सपना चौधरीच्या बाउन्सरला तिकीट देऊन काँग्रेस यूपीत चमत्काराची अपेक्षा करतंय

हरियाणाची फेमस डान्सर सपना चौधरी नेहमीच चर्चेत असते. भारतात कुठंही जा तिचा फॅन क्लब सापडला नाही तर विषय सोडून बोला. तिच्या एका ठुमक्यांवर गल्लीतल्या पोरांपासून बॉलिवूडचे स्टारसुद्धा फिदा आहेत. त्यामुळं ती बऱ्याच शोज मध्ये सुद्धा पाहायला मिळते. कधी तिच्या नवनवीन गाण्यांमुळे तर कधी पर्सनल आयुष्यामुळे ती नेहमीच चर्चेत असते.

पण भिडू सध्या चर्चांचं मार्केट सपनापेक्षा तिच्या बाउन्सरनं खाल्लंय. तिची बाउन्सर म्हणजे पूनम पंडित जी सध्या उत्तर प्रदेशातून विधानसभेची निवडणूक लढवतेय. 

आता पूनम पंडित नाव घेतल्यावर तुम्हाला शेतकरी आंदोलनाचा तो सीन आठवला असेल. ज्यात एक मुलगी जिने स्टेजवर जाऊन आपल्या सोबत गैरवर्तन झाल्याच बोललं होत. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती. शेतकरी आंदोलनातल्या भाषणांमुळं ती जास्तच चर्चेत आली होती. 

पण आता पुन्हा एकदा पूनम पंडित नाव प्रकाशझोतात आलाय. कारण सध्या काँग्रेसने त्यांना युपीच्या विधानसभा निवडणुकीत आपला उमेदवार म्हणून उभं केलंय. तस पाहिलं तर काँग्रेसची सध्याच्या निवडणुकीचं अख्ख प्लॅनिंग जवळपास सेट झालाय. आपल्या जागा पुन्हा एकदा खिश्यात टाकण्यासाठी यावेळी काँग्रेसने वूमन कार्ड खेळलंय. त्यातूनच पक्षाने बुलंदशहरातील स्याना मतदार संघातून पूनमला उमेदवारी दिलीये. 

पूनम पंडितच्या  याआधी हरियाणवी डान्सर सपना चौधरीचीही बाऊन्सर आहे. एवढेच नाही तर पूनम ही आंतरराष्ट्रीय शुटर आहे. तिने नेपाळमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धेत भारतासाठी गोल्ड मेडल जिंकलय. रुलर युथ गेम्स २०१८ मध्ये पूनम पंडितने १० मीटर एअर पिस्टल स्पर्धेत गोल्ड मेडल पटकावलं होत.  पण घर चालवण्यासाठी तिला संपलं चौधरींची बॉडीगार्ड म्ह्णून काम करावं लागलं.

नंतर ती शेतकरी आंदोलनात सामील झाली. पूनमच्या हरयाणवी आणि युपीच्या लहज्यात भाषण देण्याच्या स्टाईलचे बरेच जण फॅन आहेत.  पण मुझफ्फरनगरमध्ये तिच्याबरोबर विचित्र प्रकार घडला. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुझफ्फरनगरमध्ये आयोजित किसान महापंचायतीत तिला स्टेजवर चढण्यापासून रोखण्यात आले. यादरम्यान, ती अनेक इंटरनेट मीडिया चॅनेलवर मुलाखती देताना दिसली आणि अनेक लोकांवर गंभीर आरोप देखील केले होते. 

दरम्यान, सध्या काँग्रेसने तिला आपला उमेदवार म्ह्णून उभं केलय. एका मुलाखतीत पूनम सांगते कि, तिला राजकारणात येण्याची अजिबात इच्छा नव्हती. पण नंतर भाजपने तिला राजकारणात येण्यासाठी दबाव टाकला. त्यामुळे ती राजकारणात उतरली. आणि गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात त्यांनी काँग्रेसमध्ये एन्ट्री मारली.

आता तसं पाहिलं तर सपना चौधरी भाजपमध्ये आहेत. पण आपल्याशी त्यांचा आता काही कॉन्टॅक्ट नसल्याचं पूनम सांगते. पूनम पंडित एक चर्चित चेहरा आहे. त्यामुळे काँग्रेसने पक्ष प्रवेश केल्यानंतर लगेच ३ महिन्यात पूनमला विधानसभेसाठी स्याना मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली. स्याना मतदार संघातून काँग्रेस २०१२ साली निवडून आलं होत, मात्र २०१७ ला ही जागा भाजपच्या गोटात गेली होती. 

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.