कांशीराम यांचे शिष्य आजही उत्तरप्रदेशच्या राजकारणात दबदबा राखून आहेत

“जिसकी जितनी संख्या भरी, उसकी उतनी हिसेदारी” असं स्लोगन देत कांशीराम यांनी दलित तरुणांची आख्खी पिढी राजकारणात उभी केली. कांशीराम यांनी बामसेफच्या माध्यमातून उभारलेल्या नेटवर्कमुळे सत्तेतला आपला वाटा मागण्यासाठी दलित समाजानं मोठा संघर्ष उभारला. पुढे बहुजन समाज पक्षाचा मायावती यांच्या रूपानं पहिली महिला दलित महिला मुख्यमंत्री उत्तरप्रदेशला मिळाली आणि  कांशीराम यांची बहुजनांची चळवळ योग्य दिशेनं चालू असल्याचं बोललं गेलं.

मात्र कांशीराम  यांच्यानंतर मायवतींनी काहीकाळ ही चळवळ वाढवली असली तरी  कांशीराम यांचे अनेक जुने सहकारी बहुजन समाज पक्षाची साथ सोडून आपली वेगळी चूल मांडत होते. मात्र कांशीराम यांनी सांगितलेलं आपल्या संख्येनुसार सत्तेतली हिस्सेदारीचं तत्व मात्र ते मागत होते. अशाच नेत्यांवर आणि पक्षांवर एक नजर घालू.

सुहेलदेव भारतीय समाज पार्टी

कॉलेजच्या दिवसांत ओमप्रकाश राजभर कांशीराम यांच्या सभेत गेले आणि त्यांच्या विचारांनी ते प्रभावित झाले. तेव्हापासून ते १९८१ मध्ये कांशीराम यांनी स्थापन केलेल्या दलित शोषित समाज संघर्ष समितीचा भाग बनले. त्यानंतर त्यांनी बसपा जॉईन केली. पण पुढे जाऊन मग सुहेलदेव भारतीय समाज पार्टीची स्थापन केली.

उत्तर प्रदेशात राजभर समाजाची लोकसंख्या १२% आहे. 

विशेषतः पूर्वांचलमध्ये अनेक सीट्स या राजभर बहुल आहेत. २०१९मध्ये भाजपा युतीबरोबर लढताना या पक्षानं ८ पैकी ४ जागा जिंकल्या होत्या. योगी सरकारमध्ये  कॅबिनेट मंत्री राहिलेल्या राजभर २०२२च्या निवडणुकीत अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टीबरोबर युती करून मैदानात उतरलेत.

निषाद पार्टी

निषाद पक्षाचे अध्यक्ष असलेल्या संजय निषाद यांना राजकारणाचा पहिला अनुभव कांशीराम यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव आला. बसपाची स्थापना झाल्यावरही कांशीराम यांनी निषादला बामसेफमध्ये काम चालू ठेवण्यास सांगितले.

 नंतर कांशीराम राजकारणात निष्क्रिय झाल्यानंतर त्यांनी निषाद पार्टीची स्थापना केली. उत्तरप्रदेशात जवळपास १८% मतदान असलेल्या निषाद समुदायात या पार्टीचं चांगला वजन आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत निषाद पार्टीची भाजपा बरोबर युती आहे. 

अपना दल

अपना दलाचे संस्थापक सोनेलाल पटेल हे बसपाचे संस्थापक सदस्य होते. विद्यापीठाच्या काळात ते कांशीराम यांच्या संपर्कात आले आणि त्यांचे कट्टर अनुयायी झाले. बसपाच्या उभारणीत पटेल यांचा महत्त्वाचा वाटा होता. कांशीरामांनी मायावतींना जास्त महत्त्व दिले तेव्हा पटेल यांनी अपना दल सुरू केला.

त्यांनी कधीही निवडणुकीत यशाची आलं नाही, परंतु त्यांची मुलगी अनुप्रिया पटेल यांनी यश मिळवले. त्या केंद्रीय मंत्री आहेत आणि अपना दल (एस) गटाचे नेतृत्व करतात. अपना दल (एस)सध्या भाजपा बरोबर आहे. तर सोनलाल पटेल यांची पत्नी कृष्णा पटेल आणि मुलगी पल्लवी पटेल, म्हणजे अपना दल (कमेरावादी) या पक्षाने समाजवादी पक्षाबरोबर जाण्याचा निर्णय घेतलाय.

 महान दल

केशव देव मौर्य -एकेकाळी बसपाचे कार्यकर्ते राहिलेल्या महान दलचे संस्थापक केशव देव मौर्य यांनी कांशीराम यांच्याच प्रेरणेने राजकारणात प्रवेश केला होता. उत्तरप्रदेशमध्ये ६% टक्के असलेल्या मौर्य समाजाची एकगठ्ठा मतं मिळवण्याचा या दलाचा प्रयत्न असतो. २०२२च्या निवडणुकीत केशव देव मौर्य यांचा पक्ष समाजवादी पक्षाबरोबर युतीत आहे.

एकेकाळी बसपाची दलित मतांची व्होटबँक या छोट्या छोट्या पक्षांमुळे खिळखिळी झाल्याचं जाणकार सांगतात. मात्र काँग्रेस, भाजप आणि समाजवादी पक्ष प्रमुख पार्ट्यांमध्ये या पक्षांना आपल्याकडे ओढण्यासाठी चालू असलेली स्पर्धा पाहता सत्तेतला वाटा घेण्याचं कांशीराम यांचा सल्ला ते अजूनही पळतायत हे ही तितकंच खरं आहे.

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.