बाळू गुप्तेंच्या नावावर स्पेशालिस्ट बॉलर म्हणून सगळ्यात खराब रेकॉर्ड आहे…

क्रिकेट म्हणजे रेकॉर्ड तोडणे, रेकॉर्ड बनवणे यांचा एक शीतयुद्ध प्रकारातला खेळ. नवनवीन रेकॉर्ड बनणे आणि त्यावर क्रिकेटविश्वात चर्चा होणे काही नवीन नाही पण आजचा किस्सा अशा एका भारतीय आणि त्यातल्या त्यात मराठमोळ्या क्रिकेटरचा आहे ज्याच्या नावावर आजवरचा सगळ्यात खराब रेकॉर्ड आहे. तर जाणून घेऊया नक्की काय मॅटर आहे.

बाळू गुप्ते . भारताच्या टीममधल्या स्पेशालिस्ट बॉलर्स पैकी एक जबरदस्त स्पिनर म्हणून बाळू गुप्तेंची ओळख होती. पण भारताच्या टीममध्ये येण्यापूर्वी बाळू गुप्तेंचा फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये दबदबा होता. त्यांचे भाऊ सुभाष गुप्ते हे भारताचे आघाडीचे खेळाडू होते. दोघं भाऊ जबरदस्त क्रिकेटपटू होते.

Baloo Gupte, the ubiquitous workhorse of Bombay and India

अशी चर्चा बाळू गुप्तेंबद्दल चालायची. बाळकृष्ण पंढरीनाथ गुप्ते पूर्ण नाव आणि ३० ऑगस्ट १९३४ रोजी त्यांचा जन्म झाला होता. मोठा भाऊ सुभाष गुप्ते हे नावाजलेले खेळाडू होते. दोघेही बंधू उत्तम लेगस्पिनर म्हणून प्रसिद्ध होते. सुभाष गुप्तेंकडे कंट्रोल आणि विविध व्हॅरिएशन होते तर बाळू गुप्तेनी डोमेस्टिक लेव्हलवर आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती.

९९ फर्स्ट क्लास मॅचेसमध्ये ४१७ विकेट्स बाळू गुप्तेंच्या नावावर होता. यामध्ये २६ वेळा पाच विकेटचा सेट तर ५ वेळा दहा खेळाडूंना त्यांनी बाद केले होते. बाळू गुप्तेंपेक्षाही सरस त्यांचा मोठा भाऊ सुभाष गुप्ते होते, सुभाष यांच्या नावावर ११५ मॅचमध्ये ५३० विकेट होत्या. दोन्ही भावांची फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये दहशत होती. 

दोन्ही भावांच्या उत्तम खेळामुळे कुणाला इंटरनॅशनल टीममध्ये घ्यावं असे प्रश्न सिलेक्टर लोकांसमोर होते. तेव्हा चांगल्या विकेट्स असलेल्या सुभाष गुप्तेंची निवड झाली. लेग ब्रेक आणि गुगलीमध्ये यावर प्रभुत्व सुभाष गुप्तेंकडून मिळाल्याचं बाळू गुप्ते सांगायचे. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये इतकं जबरदस्त प्रदर्शन बाळू गुप्तेंच होतं कि त्यांच्या बॉलिंगला बरीच लोकं घाबरायची.

एवढी भेदक बॉलिंग असल्याने बाळू गुप्तेंची निवड भारतीय संघात का होत नाहीए असे प्रश्न लोकांकडून विचारण्यात यायचे. १९५३-५४ च्या रणजी सामन्यांमध्ये बाळू गुप्तेंच्या फिरकीची जादू सगळ्या देशाने पाहिली होती. १९६०६१ च्या काळात सुभाष गुप्ते यांचं एक प्रकरण गाजलं आणि ते संघातून बाहेर फेकले गेले. आता सुभाष गुप्तेंच्या जागी कोणता खेळाडू असावा याची चर्चा सुरु झाली. 

बाळू गुप्ते आणि व्ही व्ही कुमार यांच्यात या जागेसाठी स्पर्धा होती. पण अचानकपणे व्ही व्ही कुमारने दुखापतीमुळे माघार घेतली आणि बाळू गुप्तेंची निर्विवादपणे निवड झाली. पण बाळू गुप्तेंना आपली जादू दाखवता आलीच नाही. ३ टेस्ट खेळण्याची संधी बाळू गुप्तेंना मिळाली पण यामध्ये विशेष काही कमाल त्यांना दाखवता आली नाही आणि फक्त ३ चं विकेट त्यांना मिळवता आल्या.

पुढे त्यांची निराशजनक कामगिरी मोठा रेकॉर्ड बनला तोही सगळ्यात खराब रेकॉर्ड कि एखाद्या स्पेशालिस्ट बॉलरने ३ टेस्टमध्ये फक्त ३ विकेट मिळवणे. बाळू गुप्तेंकडून अनेकांच्या अपेक्षा होत्या कारण फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये बाळू गुप्तेंच्या नादी कोणी लागत नव्हतं.

भले इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये बाळू गुप्तेना विशेष कामगिरी करता आली नाही मात्र त्यांनी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये आपलं वलय निर्माण केलं होतं. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर बाळू गुप्ते एसबीआयमध्ये नोकरी करू लागले होते. ५ जुलै २००५ रोजी कॅन्सरमुळे बाळू गुप्तेंचं निधन झालं.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.