अफूसाठी भांडले होते चिनी आणि इंग्रज..

जगाच्या इतिहासात युद्ध कशामुळे झाली? साहजिक ती काही नळावरची भांडण नाहीत, ती जागतिक युद्ध आहेत म्हणल्यानंतर ती महत्वाच्या कारणासाठीच झाली असतील. पण बऱ्याचदा अस नसतं भिडू. खूपसारी युद्ध नळावरच्या भांडणांना लाजवतील अशा कारणांमुळे झाली आहेत. वरवर वाचताना हि कारणे खूप लहान वाटतील पण त्यापाठीमागची कारणे वाचली की, क्या बात क्या बात सारखी फिलींग येते.

तर जगाच्या युद्धांच्या लिस्टमध्ये अस एक युद्ध आहे जे अफुमळे झालं होतं. चीन आणि इंग्रजांमध्ये १९ व्या शतकात  झालेल्या या युद्धाची ओळख अफूसाठी झालेले युद्ध अशीच करण्यात आली आहे.

१९ व्या शतकात इंग्लड आणि चीन यांच्यात दोन युद्ध झाली होतीत. अफूचा व्यापार हा त्या काळात व्यवसायातील एक प्रमुख दुवा होता. अफूच्या व्य्पारावरील चीनी निर्बंध हे या युद्धाचे तत्कालीन कारण होते. चीनची बाजरपेठ हुकमी बाजारपेठ होती. इंग्रज हे नेहमीच बाजारपेठ काबीज करण्यासाठी प्रयत्न करणारे तसाच प्रयत्न त्यांनी चीनच्या बाजारपेठे बाबतीत हि केला. पण चीन यांनी तो थोपवण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न केले होते हेच या अफूच्या युद्धाचे खरे कारण होय.

१७ व्या शतकाच्या दरम्यान चीन इंग्लड सोडले इतर सर्वच देशांशी व्यापार करत होता. हा व्यापार चीनी व्यापाऱ्यांच्या श्रेणीमार्फत चालायचा, या पद्धतीला “कोहाँग” असे म्हणत. या पद्धतीने पाश्चात्यांच्या व्यापारावर अनेक निर्बंध घातले होते त्यामुळे व्यापारी असंतुष्ट होते.

त्यातच युरोपात औद्योगिक क्रांती झाली होती आणि अशा परीस्थितीत चीनची बाजारपेठ मिळवण्याचे प्रयत्न चालू होते. पाश्चात्त्य व्यापारावरील निर्बंधांवरून तसेच अफूच्या व्यापारावरून ब्रिटिशांचे चिनीशी वारंवार खटके उडू लागले होते.

चीन आणि ब्रिटीश यांच्या व्यापारातील केंद्रबिंदू होते अफू.

चीन मध्ये अफूचे व्यसन प्रचंड प्रमाणात फोफावत होते. याची चिंता चीन शासनास होती, त्यातच १७९५ ते १८३५ या काळात हा व्यापार थेट पाचपटीने वाढला होता. शेवटी चीनने या व्यसनाचे निर्मुलन होण्यासाठी व्यापारावर कडक निर्बंध घातले. पण आज जसा आपल्याकडे बंदी असणाऱ्या अनेक गोष्टींचा सरास व्यापार चोरट्या मार्गाने होतो तेच तेव्हा हि झाले. अफूच्या वाढत्या प्रभावामुळे, भ्रष्ट अधिकारी, व्यापारातील मोठा फायदा अशा अनेक कारणांनी हा व्यापार छुप्या मार्गाने सुरूच राहिला आणि चीनी शासनाचे सर्व उपाय निष्फळ ठरले.

ईस्ट इंडिया कंपनीची चिनी व्यापाराची मक्तेदारी संपून १८३४ मध्ये तो सर्व ब्रिटिशांना खुला झाला, तेव्हा ब्रिटिश व्यापाऱ्यांच्या वतीने चीनशी बोलणी करण्यासाठी इंग्‍लंडच्या शासनाने लॉर्ड नेपिअरला पाठविले.

चिनशी गोडीगुलाबीचे संबंध ठेवावयाचे परंतु चिनमधील कायद्यांना खो देऊन ब्रिटिशांचे बस्तान मात्र पक्के बसवावयाचे व अफूच्या व्यापाराचे फायदे मिळवावयाचे, हे नेपिअरचे धोरण होते. चिन्यांच्या हे लक्षात आले कँटनच्या चिनी अधिकाऱ्याने नेपिअरला हद्दपार केले.

तेव्हा ब्रिटिश शासनानेच चीनवर दडपण आणल्यास चीनशी चालणाऱ्या खुल्या व्यापाराचा फायदा व अफूच्या चोरट्या व्यापाराचा लाभ दोन्हीही मिळतील, असे वाटून इंग्रज व्यापाऱ्यांनी त्या दिशेने हालचालींस प्रारंभ केला.

पाश्चात्त्यांची कायदेशीर व्यापारात गुंतलेली जहाजेच अफूची चोरटी आयातही करतात, शिवाय त्यांवरील अधिकारी चीनच्या किनाऱ्याचे चोरून नकाशेही काढतात, हे पाहून यापुढे पाश्चात्त्यांची गय करावयाची नाही, असे ठरवून चीन शासनाने १८३८ मध्ये लिनद्झी श्यू याची कँटनचा आयुक्त म्हणून नेमणूक केली.

ब्रिटिश व्यापाऱ्यांनी अफूचे साठे तीन दिवसांत आपल्या स्वाधीन करून पुन्हा अफू न आणण्याचे आश्वासन न दिल्यास ब्रिटिशांचा सर्व व्यापार बंद होईल,’ असा हुकूम निघाला.

तो धुडकावला जाताच लिनद्झी श्यूने ब्रिटिशांना कँटनमध्ये अडकवून ठेवले व ब्रिटिश वखारींचा अन्नपाणीपुरवठा तोडला. याच सुमारास नेपिअरच्या जागी कॅप्टन एलियट आला. त्याने ब्रिटिश सरकार नुकसानभरपाई देईल, असे व्यापाऱ्यांना आश्वासन देऊन सर्व अफू लिनद्झी श्यूच्या स्वाधीन केली व ब्रिटिश व्यापाऱ्यांना सुरक्षिततेसाठी हाँगकाँगला हलविले. चीनशी किफायतशीर करार झाल्यास अफूचा व्यापार थांबविण्याची इंग्‍लंडची तयारी होती. चिनी शासक त्यांना सवलती देण्यास तयार नव्हते. तेव्हा प्रत्यक्ष युद्ध करूनच हवे ते मिळवावे, असे ब्रिटिशांना वाटू लागले.

ह्याच सुमारास हाँगकाँगच्या काही ब्रिटिश खलाशांची चिन्यांशी चकमक होऊन एक चिनी मरण पावला. गुन्हेगारास स्वाधीन करण्याची चिन्यांची मागणी ब्रिटिशांनी फेटाळताच चीनने ब्रिटिशांविरुद्ध युद्ध पुकारले. हेच अफूचे युद्ध (१८३९–४२). चे कारण ठरले. अखेर ब्रिटिश आरमाराने चिन्यांचा ठिकठिकाणी धुव्वा उडवून निंगपो,अ‍मॉय, शांघाय, कँटन, फूजी आदी शहरे झपाट्याने काबीज केली.

शेवटी मांचू सरकारला १८४२ चा नानकिंगचा तह स्वीकारावा लागला. त्यानुसार इंग्‍लंडला नुकसानभरपाई म्हणून २१० कोटी डॉलर व हाँगकाँग मिळाले. याबरोबरच कँटन, अ‍मॉय, फूजो, निंगपो व शांघाय ही बंदरे ब्रिटिश व्यापाराला मोकळी केली.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.