण दखनी उर्दू निर्माण करण्यात मोठे योगदान आहे.

जेव्हा  मुहम्मद-बिन-तुघलकने  १३व्या शतकामध्ये आपली राजधानी दिल्लीहून दौलताबाद किंवा देवगिरी किंवा देवगिरी (आजचे औरंगाबाद) येथे हालवली. तेव्हा दिल्लीच्या स्तलांतरित केलेल्या लोकांनी  उर्दू  उर्दू भाषा महाराष्ट्रात पसरवली. मग इथंही भाषा हळूहळू विकसित होत गेली आणि अनेक नवीन शब्द, जे नॉर्थसाइडमध्ये वापरले जात नव्हते ते उर्दूचा भाग बनले.

आता इतिहास तर झाला पण सरकारी दरबारात आज उर्दूचा स्टेटस काय आहे?

तर हल्दीरामच्या पाकिटांचं सोडा आपल्या चलनी नोटांवर सुद्धा तुम्हाला उर्दू दिसेल. काश्मीर, तेलंगणा, उत्तर प्रदेश, बिहार, नवी दिल्ली आणि पश्चिम बंगाल या राज्यांत आजही उर्दू अधिकृत भाषांपैकी एक आहे.

त्यामुळे आता इतिहास तर सांगितला. आता बाकी तुम्ही तुमचं मत ठरवा.आणि शेवटचं म्हणजे उर्दूचा विषय निघाला आणि शायरी होणार नाही असं कसं होईल. 

अभी है वक़्त संभालो समाज को लोगों
तमाम क़द्रों का ढहना कोई मज़ाक़ नहीं

बाकी शायरीचा शायर माहित नये ते तेवढं तुम्ही कमेंट करून सांगा .

Leave A Reply

Your email address will not be published.