तुम्ही इंस्टाग्रामवर चेष्टा करताय पण खली खरंच दगडं फोडून महाबली झालाय..

जर तुम्ही इंस्टाग्राम युजर असाल तर खास तुमच्यासाठी

मोठ्ठ्या धुडाच्या माणसाच्या डोक्यात तितकाच मोठ्ठा मेंदू असतोय काय? असा प्रश्न जर कोणी तुम्हाला विचारला तर लै लडतरी करत डोक्याला ताण देत बसायचं नाय. सरळ ‘द ग्रेट खली’च इंस्टाग्राम प्रोफाइल आठवायचं आणि ‘नाही’ म्हणून विषय मिटवायचा…

काय हाय ह्यो प्रोफाइलचा विषय?

वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंट म्हणजेच डब्ल्यूडब्ल्यूई  मधला दलीपसिंग राणा, ‘द ग्रेट खली’ म्हणून प्रसिद्ध आहे. त्याची भारतात प्रचंड फॅन फॉलोईंग आहे. आजकाल प्रत्येक सोशल मीडिया पर्सन खलीकडे एकाच नजरेने पाहतो. एकतर त्याच वजन आणि त्याचा मेंदू आणि त्याच्या फोटोखाली येणाऱ्या कमेंट…

७ फूट १ इंच एवढी उंची आणि १५७ किलोच्यावर वजन असलेला हा खली आज इंस्टग्रामच्या कमेंटना वैतागून कमेंट सेक्शन ऑफ करून बसलाय.. बिच्चारा

https://www.instagram.com/thegreatkhali/?hl=en

तर झालं असं की, लॉकडाऊनच्या काळात खली इंस्टाग्रामवर खूप अ‍ॅक्टिव  झाला.  सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना आपल्या दैनंदिन जीवनाविषयीचे फोटो पोस्ट करू लागला. असच एका चाहत्याला खलीची चेष्टा करायची हुक्की आली, आणि मग काय विचारू नका खली ट्रेंडिंगवरच आला. लोक त्याला काहीपण प्रश्न विचारू लागले.

जस की,

सर फुक मारके हॉस्पिटल्स में ऑक्सिजन भरवा दो.

सर दुबई में अपनी उंगलीया घुसा घुसा कर जगह जगह से तेल निकाल दो.

एकजण  तर म्हणाला,

सर कमेंट सेक्शन ऑफ कर के हमारी खुशिया हमसे छिन लो.

या यूजरच खलीन खरचं ऐकलं आणि कमेंट सेक्शन बंद केलं पण स्टार होण्याआधी खली खरचं अशक्य काम करायचा.

डब्लूडब्लूइ मध्ये येण्याआधी खली ‘रोड प्रोजेक्ट’ साठी दगड तोडण्याचं काम करायचा.

खलीच्या तब्येतीकडे बघून त्याच्या गावातल्या सगळ्या बायका, दुभती जनावर (म्हसर) एका जागेवरून दुसऱ्या जागेवर उचलून ठेवायला बोलवायच्या.

ही काम तो करायचा कारण तो शिकलाच नाही.

त्याच खरं नाव दलिप सिंग राणा. मूळचा हिमाचलमधल्या सिरमौर जिल्ह्यातला. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती आणि हा असा दिसायला अगडबंब.

खलीने त्याच्या पुस्तकात म्हटल आहे की, १९७९ च्या उन्हाळ्याच्या हंगामात त्याला शाळेतून काढून टाकण्यात आल, कारण पाऊस नसल्यामुळे पिके सुकली होती आणि तेव्हा त्याच्याकडे फीचे पैसे भरण्यासाठी अडीच रुपये नव्हते. पैसे नसल्यामुळे शाळेतील सर्व मुलांसमोर शिक्षकांनी खलीचा अपमान केला. त्याच्याबरोबर शिक्षण घेत असलेल्या मुलांनीही त्याची खिल्ली उडविली, त्यानंतर खलीने शाळेत गेलाच नाही. तो मजुरी करू लागला.

दरम्यान, खली पंजाब पोलिसात एएसआय (सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक) पदासाठी सुद्धा पात्र ठरला होता.

खलीनच एका मुलाखतीत सांगितल होते की, पंजाबमध्ये कट्टरतावाद फोफावत चालला होता. १९९४ मध्ये महलसिंग भुल्लर हे पंजाबचे आयजी होते. देशातील तरुण अतिरेकाकडे वळू नये यासाठी त्यांनी पोलिसात तरुणांना भरती करण्याचे वातावरण निर्माण केले. त्यावेळी पंजाब पोलिस दलात दररोज २००-३०० मुले भरती होत. त्यांच्यापैकीच खली एक होता.

खलीची कुस्तीतली एंट्री केबल टिव्हीमुळे झाली.

खली जेव्हा बॉडी बिल्डिंग करायचा, त्याच वेळी नवीन केबल टीव्ही आला होता. जेव्हा त्याने पहिल्यांदा डब्ल्यूडब्ल्यूई (आधीच डब्ल्यूडब्ल्यूएफ) पाहिलं तेव्हा त्याला ती इंग्लिश पिक्चर मधली मारामारी आहे असं वाटलं. पुढं पुढं तो रोजच ती कुस्ती बघू लागला. जेव्हा तो टीव्हीवर अंडरटेकर, बिग शो असे कुस्तीपटू लढताना बघायचा तेव्हा तो का कुस्तीपटू का होऊ शकत नाही असा विचार करायचा.

त्यानंतर त्याने डब्ल्यूडब्ल्यूईची चौकशी केली आणि मित्राच्या मदतीने ईमेल केला.

डब्ल्यूडब्ल्यूईकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर खलीने सॅन फ्रान्सिस्कोमध्ये नंतर जपानमध्ये चार वर्षे ट्रेनींग घेतल. जपानच्या ट्रेनींग नंतर त्याने एका चित्रपटात काम केल. यानंतर २००५ मध्ये तो  डब्ल्यूडब्ल्यूईमध्ये गेला.

खलीच्या नावात पण वेगळेपण..

जगप्रसिद्ध डब्ल्यूडब्ल्यूई वॉरियर्स ‘हल्क होगन’ आणि ‘द रॉक’ यांच्यासारखंच नवीन नाव शोधण्यासाठी ‘डब्ल्यूडब्ल्यूई’ प्रोग्रामला खूप मेहनत घ्यावी लागली. सुरुवातीच्या टप्प्यात काहींनी त्याला ‘जायंट सिंह’ म्हटल तर काहींनी त्याला ‘भीम’ म्हंटल. पण खलीला ही नाव काही आवडली नाहीत.

काही लोकांनी त्याला ‘भगवान शिव’ हे नाव ठेवण्याचा सल्ला दिला. पण हे नाव देखील त्याने  नाकारले कारण यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात असं त्याच म्हणणं होत. खली हा काली मातेचा भक्त आहे. तिच्या विध्वंसक शक्तींबद्दल खलीला अप्रूप आहे. यावरून त्याला  ‘माँ काली’ असं नाव सुचल. पण विदेशी लोकांनी त्या काली नावाचं ‘खली’ करून टाकलं. आणि त्यात आपले देशी पण सामील आहेत बर.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.