या मास्तरीन बाईंनी शाळेतल्या बेघर मुलांसाठी गेल्या ६ वर्षात १५० घरं बांधून दिलीत.

रस्त्यावर राहणाऱ्या मुलांचं सगळ्यांनाच वाईट वाटत. नाही का ? मदत म्हणून आपण चार पैसे ही त्यांच्या हातावर ठेऊ पण पुढं काय ते रस्त्यावरच राहतात, आणि आपण त्या मुलांकडं पाठमोर होऊन आपल्या रस्त्याकडं चालू लागतो.

पण केरळ मध्ये मात्र एका शाळेच्या बाईंनी अशा मुलांकडं पाठ फिरवली नाही तर त्यांना त्यांच्या हक्कच घर मिळवून देण्याचा प्रयत्न केला. आणि एक एक करत या बाईंनी किती घर बांधावीत ? तर तब्बल १५० घर बांधली.

या बाईंचं नाव आहे मिस लिसी चक्कलक्कल. या बाईंनी बेघर मुलांना स्वतःच हक्काचं घर मिळवून देण्यासाठी जी पायाभरणी केली त्याचीच हि गोष्ट. 

तर केरळमधल्या कोची इथं थोप्पुम्पडी नावाच्या गावात अवर लेडी कॉन्व्हेंट गर्ल्स नावाची शाळा आहे. त्या शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर लिसी चक्कलक्कल आहेत. साधारण सहा वर्षांपूर्वी सिस्टर लिसीला त्यांच्या शाळेत शिकणाऱ्या ८ वीच्या मुली बेघर झाल्याची माहिती मिळाली. त्या विद्यार्थिनीचे वडील वारले होते आणि कुटुंब कर्जबाजारी झाले होते. अशातच त्यांचं घर पण गेलं.

हे लिसी बाईंना समजलं. दुःख करण्यापेक्षा आपण काहीतरी करूया असं त्यांना वाटलं. त्यांनी त्यांच्याच शाळेत शिकवणाऱ्या शिक्षिका लिली यांना सोबत घेऊन घर बांधण्याचा उपक्रम सुरु केला. त्यांनी हे  घर उभारण्यासाठी जे पैसे लागतात ते शाळेचे शिक्षक, विद्यार्थी, शेजारी आणि इतरांकडून गोळा केले. आणि शेवटी त्यांच्या प्रयत्नांना यश आलं. त्यांनी त्यांच्या विद्यार्थिनीसाठी आणि तिच्या कुटुंबासाठी ६०० चौरस फुटांचे घर बांधून दिलं.

या कामातून लिसी आणि लिली बाईंना आत्मविश्वास आला की आपण ज्यांना घर नाहीत अशांसाठी घर बंधू शकतो … आणि यातूनच उभा राहिला हाऊस चॅलेंजिंग प्रोजेक्ट

२०१४ मध्ये जेव्हा लिसी बाईंच्या शाळेचा प्लॅटिनम ज्युबली कार्यक्रम होता त्या दिवशीच त्यांनी हाऊस चॅलेंजिंग प्रोजेक्ट सुरु करण्याचा निर्धार केला. त्या कार्यक्रमात त्यांनी तिथं जमलेल्या पालक, शाळेच्या ट्रस्टी तसेच मान्यवरांना हा प्रोजेक्ट सुरु करण्यासाठी आर्थिक मदत मागितली. त्यांचं हे आवाहन ऐकून बऱ्याच लोकांनी त्यांना आर्थिक मदत केली. काही कामगारांनी त्यांना मोफत बांधकाम करून दिलं. लोकांनी जसं जमेल तसं घरासाठी लागणाऱ्या हरेक वस्तू या प्रोजेक्ट मध्ये दान करण्यास सुरुवात केली. अशाप्रकारे या दोन्ही शिक्षिकांनी सहा वर्षात त्यांच्याच शाळेतल्या तब्बल ८० विद्यार्थ्यांना घरं बांधून दिली.

त्यांच्या या उपक्रमाबद्दल सिस्टर लिसी चक्कलक्कल म्हणतात की,

आम्ही आमच्या स्वतःच्या विद्यार्थ्यांसाठी हा प्रकल्प सुरू केला, जेणेकरून त्यांना मूलभूत सुविधा मिळाव्या. आमचं स्वप्न आहे की आपला समाज ‘बेघर मुक्त’ असावा.

असाच संकल्प जर प्रत्येकाने केला तर रस्त्यावर राहणारी कुटुंब निदान निदान कमी होतील. कारण स्वतःच्या घरात राहण्याएवढा आनंद जगात दुसऱ्या कोणत्याच गोष्ट नसावा हे या गोष्टतून तरी समजतच. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.