चक्क अटलजींनी प्रचारात महिला उमेदवारावर अभद्र टीका केली, जनतेने त्यांना धूळ चारली..

आजकाल राजकीय नेते एकमेकांवर टीका करतांना कधी काय म्हणतील काही सांगता येत नाही. भले एकमेकांवर कितीही खालच्या स्तरावरची टीका करू देत वरतून असंही म्हणायला मोकळे कि, राजकीय सुसंस्कृतपणा हरवत चालला आहे. असो हे टीकास्त्र पूर्वीच्या राजकारणात देखील चालायचं पण  इतक्या खालच्या थरावर जाऊन नाही. पण संस्कृती, अस्मिता, जात समुदाय धर्म इत्यादींचा आधार घेऊन हे राजकीय नेते टीका करत असायचे.

यातून भले भले दिग्गज नेते देखील सुटले नव्हते मग अटल बिहारी वाजपेयी देखील होते. पण त्यांनी केलेल्या एका टीकेमुळे त्यांना निवडणुकीत जिंकता-जिंकता त्यांना हार स्वीकारावी लागली होती. 

नेत्यांना कधी काय धडा शिकवायचा हे जनतेला बरोब्बर कळते, १९६२ च्या लोकसभा निवडणुकीची गोष्ट होती. उत्तर प्रदेशच्या बलरामपूर लोकसभा मतदारसंघातून अटल बिहारी निवडणुकीस उभे असतांना त्यांच्या विरोधात उभ्या होत्या सुभद्रा जोशी.

यापूर्वी १९५७ च्या निवडणुकीत ते काँग्रेसचे बॅरिस्टर हैदर हुसेन यांचा पराभव करून अटल बिहारी वाजपेयी हे बलरामपूर लोकसभा मतदारसंघातून जनसंघाचे खासदार म्हणून निवडून आले होते. त्या पराभवाचा बदला घेण्यासाठी, जेव्हा कॉंग्रेसने १९६२  मध्ये आपल्या ज्येष्ठ महिला नेत्या सुभद्रा जोशी यांना त्यांच्या स्पर्धेत उतरवले, तेव्हा त्यांच्यासाठी हि स्पर्धा खूपच कठीण असल्याचे म्हटले जात होते.

सुभद्रा जोशी या त्यांच्या भाषणात नेहेमीच म्हणायच्या कि, जर मी निवडणूक जिंकली तर मी बारा महिने आणि महिन्याचे तीस दिवस जनतेची सेवा करण्यास तत्पर असेल. त्यांची लोकप्रियता वाढत जात होती. प्रचार सभा जोरात चालू होत्या. इकडे अटलजींच्या सभा देखील गाजत होत्या.

एका सभेत अटलबिहारी वाजपेयी यांनी सुभद्रा यांच्या लैंगिकतेवर टीका केली. त्यांना हि टीका करतांना हे देखील जाणवले नाही कि, ते करत असलेली टीका किती असभ्य भाषेत मोडते.

ते म्हणाले कि,

 “सुभद्रा जी म्हणतात की त्या महिन्याच्या ३० दिवस मतदारांची सेवा करेल. मी विचारतो, तुम्ही ते कसे कराल? महिन्यातले काही दिवस स्त्रिया सेवा देण्यास योग्य नसतात”.

त्या काळात प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीबद्दल तक्रार करण्यासाठी निवडणूक आयोगापर्यंत पोहचण्याची पद्धत नव्हती. उमेदवार त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना सार्वजनिकरित्या न्यायालयात आणि राजकीयदृष्ट्या लढवण्यावर विश्वास ठेवत असत. त्यांच्या अशा असभ्य वक्तव्यामुळे सुभद्रा जोशी यांनी जाहीर नाराजी व्यक्त करत आवाहन केले होते कि, त्यांनी केलेल्या या अपमानाचा बदला त्या स्वतः घेणार नाहीत, परंतु त्यांचे मतदार मात्र नक्की घेतील.

नेमके तेच घडले. अटलजी जिंकण्याचे चान्सेस असतांना ते निवडणूक हरले. ही आणखी एक बाब आहे की पुढच्या निवडणुकीत जेव्हा तो पुन्हा मतदारांसमोर आले तेव्हा मतदारांनी त्यांना माफ करून  लोकसभेवर पाठवले होते.

पण तरी देखील त्या भागात वाजपेयी सारख्या दिग्गज नेत्यांचा पराभव करून लक्षवेधी विजय संपादन करणाऱ्या सुभद्रा जोशी यांची  लोकप्रियता बरीच होती.

त्यांच्या या प्रकरणावरून भले अटलजी यांनी सुभद्रा जोशींवर खालच्या थराला जाऊन टीका केली तरी देखील सुभद्रा जोशी यांनी सर्वांच्या मनात घर केले होते.

निवडणुकीच्या मैदानात देखील स्वतःला मान्य असलेली मूल्यच प्रचार सभांमधून ठामपणे लोकांसमोर मांडण्याचे धाडस सुभद्रा ताई यांनी दाखवून दिले होते.

सुभद्रा जोशी बलरामपुरच्या स्थानिक रहिवासी नाहीत. हिंदु संस्कृतीवर त्यांचा विश्वास नाही. सौभाग्याचे प्रतीक असलेले कुंकू, बांगड्या यापैकी काहीही सुद्धा ताईंच्या अंगावर दिसत नाही, असा प्रचार विरोधी उमेदवार वाजपेयी करत असायचे. जाहीर सभांमधून या आक्षेपांचे प्रत्युत्तर देताना ताई ठामपणे म्हणायच्या मी निवडणूक लढवायला आले आहे.  नाटक करून तुमची फसवणूक करण्यासाठी नाही आले. वाजपेयी सांगतात ते खरेच आहे. पण मी जशी आहे तशीच राहणार आहे.

आपण देशाचे रक्षण करण्यासाठी सीमेवर लढणाऱ्या जवानांना त्यांचा धर्म काय, त्यांची जात काय असे प्रश्न विचारतो का ? असे परखड प्रश्न त्या जनतेला करत असत.

हे हि वाच भिडू :

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.