वर्ल्डकपमध्ये एकही मॅच न खेळता पार्थिव पटेलला लाखो रुपये मिळाले होते….

क्रिकेटमध्ये लै पैसाय भावा, उगाच आपला देश आयपीएलवर एवढा पैसा खर्च करत नाय. जगातलं सगळ्यात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आपलं आहे, आत्ताच्या पाकिस्तानसारख्या दहा बारा टीम आपल्या खिशात बसतील इतका पैसा बीसीसीआयकडे आहे. खेळाडूंना मानधनात आपल्या देशात कमी नाही, मोक्कार पैसा खेळावर खर्च केला जातो. एका बाजूला काही देशांचे क्रिकेट बोर्ड गरीब होत चाललेत त्यातुलनेत बीसीसीआय भक्कम पैसे जोडत आहेत.

एक काळ असा होता कि जेव्हा भारत १९८३ चा वर्ल्डकप जिंकलेला तेव्हा खेळाडूंना मानधन देण्यासाठी पैसा नव्हता म्हणून लता मंगेशकरांनी गाण्याचा कार्यक्रम ठेवला होता आणि त्या कार्यक्रमातून आलेल्या पैशातून खेळाडूंचं थकीत मानधन भागवलं होतं. पण २००३ साली जेव्हा वर्ल्डकपचा मोसम होता तेव्हा बेंचवर बसलेल्या खेळाडूंनी तेव्हा खोऱ्याने पैसा छापला होता. 

साऊथ आफ्रिकेत २००३ चा वर्ल्डकप होत होता. राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली या प्रमुख खेळाडूंनी त्याकाळी एका मॅचसाठी ७७ लाख रुपये मानधन स्वीकारलं होतं. साऊथ आफ्रिका टूरवर गेलेल्या १५ खेळाडू मिळून ११.७६ लाख रुपये इतकं बजेट देण्यात आलं होतं. वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, मोहम्मद कॅफ , जहीर खान, दिनेश मोंगिया आणि जवागल श्रीनाथ यांना ७७ लाख तर हरभजनसिंगला ७६ लाख रुपये देण्यात आले होते.

आशिष नेहरा आणि अनिल कुंबळे यांना अनुक्रमे ७६ लाख आणि ७३ लाख रुपये देण्यात आले होते. हे सगळे प्लेइंग इलेव्हनमधले प्लेअर होते.

उरलेले संजय बांगर, अजित आगरकर आणि पार्थिव पटेल हे बेंचवर बसलेले होते. हे तिघे २००३ वर्ल्डकपची एकही मॅच खेळले नव्हते. बेंचस्टार म्हणून हे तिघेही तेव्हा फेमस झाले होते. पूर्ण वर्ल्डकपभर बसूनही या तिघांना ७१ लाख रुपये मानधन मिळालं होतं.

पार्थिव पटेलने २०१५ साली या किस्स्याचा खुलासा केला होता कि

२००३ ला वर्ल्डकपची एकही मॅच न खेळता आल्याने मी अगोदर नाराज होतो. पण खरतर सूत्र असं असतं कि टॉप ११ मध्ये सिलेक्ट झालेले खेळाडू सहसा रिप्लेस केले जात नाहीत. मी बेंचवर बसून होतो तेही टूर्नामेंट भर. कारण प्लेयिंग इलेव्हन मधले सगळे उत्तम खेळाडू होते.

कोच जॉन राईट आणि कॅप्टन सौरव गांगुली यांनी मला समजावून सांगितलं होतं की, तुला मॅच खेळण्याची शक्यता धूसर आहे पण प्रॅक्टिसमध्ये खेळाडूंना आत्मविश्वास देण्यासाठी का होईना तू सहभागी हो. वर्ल्डकप संघात सामील झालाय याचा आनंद बाळग आणि प्रत्येक मोमेंट एन्जॉय कर.

२००३ चा वर्ल्डकप यासाठी गाजला होता कि भारताने चांगला कमबॅक केला होता. पण सोबतच यासाठीही गाजला होता कि खेळाडूंवर पैशाचा पाऊस बीसीसीआयने पाडला होता. 

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.