क्षणार्धात बाळासाहेबांनी सिंधुदुर्ग वासीयांना आपली कार रुग्णवाहिका म्हणून देऊ केली.

बाळासाहेब ठाकरे या नावाचं वादळ सगळ्या देशाने आणि महाराष्ट्राने अनुभवलं आहे. या वादळाची एक आठवण सिंधुदुर्ग अजूनही काढत असतो. बाळासाहेबांनी सिंधुदुर्गवर जितकं प्रेम केलं तितकंच सिंधुदुर्गने देखील बाळासाहेबांवर केलं आहे.

याचीच परिणीती आली ती १९६७ च्या काळात.

शिवसेना, बाळासाहेब, कोकण आणि विशेषतः सिंधुदुर्ग या सर्वांना वेगळे करता येत नाही. तेथील घराघरांत बाळासाहेबांचे फोटो तुम्हांला नक्कीच दिसून येतील. सिंधुदुर्गवासी आजही मोठ्या आपुलकीने बाळासाहेबांच्या आठवणी सांगत असतात.

तो १९८१ चा काळ होता.

बाळासाहेबांबद्दल शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख यांनी सांगितलेली आठवण लक्षात राहण्यासाठी आहे.

त्या काळात जिल्ह्या-जिल्ह्याचे रस्ते काही फार चांगले नव्हते, त्यात गावोगावांच्या रस्त्याचं तर बोलायलाच नको. त्यात गावाकडची लोकं याही काळात बैलगाड्या, सायकलीच वापरायचे. कारण हि लोकं समृद्ध जरी असली तरी काळानुरूप तितकीशी आधुनिक नव्हती झाली. अशा काळात कुणाकडे चारचाकी असणे म्हणजे फार मोठी गोष्ट मानली जायची. टेलिफोन वेगैरे सारखी सुविधा आल्या होत्या पण त्या काळात गावाकडच्या लोकांकडे ह्या सुविधा अजून पोहचल्या नव्हत्या.

कोणत्याही जलद सोई-सुविधा नसलेल्या जगात लोकं आनंदाने जगत होती. कितीही समाधानात जगत असली तरी मात्र आपत्कालीन सेवेसाठी मात्र लोकांना अडचणी यायच्याच. कुणाची पत्नी, सून, मुलगी बाळंतपणासाठी अडून असायची अशा स्त्रियांच्या आरोग्याला धोका असायचा. अनेक नुकत्याच जन्मलेल्या बालकांच्या जीवाला धोका असायचा.

केसकर सांगतात कि,

आम्ही त्या काळात संघटनेच्या कामासाठी, प्रचारासाठी, लोकांना भेटण्यासाठी  गावोगावी सायकलने फिरायचो.

आम्ही एका गावाच्या धनगरवाड्याच्या वस्तीवर पोहचलो होतो. तिथे एक लहान मुलगा आजारी पडला होता. सगळे प्रयत्न करून झाले होते पण त्याच्या तब्येतीत सुधार होत नव्हता. त्या दिवशी अचानकच त्याची तब्येत खालावली, शेवटचा पर्याय म्हणून ग्रामस्थांनी आणि सेनेच्या कार्यकर्त्यांनी त्या मुलाला चादरीत गुंडाळलं आणि पायीच शहराकडच्या हॉस्पिटलकडे निघाले होते.

मात्र तो रुग्ण रस्त्यातच दगावला.

केसरकर सांगतात हे आमच्या डोळ्यादेखतच झालं होतं. त्यांनी आणि इतर शिवसैनिकांनी हा सगळा प्रसंग काही दिवसानंतर बाळासाहेबांना सांगितला.

बाळासाहेबांना हे ऐकून वाईट वाटले, सोई सुविधा नाहीत म्हणून त्या निष्पाप मुलाला आपला जीव गमवावा लागला होता. कसलाही विचार न करता बाळासाहेबांनी आपली रोजच्या वापरातली कार त्या गावाला रुग्णवाहिका म्हणून दिली.

त्या कार मध्ये रुग्णवाहिकेत असतात अशा आवश्यक असणाऱ्या सुविधा त्यात पुरवल्या गेल्या आणि सिंधुदुर्गमधील ग्रामीण भागाला ती कार रुग्णवाहिका म्हणून देऊ केली.

असे होते बाळासाहेबांचे सिंधुदुर्गवरील प्रेम !

त्यांच्या याच प्रेमामुळे कोकणवासी सेनेला आणि बाळासाहेबांना कधीही विसरू शकत नाहीत. कोकणात कधीही कोणत्याही जागी साहेबांच्या सभा असोत कोकणवासी आवडीने सामील व्हायचे. न त्यांना कुणी गाड्या पाठवून जमा करण्याची कधीही गरज पडलीच नव्हती.

कित्येकदा प्रतिकूल परिस्थिती होती पण याही परीस्थितीत लोकं आवर्जून बाळासाहेबांच्या सभेला गर्दी कर, त्यांची भाषणे कानात प्राण आणून ऐकत. इतका मोठा जनसमुदाय फक्त आपल्यावरच्या प्रेमापोटी जमा होत असलेला नेता अभावानेच होतो.

असा हा नेता होता आपल्या लोकांवर आपल्या प्रदेशावर नितांत प्रेम करणारा !

हे हि वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.