पाच राज्यांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलंय! आता आपण नुसता प्रचार बघायचा

कोरोना महामारीचा संसर्ग वाढत असतानाच देशात पाच राज्यांच्या निवडणुकीची आज घोषणा आज झाली आहे. गोवा, मणिपूर, उत्तराखंड, पंजाब आणि उत्तरप्रदेश या पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत.

गोवा राज्याच्या विधानसभेचा कार्यकाळ १५ मार्च रोजी, मणिपूर विधानसभेचा कार्यकाळ १९ मार्च रोजी, उत्तराखंडचा कार्यकाळ २३ मार्च रोजी, पंजाब राज्याचा कार्यकाळ २७ मार्च रोजी आणि उत्तर प्रदेशच्या विधानसभेचा कार्यकाळ १४ मे रोजी संपणार आहे.

त्यामुळे या ५ विधानसभांचा कार्यकाळ संपण्याआधी केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन निवडणुकांची घोषणा केली आहे.

कोणत्या राज्यात किती टप्प्यात होणार निवडणुका?

तर उत्तरप्रदेशमध्ये तब्बल ७ टप्प्यात निवडणुका होणार आहेत. सर्वात मोठं राज्य असल्याने उत्तरप्रदेशमध्ये एवढ्या मोठ्या टप्प्यात निवडणुका घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे.

१० फेब्रुवारी – पहिला टप्पा
१४ फेब्रुवारी – दुसरा टप्पा
२० फेब्रुवारी – तिसरा टप्पा
२३ फेब्रुवारी – चौथा टप्पा
२७ फेब्रुवारी – पाचवा टप्पा
३ मार्च – सहावा टप्पा
७ मार्च – सातवा टप्पा

पंजाब, उत्तराखंड आणि गोव्यात एकाच टप्प्यात निवडणूका पार पडतील. मणिपूर मध्ये दोन टप्प्यात निवडणुका पार पडतील.

२७ फेब्रुवारी – पहिला टप्पा
३ मार्च – दुसरा टप्पा

आणि १० मार्च २०२२ ला या पाच ही राज्यात मतमोजणी होणार आहे.

२०१७ चे विधानसभा निकाल असे होते

उत्तरप्रदेश एकूण जागा ४०३

भाजप+ – ३२५

सपा – ४७

बसप – १९

काँग्रेस – ०७

इतर – ०५

उत्तराखंड एकूण ७० जागा

भाजप ५७

काँग्रेस ११

इतर ०२

गोवा एकूण ४० जागा

भाजप १७

काँग्रेस १३

म. गोमांतक ०३

गोवा फॉरवर्ड ०३

इतर ०४

मणिपूर एकूण ६० जागा

भाजप २१

काँग्रेस २८

एनपीपी ०४

एनपीएफ ०४

इतर ०३

पंजाब एकूण ११७ जागा

भाजप ०३

काँग्रेस ७७

आप २०

अकाली दल १५

इतर २

या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये महत्वाचे मुद्दे कोणते आहेत ?

उत्तर प्रदेश – राम मंदिर निर्माण, शेतकरी आंदोलन, हाथरस बलात्कार प्रकरण, लखीमपूर हिंसाचार, गंगेतील कोरोना बळींचे मृतदेह

पंजाब – शेतकरी आंदोलनातील पंजाब, पंजाब काँग्रेसमधला अंतर्गत वाद, कॅ.अमरिंदर सिंह यांचा राजीनामा, अंमली पदार्थांचं सावट, पंतप्रधान मोदी दौरा सुरक्षा प्रश्न

गोवा – काँग्रेसमधील गटबाजी, तृणमूल काँग्रेस आणि आपची एन्ट्री, स्थानिक पक्षांच्या आघाड्या, महाविकास आघाडीचा प्रयत्न, रोनाल्ड़ोच्या पुतळ्याचा वाद

उत्तराखंड – भाजपकडे मुख्यमंत्रीपदासाठी लोकप्रिय चेहरा नाही, सहा महिन्यात तीन मुख्यमंत्री बदलले, शेतकरी आंदोलन, कोरोना आणि प्रशासन, काँग्रेसमध्ये हरिश रावत यांची नाराजी

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर आणि गोवा राज्यांत एकूण ६९० विधानसभा मतदारसंघ आहेत. प्रत्येक मतदारसंघात किमान एका मतदान केंद्राचं काम पूर्णपणे महिला कर्मचारी पार पाडणार आहेत. महिलांचं सक्षमीकरण हे पाऊल उचललं आहे – सुशील चंद्र,  मुख्य निवडणूक आयुक्त

Leave A Reply

Your email address will not be published.