विदर्भाचा रणजी आणि इराणी ट्रॉफींचा दुष्काळ चंद्रकांत पंडित यांनी संपवला होता….

रणजी स्पर्धा या भारताच्या भविष्यातील क्रिकेटचा पाया मानल्या जातात. यातूनच खेळाडू घडतात आणि दर्जेदार खेळाडू आपल्या प्रदर्शनाच्या जोरावर भारतीय संघात येण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतात. जितकी मोठी भूमिका यात खेळाडूंची असते तितकीच महत्वाची भूमिका यात कोच असणाऱ्या लोकांची पण असते. अशाच एका पराक्रमी कोचबद्दल आणि भारताच्या माजी खेळाडूबद्दल आपण जाणून घेऊया.

चंद्रकांत पंडित

मुळात चंद्रकांत पंडित यांना विदर्भाच्या संघाचा रणजी ट्रॉफी आणि ईराणी ट्रॉफ्यांचा दुष्काळ संपवणारा कोच म्हणून ओळखलं जातं. पण अगोदर कोच होण्यापूर्वी त्यांची क्रिकेट कारकीर्द कशी होती ते बघूया. ३० सप्टेंबर १९६१ रोजी महाराष्ट्रात, मुंबईत चंद्रकांत पंडित यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच क्रिकेटचं वेड होतं आणि त्यामुळे स्थानिक स्पर्धांमध्ये त्यांचा बोलबाला होता.

८० च्या दशकात क्रिकेटचं वारं भारतभर पसरू लागलं होतं. त्यावेळी भारताच्या संघात विकेटकिपरची कमतरता जाणवत होती. त्यावेळी चंद्रकांत पंडित यांचा खेळ बघून त्यावेळचे भारतीय संघाचे विकेटकिपर सय्यद किरमाणी यांनी स्वतःचे किपींग ग्लव्ज चंद्रकांत पंडित यांना देऊ केले होते. पण क्रिकेटमध्ये चंद्रकांत पंडित यांना फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. 

५ टेस्टमध्ये १७१ आणि ३६ वनडे सामन्यांमध्ये २९० धावाच चंद्रकांत पंडित यांना करता आल्या. वनडेमध्ये आपल्या बॅटिंगच्या युनिक स्टाईलने ते खेळत राहिले. इंग्लंडच्या हेडींगलेमध्ये चंद्रकांत पंडित यांनी टेस्ट डेब्यू केला आणि शारजाह मध्ये न्यूझीलंडविरुद्ध वनडे डेब्यू केला. १९८७ च्या वर्ल्डकप वेळी दिलीप वेंगसरकरांना चंद्रकांत पंडित यांनी रिप्लेस केलं होतं. पण खेळात सातत्य नसल्याने लवकरच ते संघातून बाहेर फेकले गेले.

पुढे ते विदर्भाच्या संघासोबत जोडले गेले. २०१७-१८ आणि २०१८-१९ या काळात चंद्रकांत पंडित हे विदर्भाचे कोच होते. त्यांच्या प्रशिक्षक पदाखाली या काळात विदर्भाने रणजी ट्रॉफी आणि ईराणी ट्रॉफीचं जेतेपद पटकावलं. २००३-२००४ साली चंद्रकांत पंडित प्रशिक्षक असताना मुंबईच्या संघानेसुद्धा रणजी ट्रॉफीचं विजेतेपद मिळवलं होतं.  २००५ साली ते महाराष्ट्राचे कोच झाले.

जेव्हा क्रिकेटच्या सगळ्या फॉरमॅटमधून संन्यास घेतल्यावर चंद्रकांत पंडित यांनी मध्यप्रदेश संघाकडून खेळायला चालू केलं. पण खेळत असतानाच त्यांना मध्यप्रदेश संघाचं प्रशिक्षक पद भूषवणार का अशी ऑफर आली आणि त्यांनी ती स्वीकारली. आपल्या प्रशिक्षकपदाखाली बरीच चांगली कामगिरी आणि चांगले खेळाडू चंद्रकांत पंडित यांनी घडवले.

असं म्हटलं जातं कि विदर्भाचा रणजी ट्रॉफ्यांचा दुष्काळ हा चंद्रकांत पंडित यांच्यामुळे संपला. चंद्रकांत पंडित यांच्यामुळे सलग रणजी ट्रॉफी आणि ईराणी ट्रॉफी विदर्भाला पटकावता आली होती.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.