आझाद हिंद सेनेचा सेनानी, ज्याच्या नावावर ‘ लाल किल्ला ट्रायल’ हा ऐतिहासिक खटला चालला

देशाला इंग्रजांपासून मुक्त करण्यात आझाद हिंद फौजेने अतिशय महत्वाची भूमिका बजावली. या फौजेची कमान नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या हातात होती. देशाला स्वतंत्र करण्यासाठी त्यांच्या सैनिकांनी बराच संघर्ष केला. इंग्रजांची पळता भूई थोडी करण्यात यांनी कोणतीही कसर सोडली नाही. इंग्रजांनी देखील त्यांच्यावर कारवाईचा कोणताच मौका सोडला नाही.

असाच एक खटला चालविला गेलास आझाद हिंद फौजेचे कर्नल गुरबक्षसिंग ढिल्लोंवर.

गुरबक्षसिंग यांच्यावर ‘लाल किला खटला’ नावाचा ऐतिहासिक खटला चालविला गेला. या खटल्यात आयएनएचे तीन जनरल गुरबक्षसिंग ढिल्लो, प्रेम सहगल आणि शाहनवाज खान यांचा समावेश होता. देशातील 400 कोटी लोक त्यांच्या पाठीशी उभे होते. त्यानंतर ’40 कोटींचा आवाज – सहगल, ढिल्लन, शाहनवाज’ हा नाराही गूंजला होता.

डॉक्टर व्हायचं होतं

डॉ. . गुरबक्षसिंग ढिल्लन यांचा जन्म 1914 मध्ये पंजाबमधल्या तरणतारण जिल्ह्यात झाला. त्यांचे वडील पशुवैद्य होते. गुरबक्ष अभ्यासात हुशार होते, त्यांना डॉक्टर व्हायचे होते. पण पंजाब युनिव्हर्सिटीच्या डॉक्टरीच्या परीक्षेत फेल झाल्याने ते निराश झाले.

ते अभ्यासात हुशार होते आणि त्यांची उंचीही चांगली असल्याने त्यांच्या वडिलांच्या मित्राने गुरबक्षला सैन्यात भरती होण्याचा सल्ला दिला.

1941 मध्ये इंग्रजांच्या वतीने लढले दुसरे महायुद्ध

त्यानंतर त्यांनी जोरदार तयारी केली आणि 1933 मध्ये भारतीय सैन्यात त्यांची निवड झाली. 14 व्या पंजाब रेजिमेंटमध्ये त्याची निवड झाली. प्रशिक्षणानंतर 1941 मध्ये ब्रिटीश सैन्याने त्यांना दुसरे महायुद्ध लढण्यासाठी मलेशियात पाठविले. येथे त्यांनी शत्रूंशी चांगलाच लढा दिला. पण 1942 मध्ये त्यांना जपानी सैन्याला युद्धबंदी बनवले. इथल्या तुरूंगात त्यांनी आपला विचार बदलला आणि ब्रिटीश सैन्याविरूद्ध लढा देण्यास सहमती दर्शविली.

‘लाल किल्ला ट्रायल’

इथून सुटल्यावर त्यांनी सुभाषचंद्र बोस यांची आझाद हिंद फौज जॉईन केली. येथे कर्नल प्रेम सहगल आणि मेजर जनरल शाहनवाज खान यांच्यासमवेत गुरबक्षने ब्रिटीश सैन्याच्या नाकात दम केला.

पण दुर्दैवाने 1945 मध्ये ब्रिटीश सैन्याने त्यांना आणि आझाद हिंद फौजच्या इतर साथीदारांना अटक केली. ब्रिटिश सम्राटाविरुध्द युद्ध केल्याबद्दल त्यांच्यावर ‘लाल किल्ला ट्रायल’ नावाचा ऐतिहासिक खटला चालविला गेला. त्यांचे दोन साथीदार प्रेम सहगल आणि मेजर जनरल शाहनवाज खान यांचेही त्यात नाव होते.

नेहरूंनी लढला खटला

त्यांची बाजू घेणाऱ्या वकिलांच्या यादीमध्ये अनेक दिग्गज वकील होते मात्र तेव्हाचे स्वातंत्र्यलढ्याचे दिग्गज नेते आणि सुभाषचंद्र बोस यांचे एकेकाळचे मित्र व सहकारी असणाऱ्या पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देखील या केससाठी बऱ्याच वर्षांनी वकिलीचा काळा कोट चढवला.

एकंदरीत हे प्रकरण एक राष्ट्रीय मुद्दा बनले होते.

लोकांचा संताप उघडपणे इंग्रजांसमोर आला. कोट्यावधी भारतीयांनी स्वातंत्र्यासाठी आणि त्या सैनिकांना मुक्त करण्यासाठी आवाज उठवायला सुरुवात केली. याचा परिणाम असा झाला की, ब्रिटिश सरकारला प्रेम सहगल, शाहनवाज खान आणि गुरबख्श यांच्यासह आझाद हिंद सैन्याच्या सर्व सैनिकांना सोडावे लागले.

‘ पद्मभूषण’ ने सन्मानित

इंग्रजांनी तोपर्यंत देश स्वतंत्र करण्याचा विचार सुरू केला होता आणि परिणामी 1947 आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्यानंतर त्यांनी एक पुस्तक लिहिले ज्यात त्यांनी आपला अनुभव सांगितला.

1998 मध्ये वाजपेयी सरकारने गुरबक्षसिंग ढिल्लों यांना त्यांच्या देशसेवेबद्दल ‘पद्मभूषण’ देऊन सन्मानित केले. त्यानंतर 2006 मध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

दरम्यान, त्यांच्या आयुष्यावर आधारित ‘रागदेश’ नावाचा चित्रपटही बनला आहे. ज्यात अभिनेता अमित साधने त्याची भूमिका केली होती. 2017 मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन तिग्मांशू धूलिया यांनी केले होते.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.