डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, पराभवाला मी भीत नाही…

पराभव कसा पचवायचा असतो हे समजून घेण्यासाठी शे.का.फेडरेशनच्या पराभवानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर काय म्हणाले होते हे वाचायलाच हवं.

१९४६ च्या सार्वत्रिक निवडणुकीत शे.का. फेडरेशनचे सर्व उमेदवार केवळ संयुक्त मतदार संघामूळे पराभूत झाले.

कार्यकर्त्यांना धीर देण्यासाठी डॉ. बाबासाहेब पत्रे लिहीतच, पण यासंबधी त्यांनी जाहीर भाषण करुनहि मार्गदर्शन केले आहे.

डॉ. बाबासाहेब जाहीर सभेत बोलताना म्हणाले,

१९४६ च्या इलेक्शनमध्ये आपण आणि आपल्या पक्षाने अपयशाचा बराच मोठा वाटा उचलला होता असे म्हटले पाहीजे. आपण इलेक्शनमध्ये हरलो म्हणून खंत वाटण्याचे काही कारण नाही. पराभवाबद्दल मला कधीच दुख होत नाही.

गेल्या इलेक्शनमध्ये कॉंग्रेसने आपला पराभवच केला असता तर त्याबद्दल विशेष काही मानण्यासारखे नव्हते. परंतु कॉंग्रेसच्या लोकांनी आपल्यावर जो जोर, जुलूम व अत्याचार केला, तसा अत्याचार हिंदूस्थानात इतरत्र क्वचितच झाला असेल.

१९४६ च्या अत्यंत बिकट प्रसंगातून आपण निभावून निघालो ही काही लहान-सहान गोष्ट नव्हे. आता आपणात धैर्य आलेले आहे. तुम्ही काय करणार असे विचारल्यास तुमच्यापैकी प्रत्येकजण खात्रीने म्हणेल,

आम्ही आपला पक्ष सोडणार नाही एवढे धैर्य आपल्यात आलेले आहे.

आपल्या अनुयायी जनतेला कसा सारखा धीर द्यावा लागतो हे डॉ. बाबासाहेबांच्या वरील भाषणावरून कळते.

श्री दादासाहेब गायकवाड यांनाहि १९४६ च्या निवडणुकीतील पराभवानंतर त्यांना लागलीच धीराचे एक पत्र लिहले होते ते पुढीलप्रमाणे आहे,

भीमराव रा. आंबेडकर

एम.ए. पीएच.डी. डी एस्सी,

बार ॲट लॉ,

तारिख २६/०३/१९४६

प्रिय भाऊराव,

तुमच्या गप्प बसण्यामुळे मी अस्वस्थ झालो आहे. निवडणुकीत तुमचाच पराभव झाला आहे असे नसून सर्वांचाच झाला आहे. पराभव होणे ही काही मुळीच बघावयास लावणारी गोष्ट नाही. आपल्या समाजाने उत्तम कामगिरी बजावली. आपल्या विरोधकांच्या प्रचंड मतसंख्येमुळे आपला पराभव झाला.

प्रांतिक शे.का. फेडरेशनचे अध्यक्ष या नात्याने, आपण आपल्यातील विस्कळित झालेली शक्ति एकत्रित केली पाहिजे. खरे म्हणजे पराजित सैन्याचा सेनापती असेच करतो. सैन्याच्या सेनापतींशी तुलना करता तुमची हालचाल काय आहे ते पहा. तुम्ही कोठेतरी कोपऱ्यात गप्प बसल्यासारखे बसला आहात.

आपण का पराजित झाला? कोण-कोणत्या खेड्यात आपल्या मतदारांना मतदान केंद्रावर येऊ दिले नाही, यासंबधाची माहिती मला पाहिजे . ही माहिती मला ताबडतोब पाठवावी.

आपला

बी. आर. आंबेडकर

  • संदर्भ : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पत्रे (संपादन शंकरराव खरात) 

हे ही वाच भिडू.

1 Comment
  1. Nikhil says

    भावा किती add’s लावशील ?

Leave A Reply

Your email address will not be published.