या चार राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचे पगार केरळ राजस्थानपेक्षा जवळपास दुपटीने जास्त आहेत..

राजकारणी मंडळी नेहमीचं चर्चेचा विषय असतात. त्यांचा कार्यकाळ, घोटाळे, भाषण, पर्सनल लाईफ एवढं नाही तर त्यांचा पगार देखील गुगल सर्च मध्ये टॉपला असतो. आता विषय निघालचं आहे तर मुद्द्याला हात घालावं म्हंटलं. म्हणजे मुख्यमंत्री आणि त्यांचा पगार.

आता तुम्हाला वाटत असेल, कि सगळ्या मुख्यमंत्र्यांना सारखाच पगार असेल. किंवा जेवढं मोठं राज्य त्यानुसार पगार. पण असं नाहीये भिडू. जाणून आश्चर्य वाटेल, पण देशातलं सर्वात मोठं राज्य असलेल्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यापेक्षा  मर्यादित अधिकार असलेल्या राज्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पगार जास्त आहे.

आता देशात एकूण २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेश आहेत. प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे वेतन वेगवगेळ असतं. पण या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा पगार त्या राज्याची विधानसभा ठरवते. त्यामुळे राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या पगाराचा केंद्र सरकार किंवा संसदेशी काहीही संबंध नसतो. आणि महत्वाचं म्हणजे दर १० वर्षांनी या पगारात वाढ होते. ज्यात महागाई भत्ता आणि बाकीच्या भत्त्यांचा सुद्धा समावेश असतो.

तर सर्वाधिक पगाराच्या या यादीत तेलंगणा सारख्या नव्याने स्थापन झालेल्या आणि लहान राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं नाव टॉपला आहे.

चला तर मग नजर टाकू मुख्यमंत्री आणि त्यांच्या पगारावर.

कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा पगार किती आहे आणि पगाराव्यतिरिक्त इतर कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत ते जाणून घेऊया.

तर २०१४ मध्ये तेलंगणा राज्याची स्थापना झाली. सध्या के.चंद्रशेखर राव या राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांना सर्वाधिक ४,१०,००० रुपये पगार मिळतो.  दुसऱ्या क्रमांकावर देशाची राजधानी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा नंबर लागतो.  त्यांना ३,९०,००० रुपये पगार मिळतो. 

यांनतर तिसऱ्या क्रमांकावर येतं सगळ्यात मोठं राज्य उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ३,६५,००० रुपये पगार मिळतो. त्यांनतर नंबर लागतो तो आपल्या महाराष्ट्राचा. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ३,४०,००० रुपये पगार मिळतो.

आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगमोहन रेड्डी या यादीत पाचव्या नंबरवर आहेत. त्यांना ३,३५,००० रुपये पगार मिळतो. त्यांनतर येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं राज्य गुजरात. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल यांना ३,२१,००० रुपये पगार मिळतो.

यांनतर येत हिमाचल प्रदेश. हिमाचल प्रदेशचा कारभार जय राम ठाकूर यांच्या हातात आहे. त्यांना ३,१०,००० रुपये पगार मिळतो. यानंतर नंबर लागतो हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांचा. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाला खट्टर यांना २,८८,००० रुपये पगार मिळतो.

पुढे येतात झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन. सोरेन यांना २,५५,००० रुपये पगार मिळतो. यानंतर  मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान. ज्यांना २,३०,००० रुपये पगार मिळतो.

सध्या चर्चित असलेलं राज्य म्हणजे छत्तीसगड. राज्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल.  राज्यांतर्गत वादामुळे काही दिवसांपूर्वी बघेल त्यांच्या राजीनाम्याची चर्चा होती. मात्र अजूनही तरी कोणत्या हालचाली दिसून येत नाही.मात्र बघेल सध्या २,३०,०० रुपये पगार घेतात.  यानंतर येतात नव्याने मुख्यमंत्री झालेले पंजाबचे चरणजित सिंह चन्नी. चन्नी यांनासुद्धा २,३०,०० रुपये पगार  मिळतो. 

देशातील सर्वात छोटं राज्य म्हणजे गोवा. लवकरचं राज्यात निवडणूक होणार आहेत. मात्र सध्या प्रमोद सावंत राज्याचे मुख्यमंत्रीपद सांभाळत आहेत. सर्वात छोटा राज्य असूनही काही बड्या राज्यांच्या मानाने इथल्या मुख्यमंत्र्यांना २,२०,०० रुपये पगार  मिळतो.

पुढे नंबर लागतो बिहारचा. सध्या राज्याची धुरा नितीश कुमार यांच्या हातात आहे. मागास समजल्या जाणाऱ्या या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना २,१५,००० रुपये पगार मिळतो. यांनतर येत पश्चिम बंगाल. ममता बॅनर्जी सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनल्यात त्यांना २,१०,०० रुपये पगार मिळतो.

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन नुकताच नीटच्या परीक्षा रद्द करण्याच्या मुद्द्यावरून चर्चेत आले होते. त्यांना २,०५,००० रुपये पगार मिळतो. त्यांनतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा नंबर लागतो. त्यांना २,००,००० रुपये पगार मिळतो.   यांनतर नंबर लागतो सिक्कीमचा. सध्या प्रेम सिंग तमांग राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांना पगार म्हणून  १,९०,०० रुपये मिळतात. 

यांनतर येत देशाचं साक्षरतेच्या बाबतीत टॉपला असलेलं केरळ. पिनराई विजयन सध्या इथले मुख्यमंत्री आहेत. त्यांना १,८५,०० रुपये पगार स्वरूपात मिळतात. पुढे अशोक गेहलोत यांचा नंबर लागतो. त्यांना १,७५,००० रुपये पगारात आहे. अशोक गेहलोत राजस्थानचे मुख्यमंत्री आहेत.

२१ व्या क्रमांकावर नंबर लागतो तो उत्तराखंडचा. पुष्कर राज धामी यांनी काही महिन्यांपूर्वीच मुख्यमंत्री पदाचा कारभार सांभाळलाय. त्यांना १,७५,०० रुपये पगार मिळतो.  पुढे येतात ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक. पटनाईक यांना १,६०,००० रुपये मिळतात.

पुढे २३ व्या क्रमांकावर नंबर लागतो तो मेघालयाचा. मेघालयाचे मुख्यमंत्री कॉनरॉड संगमा यांना १,५०,००० रुपये पगार मिळतो. अरुणाचलचे मुख्यमंत्री प्रेमा कांडू यांनी सुद्धा काही महिन्यांपूर्वीच मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. त्यांना १,३३,०० रुपये पगार म्ह्णून मिळतात. 

यांनतर आसाम. सध्या हेमंत बिस्वा सरमा हे आसामचे मुख्यमंत्री आहेत. त्यांना १,२५,००० रुपये पगार मिळतो. पुढे नंबर लागतो मणिपूरच्या एन.बिरेन सिंग यांचा. त्यांना १,२०,००० रुपये पगार मिळतो.

यादीत सेकंड लास्ट नंबर लागतो नागालँडचा. नागालँडचे मुख्यमंत्री नेफयू रिओ याना १,१०,००० रुपये पगार मिळतो. तर सगळ्यात कमी पगार मिळतो त्रिपुराच्या बिपलाब कुमार देब यांना. बिपलाब यांना १,०५,५०० रुपये पगार मिळतो.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.