वर्ल्डकपच्या मॅचला पाय सुजलेला असूनही 6 विकेट घेऊन इतिहास रचला होता.

एक काळ असा होता जेव्हा लोकं धोनीला किंवा गांगुलीला शिव्या घालायचे की नेहराला ओव्हर का देता त्याच्यामुळे मॅच हारते पण नेहरा म्हणजे एके काळचा बॅट्समन लोकांचा कर्दनकाळ होता. भले भले बॅट्समन त्याला हलक्यात घेण्याची चूक करत नसे. अशीच एक वर्ल्ड कपची मॅच होती सुजलेल्या पायाने आशिष नेहराने इंग्लडच्या संघाला गारद केलं होतं.

2003 चा वर्ल्डकप. भारत आणि इंग्लंड मध्ये मॅच होती. ही तीच मॅच होती ज्यामुळे आशिष नेहरा हा काय लेव्हलचा प्लेअर आहे हे जगाला कळलं होतं आणि सोबतच नेहराचं करिअर नव्याने सुरू झालं होतं. या मॅचमध्ये नेहराने 23 धावा देत तब्बल 6 विकेट पटकावल्या होत्या. पण या मॅचच्या अगोदर एक खतरनाक घटना घडली होती. या मॅचच्या आदल्या रात्री नेहरामध्ये चालायचीसुद्धा हिंमत नव्हती.

इंग्लंड संघाच्या विरुद्धच्या सामन्याच्या अगोदर नामीबिया संघाविरुद्ध भारताचा सामना होता. या मॅचमध्ये नेहराने एकच बॉल फेकला होता आणि त्याच्या पायाला दुखापत झाली , ही एकदम गंभीर दुखापत होती, वेगवान गोलंदाजांना असलेला दुखापतीचा शाप नेहरालासुद्धा लागला होता. पायाला झालेल्या दुखापतीमुळे नेहराने नंतर बॉलिंगचं केली नाही. पाय बेक्कार सुजलेला होता.

पुढची मॅच इंग्लंडविरुद्ध होती. कर्णधार गांगुली वैतागलेला होता की इंग्लडसारख्या बलाढ्य संघाविरुद्ध मॅच आणि त्यात वेगवान गोलंदाज असलेला नेहरा जखमी झाला होता. नेहरा तेव्हा 150 च्या स्पीडने बॉलिंग करायचा. दादाने नेहराला विचारलं की तू उद्याची मॅच खेळू शकतोस का ? तेव्हा नेहराने होकार दिला व त्याच्या पायाची सूज कमी होण्याऐवजी वाढतच चालली होती. त्याला उभं सुद्धा राहता येत नव्हतं.

गांगुलीने परत एकदा विचारलं की भावा तू खरंच खेळू शकतो का ? कारण तुला उभं सुद्धा राहता येत नाहीए. नेहरा शांतपणे म्हणाला तू फक्त फिजिओची टीम माझ्याकडे पाठवून दे आणि त्यांना इथंच राहूदे. नेहराने रात्रभर त्यांच्याकडून बर्फाने पाय शेकून घेतला आणि सकाळी मॅचच्या वेळी 150 च्या स्पीडने नेहरा बॉलिंगला सज्ज उभा होता.

26 फेब्रुवारी 2003 ला भारत विरुद्ध इंग्लंड अशी मॅच खेळवली गेली. भारताकडून सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड आणि युवराजने यथेच्छ फटकेबाजी केली आणि त्यांच्या खेळाच्या बळावर भारतीय संघाने 9 विकेट गमावून 250 धावा उभारल्या. प्रत्युत्तरात नेहराने कहर केलं आणि इंग्लडच्या एकाही खेळाडूला डोकं वर काढू दिलं नाही.

10 ओव्हरमध्ये 23 धावा देत 6 विकेट आशिष नेहराने पटकावल्या होत्या आणि या मॅचमध्ये 82 धावांनी इंग्लंडचा पराभव झाला. आशिष नेहराच्या धारदार बॉलिंग समोर कोणाचीच डाळ शिजली नाही आणि भारत विजयी झाला.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.