नाशिकच्या काकांनी दंडाला चमचे चिटकवून अख्या महाराष्ट्राला वात आणलाय

भल्या पहाटे एक बातमी आली. नाशिक नगरीतील अरविंद सोनार यांनी कोव्हीशिल्ड लसीचा दुसरा डोस घेतल्या नंतर शरीराकडे लोखंड, स्टील आकर्षित होत आहे.

यानंतर अरविंद सोनार यांच्याकडे बातम्यांचा मोर्चा वळणार नाही हे शक्य आहे का?

बातमी वाचून त्याखाली कमेंट केली नाही तर तो फाउल समजण्यात येतो. मग काय फेसबुक वापरकर्ते अरविंद काकांची तुलना थेट हॉलीवूडच्या ‘एक्स मॅन सिरीज’ मधील मॅग्नेटोशी करत आहेत.

तर पिक्चरमधला मॅग्नेटोकाका हा प्रोफेसर एक्सचा बेस्ट फ्रेंड आहे पण दोघांच्यात बऱ्याचदा तात्विक वाद होत असतात. कॉमिक्स मध्ये असताना सुरवातीला त्याला व्हिलन म्हणून पण दाखवलेलं. पण आज तो अँटी हिरोचा सुपर हिरो झालाय. मॅग्नेटो काकचा इतिहास सांगताना म्हणतात की तो म्हणे हिटलरच्या ज्यू हत्याकांड मधून वाचून आलाय. त्यामुळे ज्यू लोकांचा तारणहार म्हणून देखील त्याला ओळखतात.. पण आपल्या काकांचा या स्टोरीशी काही संबंध नाही.

मॅग्नेटोकडे लोखंड आकर्षित करून घेण्याची शक्ती असते. त्यामुळे त्याला प्लास्टिकच्या जेल मध्ये ठेवण्यात येते. अशा मॅग्नेटोची तुलना अरविंद सोनार यांच्याशी करण्यात येतीये.

चुंबक स्टीलच्या वस्तूंना आकर्षित करून घेत नाही. मात्र ही साधी गोष्ट न्यूज चॅनलच्या लक्षात कशी आली नाही अशी विचारणा सुद्धा नागरिक करत आहेत.

नाशिक मधील अरविंद सोनार यांनी कोव्हीशिल्ड लसीचा दुसरा डोस घातल्यानंतर हाताला लोखंडी वस्तू चिकटत असल्याचा अजब प्रकार समोर आल्याची बातमी एबीपी माझाने दिली.

त्याखाली एक हजार पेक्षा जास्त फेसबुक वापरकर्त्यांनी कमेंटचा रतीब लावला आहे.

अक्षय भिंगारदिवे म्हणतात,

काका तर मॅग्नेटो झाले आहेत. साला कोरोना प्रतिबंध लस आहे की म्युटंट बनवायची व्हॅक्सिन? कोरोना संपल्यावर एक्स-मॅन सिरीज सुरु होणार वाटत आता.

मिलिंद देशमुख म्हणतात,

आम्ही पण दोन डोस घेतले पण आयर्न मॅन झालो नाही.

सागर देशपांडे म्हणतात,

शेवटी iron man ultra max pro बनियन मध्ये सापडला.

राहुल दुखाते म्हणतात,

X men can wait …Our own desi Magneto

तर सर्जेराव जाधव म्हणतात,

तरी बर..लस दंडात घेतली आहे

मयूर बनकर म्हणतात,

बाबा नी गलती न X-Man च डोज घेतलेल आहेत…… बस काही दिवसात X Man सारखा हाथा तुन ब्लेड काढण्याचं पण व्हिडिओ व्हायरल करतील …. मी काय म्हणतो मार्वेल मध्ये आता काही सुपर हीरो गायब झालेले आहेत तर आपण बाबा ला पाठऊ शकतो काय…. तुमचं काय मत आहेत सांगा

कोरोनाची लस घेतल्यानंतर शरीर झाले लोहचुंबक, नाशिकच्या आजोबांचा अजब दावा अशी बातमी टीव्ही ९ मराठीने दिली आहे.

त्याखाली कमेंट करत संदीप राजगोर म्हणतात,

लस दिली की फेवेक्विक.

अनिक शेख म्हणतात,

काकांनी चुकून रोबोटची लस तर घेतली नाही ना.

नाशिक मधील प्रकार कोरोना लस घेतल्यानंतर शरीराला चुंबकत्व ही बातमी सकाळने दिली आहे.

त्यावर अवदूत देवकुळे म्हणतात,

आयरमॅन नंतर चमचेमॅन.

अभिनंदन ओहारा म्हणतात,

X men found Magneto sapadla waiting for wolverine

हा माणूस आहे की, चुंबक? पाहा कशी भांडी याच्या अंगाला चिकटतायत अरविंद सोनार यांच्या संदर्भात झी २४ तासने ही बातमी दिली आहे.

त्यावर अमोल खारतोडे म्हणतात,

काका पहिली अंघोळ करा संतूर साबणाने स्टील पण चिटकणार नाहीये, आणि तारुण्यपणा यईल.

सागर काळे म्हणतात,

लस ऐवजी इंजेक्शन मध्ये फेविक्वीक तर दिले नसेल.

सिद्धार्थ घाडीगावकर म्हणतात,

अरे हा तर रोबोट पिक्चर मधला चिठ्ठी चा भाऊ आहे.

याबाबत बोल भिडूने इंडियन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्रचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांच्याशी संपर्क केला. तेव्हा ते म्हणाले, मनुष्याच्या शरीरात कुठल्याही औषधाने, इंजेक्शने चुंबकीय शक्ती निर्माण होत नाही.

कुठल्याच लसीने चुंबकीय शक्ती निर्माण करत नाही. लस घेतल्याने लाल रक्तपेशीवर परिमाण होत नाही. त्यामुळे शरीरात चुंबकीय तयार होत नाही. चुंबक वर्षभर जरी खिशात घेवून फिरले तर शरीरात चुंबकीय शक्ती तयार होणार नाही.

शरीरातला लोखंड चीपकते हा प्रकार फेक आहे. काही दिवसापूर्वी उत्तरप्रदेश मध्ये सुद्धा असाच प्रकार घडल्याचे डॉ. अविनाश भोंडवे यांनी सांगितले.   

नाशिक महापालिकेच्या  वैदकीय पथकाने अरविंद सोनार यांची घरी जाऊन तपासणी केली आहे. आरोग्य विभागाकडून या घटनेची सखोल  चौकशी सुरु केली आहे. कोव्हीशिल्ड लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर शरीराकडे लोखंड, स्टील आकर्षित होत असल्याचा अजब दावा अरविंद काका यांनी केला आहे.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.