महाराष्ट्रात होतेय ‘कोरोनाची’ चेष्टा

अखेर कोरोना महाराष्ट्रात आला. होळीच्या शुभमुहूर्तावर बातमी आली की कोरोनाच्या रुग्णांची पुष्टी पुण्याच्या नायडू हॉस्पीटलने केली आहे.

दुबईवरून फिरून आलेल्या जोडप्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. प्रशासन सज्ज असून लोकांनी भिती बाळगू नये असे अवाहन प्रशासनाने केले आहे लोकांनी योग्य ती काळजी घ्यावी म्हणून प्रशासन लोकांपर्यन्त प्रत्येक माध्यमातून प्रयत्न करत आहे.

मात्र न भूतो न भविष्यती अशी चेष्टा या जीवघेण्या रोगाची होत आहे. हे सगळं का होतय याच कारण अद्याप स्पष्ट नसलं तरी ही चेष्टा मात्र लोकांचा जीवघेणारी ठरू शकते. कोणत्या गोष्टी चेष्टेत घ्याव्यात याची अद्याप आपल्याकडे सवय नसल्याने असा प्रकार होत असावा.

कोरोनाची चेष्टा नेमकी कशाप्रकारे केली जातेय हे आपण पाहूया.

कोरोनाची चेष्टा करण्यात स्वत: केंद्रिंय राज्यमंत्री रामदास आठवले अग्रेसर राहिले आहेत. सोशल मिडीयावर हा व्हिडीओ व्हायरल झाला. यात रामदास आठवले गो कोरोना च्या घोषणा देत आहेत.

कोरोना गो म्हणून कोरोना जावू शकतो का? याच उत्तर चौथीच्या स्कॉलरशीप परिक्षेत राज्यात शेवटचा क्रमांक मिळवलेला विद्यार्थी सुद्धा देवू शकतो. 

सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले कोरोना पिटाळून लावताना.

बोल भिडू ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಸೋಮವಾರ, ಮಾರ್ಚ್ 9, 2020

 

तर दूसरा प्रकार बाबू शोना जोडीचा. बाबू शोना जोडी हे सदैव प्रेमात असणाऱ्यांचा प्रकार हा स्क्रिनशॉट खरा की खोटा हा प्रश्न नाही तर कोरोना सारख्या रोगाबद्दल दोन प्रेमवीर काय गप्पा मारू शकतात याचा ढळढळीत पुरावा. 

क्रेडीट : फेसबुक आयच्या गावात बाराच्या भावात

 

आत्ता हा प्रकार बघा, कोरोना व्हायरस चक्क भजन म्हणून घालवण्याचा  प्रकार सुरू आहे. वास्तविक अशा क्षणी भजन करण्यासाठी एकत्र येवून हे लोक कोरोना सारख्या संसर्गजन्य रोगाला आमंत्रणच देत आहेत. 

कोरोना भगाने का भजन !

Manu Rao ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಶನಿವಾರ, ಮಾರ್ಚ್ 7, 2020

 

हे meme देखील अवश्य पहावेत.

2.

3.

 

4.

फोटो क्रेडिट : फेसबुक मराठी मीम

 

आत्ता मात्र नागरिकांनी चेष्टा सोडून थोडासा सिरीयस विचार कऱण्याची गरज आहे. आज लांब वाटणारे संकट आपल्या दारात येत असेल तर खात्रीशीर व योग्य माहिती देवून लोकांना सावध करायला हवं. 

Leave A Reply

Your email address will not be published.