दारुबंदीचे काय परिणाम होतात ?

दारुबंदी केल्यानंतर काय होत ? काहिच माहित नाही. आपल्याकडे कधी दारुबंदी झाल्याची माहिती नाही. हा एकदा नोटबंदी झाली होती त्यावर बोलू शकतो. पण दारूबंदी सॉरी. 

दारूबंदी करण्यात यावी म्हणून भारतातल्या कुठल्या ना कुठल्या कोपऱ्यात रोज एखादा तरी मोर्चा निघत असावा. रोज एखाद्या गावची उभी बाटली आडवी होतं असावी. त्यानंतर चोरुन दारू मिळण्याचे नवे रस्ते निर्माण होत असावेत. हातभट्यांच्या जाळात लाखोंचे लिव्हर जळून जात असावेत. त्यामुळे शतप्रतिशत दारू बंद झाल्यानंतर काय होत हे आपणाला कोणीच नेमकेपणानं सागू शकत नाही. पण दारू बंदी झाल्यानंतर काय होतं याचा अहवाल आला आहे. त्यामुळं आत्ता आपण ठामपणे म्हणू शकतोय दारूबंदी झालीच पाहिजे. 

अहवाल कुणाचा ? 

बिहार राज्यात करण्यात आलेल्या दारूबंदीनंतर लोकांच्या दैनंदिन जीवनात काय फरक पडला याचा अभ्यास आशियाई विकास अनुसंधान संस्था अर्थात ADRI आणि ज्ञान संस्था विकास प्रबंधन संस्थान अर्थात DMI या दोन्ही संस्थांनी मिळून या अहवाल जाहिर केला आहे. दारुबंदी नंतर बिहारमध्ये कोणत्या गोष्टी घेण्याकडे लोकांचा कल वाढला. दररोजचा खर्च लोक कोणत्या गोष्टींवर करु लागले. बचत दर किती वाढला अशा अनेक पैलूचा विचार करुन हा अहवाल मांडण्यात आला आहे. 

अहवाल जाहिर झालाच पाहीजे –  

होय, तुमच्यासाठी तेवढं भिडू लोक करणार नाहीत का ? विश्वास आहे नं. मग सांगतो या अहवालात कोणकोणते मुद्दे आहेत ते. 
१) साड्यांच्या खरेदीत १७५१ टक्यांनी वाढ. 

दारुबंदी नंतर साड्यांच्या खरेदीत मोठ्ठी वाढ झाल्याच दिसून आलं आहे. खरेदीबरोबरच सरासरी साडी खरेदी करण्याची रक्कम देखील वाढलेली आहे. मध्यम आणि उच्च दर्जाच्या साड्यांची विक्री मोठ्या प्रमाणात झाल्याची आकडेवारी सांगते. महाग कपड्यांची ९१० टक्यांनी वाढ झाली आहे तर घरगुती फर्नीचर सारख्या वस्तूंची विक्री १८ टक्यांनी वाढली आहे. 

२) नव्या संपत्तीच्या खरेदित आश्चर्यकारक वाढ. 

नव्यानं संपत्ती खरेदी करणाऱ्या कुटूंबामध्ये १९ टक्यांनी वाढ झाल्याची आकडेवारी सांगते. DMI या संस्थेने नवादा, पुर्णिया, समस्तीपुर, कैमुर आणि पश्चिम चंपारण्य या पाच जिल्ह्यातील २३६८ कुटूंबाचा सर्व्हे केला या सर्व्हेमध्ये सर्वसाधारण कुटूंबामार्फत दर आठवड्याचा खर्च वाढल्याचं दिसून आलं. पुर्वी सरासरी हा आकडा १,००५ रुपये होतो तो दारुबंदी नंतर २,३६८ इतका झाल्याचं समोर आलं आहे. या पाच जिल्ह्यांच्या सर्व्हेनुसार १९ टक्के कुटूंबाने नवी संपत्ती खरेदी केल्याची आकडेवारी मिळते. 

३) मासिक ४४० कोटी रुपयांची बचत.  

सन २०११ सालच्या आकडेवारीनुसार प्रतिदिन ४४ लाख लोक दारू पित असल्याचं समोर आलं. प्रत्येक व्यक्तींचा सरासरी मासिक खर्च हा १००० रुपये इतका येत असल्याच मांडण्यात आल आहे. यानूसारच्या आकडेवारीनुसार सध्या मासिक ४४० कोटी रुपये बचत होत असल्याच संस्थेन अहवालातून दाखवून दिलं आहे. 

४) महिलांवरील अत्याचारात कमालीची घट.

या अहवालानुसार महिलांवरील अत्याचारामध्ये ६६ टक्यांनी घट झाली आहे. महिलांच्या हत्यांच्या बाबतीत हि घट २८ टक्यांची आहे. या अहवाला नुसार सर्व्हेमधील ५८ महिलांनी आमच्या नवऱ्याने दारू सोडल्यामुळे घरातली भांडणे बंद झाल्याचा दावा केला आहे. 

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.