अशोक सोलोमनने केलेले ड्रग्स कांड भारतातच नाही तर अमेरिकेतही चर्चेचा विषय आहेत….

गुन्हेगारी हा शिक्का इतका जबरदस्त असतो की सामान्य माणसाला त्याचं विशेष असं काही वाटत नाही कारण तो अश्या भानगडी करण्याच्या तयारीत नसतो पण ज्यांच्या माथ्यावर गुन्हेगार हा शब्द कोरलेला असतो अशा लोकांना त्याचं गील्ट फिल होत राहतं, तर काहींना त्याचा काहीच फरक पडत नसतो.

मागच्या काही दिवसात गुरुग्रामची एक घटना भरपूर ट्रेंड करत होती. गुरुग्रामच्या चींटेल्स पॅराडीसो सोसायटीत एक अपघात घडला आणि या घटनेमुळे या सोसायटीचे मालक अशोक सोलोमन यांचं नाव अनेक लोकांना रिकॉल करून गेलं. अशोक सोलोमन म्हणजे काय साधेसुधे असामी नव्हते तर ड्रग्स विक्रीच्या बाबतीत त्यांनी जगभर आपली जादू दाखवली होती. अशोक सोलोमन यांनी केलेली ड्रग्स डीलिंग अजूनही एक आश्चर्यच आहे.

अशोक सोलोमन याच्या सुरवातीच्या आयुष्याबद्दल सांगितलं जातं की, तो एक टॅक्सी ड्रायव्हर होता म्हणजे सेंट स्टीफन्स कॉलेजात तो शिकत असताना त्याने कॉलेज सोडलं आणि टॅक्सी ड्रायव्हर बनून पैसे कमवू लागला. 

आपल्या बोलबच्चन स्वभावामुळे त्याच्या ओळखी भरपूर वाढल्या. चिकन्या चोपड्या गोष्टी आणि तेज दिमाग म्हणुन तो त्याच्या ओळखीच्या लोकांमध्ये लोकप्रिय होता. १९७७ साली सोलोमनच्या नावे ४०० कीलोग्रॅम हशिश विक्री करणे, मनी लॉड्रिंग (काळा पैसा पांढरा करणे) लुटमार असे अनेक गुन्हे होते.

दिल्ली पोलिसांनी त्याला अशा स्थानिक घटनांवरून ताब्यात घेतलं होतं पण कोणालाही त्याच्या ड्रग विक्रिबद्दल माहिती नव्हतं. दिसायला साधासुधा आणि गुन्हे करेल अशी शंकाही येणार नाही असा अशोक सोलोमन होता. पण त्याची ड्रग तस्करी जेव्हा जगासमोर आली तेव्हा मात्र स्थानिक पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली.

भारतीय गुप्त एजन्सीच्या तो रडारवर होता. सीबीआय, इडी हे सगळे तर त्याच्यामागे हात धुवून लागलेले होते. १० नोव्हेंबर १९७३ साली जेव्हा अशोक सोलोमन जेलमध्ये होता तेव्हा त्याच्याविरोधात असणारे सगळे पुरावे सुमडीत नष्ट करण्यात आले आणि त्याला न्यायालयाने सोडून दिलं. १९८५ साली साक्षीदार ऐन वेळी पलटले आणि पुन्हा त्याला सोडून देण्यात आलं.

ड्रगच्या धंद्यात मिळालेले पैसे अशोक सोलोमन शेअर बाजारात लावायचा आणि तिथूनही पैसे कमवायचा. १९८६ साली पाकिस्तानमधून ९०० किलो हशिश भारतात आलं तेव्हा त्याची वाटणी करण्याची जबाबदारी ही अशोक सोलोमन वर होती. १०० किलो हशीश ही अमेरिका आणि इतर युरोपीय देशांना निर्यात करण्याची जबाबदारी सोलोमन वर होती पण हे करताना तो पकडला गेला ते कायमचाच.

सिव्हील लाईन मधलं चर्च आणि त्याची जमीन विकण्याचा आरोपही अशोक सोलोमनवर आहे. २५ वर्षांपासून ड्रगच्या धंद्यात तो होता आणि त्यातून त्याने बक्कळ पैसे कमवले. दिल्लीच्या व्हीव्हीआयपी एरियात बंगला घेऊन तो राहत होता.

इतके दिवस पोलिसांपासून तो वाचत होता पण शेवटी पापाचा घडा उशिराने का होईना भरतो त्याचं हे उदाहरण. अजूनही अशोक सोलोमनच्या चर्चा अमेरिकेच्या अंडर ग्राउंड मध्ये चर्चिल्या जातात.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.