आरएसएसच्या माजी प्रचारकांनी स्थापन केलेला पक्ष, भाजपची डोकेदुखी वाढवणार आहे.
काही राज्यातल्या विधानसभा निवडणूका अगदी काही दिवसांवर आल्या आहेत. त्यामुळे देशाच्या राजकारणात सतत घडामोडी घडताना दिसत आहेत. मध्यप्रदेशातही निवडणूका होणार आहेत. भाजपनेतर त्याठिकाणच्या उमेदवारांची यादीही जाहीर केलीय आणि भाजपचे केंद्रातील महत्वाचे नेते मैदानातही उतरल्याचे पहायला मिळत आहेत. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षच्या दिल्ली वाऱ्याही वाढल्या आहेत. पण, असं असलं तरीही मध्यप्रदेशातच नाहीतर देशाच्या राजकारणात चर्चा होत आहे ती राष्ट्रीय स्वयंम सेवक संघाची.
मध्यप्रदेशच्या राजकारणात आरएसएसची चर्चा होण्याचं कारण म्हणजे, आरएसएसच्या माजी प्रचारकांनी चक्क निवडणूकीच्या मैदानात उतरत एक नवा पक्ष स्थापन केलाय. माजी प्रचारकांनी पक्ष तर स्थापन केला खरा पण, यामुळे भाजपची डोके दुखी मात्र वाढवली आहे.
आरएसएसच्या माजी प्रचारकाने पक्षाची स्थापना का केली? नव्या पक्षाची धोरणं काय आसणार आणि भाजपला याचा कसा फटका बसणार जाणून घेऊयात.
राष्ट्रीय स्वयंम सेवक संघाचे माजी प्रचारक अभय जैन, मनिश काळे आणि विशाल बिंदल यांनी आणि त्यांच्या जुन्या सहाकार्यांनी एकत्र येत मध्यप्रदेश निवडणूकीच्या अगोदर जनहीत पक्षाची स्थापना केली. भोपाळमध्ये मेळावा घेत याची औपचारीक घोषणा केली आहे. त्यामुळे मध्यप्रदेश सहीत देशाच्या राजकारणात आता नवीन समीकरण पहायला मिळणार आहे. आज जरी पक्षाची घोषणा मध्यप्रदेशमधून झाली असली तरीही देशाच्या अन्य भागातही हा नवीन पक्ष आपले हातपाय पसरवू शकतो ही शक्यता नाकारता येणार नाही. कारण देशातल्या बहूतांश भागात आरएसएस सक्रीय आहे.
आरएसएसच्या माजी प्रचारकांनी नवीन पक्ष स्थापन करण्याचा निर्णय का घेतला आहे?
त्याच कारण असं आहे पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी म्हणल्या प्रमाणे सर्वच राजकिय पक्ष संस्कृती आणि लोकशाहीला महत्व देत नाहीत. भाजप आपल्या मुळ विचारधारेपासून लांब जात काँग्रेस प्रमाणे वागत आहे. त्यामुळे भाजप आणि काँग्रेसमध्ये फारसा फरक राहीलेला नाही.
यामुळे २००७ मध्येही काही आरएसएसच्या प्रचारकांनी संघटनेतून बोहेर पडण्याचा निर्णय घेतला होता.
या पक्षाच्या माध्यमातून अनेक प्रश्न तसेच मुळ विचारधार पोहचवण्याचा महत्वाचा उद्देष असणार आसल्याचं सांगितलं जात आहे. जनतेला आपेक्षीत आसणाऱ्या महत्वाच्या गोष्टी प्रस्तावित पक्ष दुर्लक्षित करत आसल्याचा आरोप करत, हा पक्ष स्थापन करत आसल्याचा सांगण्यात आलं आहे.
आता जाणून घेऊयात पक्षाचा अजेंडा काय असणार आहे.
पक्षाने आरोप केल्या प्रमाणे भाजप आता आपला अजेंडा चालवत नाही. भाजप आपाल मुळ हिंदूत्वाचा अजेंडा चालवत नाही. म्हणून जनहीत पक्षाच्या केंद्रस्थानी आसणार आहे हिंदूत्व. हिंदूत्व केंद्रस्थानी ठेवून सर्व राजकीय भुमिका असणार आहेत. तसेच शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था या सर्व महत्वाच्या विषयावर पक्षाचा फोकस असणार आहे. सर्वसामान्य गरीब जनतेच्या न्याय व हक्काच्या बाजूने विचार केला जाईल. आणखी एक सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे शिक्षण व्यवस्था. स्वतंत्रपूर्व काळात शिक्षणासाठी पैसा घेतला जात नव्हता पण आता शिक्षण क्षेत्रात सर्वाधिक पैसा खर्च होतो. शिक्षण आता एक उद्योग झाला आहे. ते मोडीत काढण्याचा पक्षाचा सर्वात महत्वाचा अजेंडा असणार आहे. तसेच भाजप, काँग्रेस व प्रस्तापित पक्षांना एक नवा पर्याय देण्याचा महत्वाचा उद्देष असणार आहे.
प्रस्तापित पक्षांना या नवीन पक्षाचा फटाका तर काही प्रमाणात बसणार तर आहेच. पण, भाजपला याची चांगलीच किंमत मोजावी लागू शकते.
त्याचं कारण असं की एका गोष्टीला आजही कोनी फाटा देऊ शकत नाही. ती गोष्ट म्हणजे भाजप आज ज्या ठिकाणी आहे त्यात संघाची मोठ्या प्रमाणात भुमिका आहे. भाजपचे आज जे काही नेते आहेत किंवा होऊन गेले आहेत. ते सर्व संघाचे स्वयंम सेवक राहीलेले आहेत. त्यामुळे संघाच्या प्रत्येक कार्यक्रमात भाजपचे नेते उपस्थित असतात. राष्ट्रीय स्वयंम सेवक संघ पडद्याच्या पाठीमागून भाजपच्या उमेदवारांसाठी मत वळवण्याचे काम करत असतो.
पण, आता काही प्रमाणात राजकारण बदलताना दिसत आहे. आज भाजप सत्तेत आहे. आज घडीला भाजप जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आलेला आहे. दोन वेळा बहूमत मिळवत पक्ष सक्षम उभा आहे. आज पक्षाचे चांगले दिवस आहेत सोबतच एक मजबूत संघटनही तयार केलेल आहे. बुथ लेवलला मिटींग असतील किंवा मग निवडणूक कॅम्पेनिंग असतील या सर्व मजबूत बाजू आज भाजपच्या आहेत. पण, भाजपच्या पाठिमागे ज्या नावाचा आधार नेहमी आसल्याचं सांगितलं जातं ती आरएसएस संघटना मागच्या काही काळापासून राजकीय हस्तक्षेप करत नसल्याचा समोर आलं आहे. त्यात संघाची नाराजी आहे कि अजून काही हे समजू शकलेलं नाही.
मध्यप्रदेशमध्ये २०१८ च्या विधानसभा निवडणूकीला भाजपला ४१.०२ टक्के मत मिळाले होते. तर, काँग्रेसला ४०.८९ टक्के मत मिळाले होते.
त्या निवडणूकीत काँग्रेसला ११४ तर भाजपला १०९ जागा मिळाल्या होत्या. म्हणजे मध्यप्रदेशच्या विधानसभा निवडणूकीत भाजप आणि काँग्रेसला मिळालेल्या मतामध्ये फक्त एका टक्कयाचं अंतर होतं. म्हणजे काय तर ही आकडेवारी राज्यातील निवडणूकीत किती प्रमाणात चुरस आहे हे दाखववते. त्यातच काँग्रेस पक्षाकडे कमलनाथ यांच्यासारखे मोठे व अनुभवे नेते आहेत. तसेच भाजप ज्या विचारांवर मतं मागण्यासाठी पुढे येते त्या पंडीत दिनदयाळ उपाध्य यांचे विचार आम्ही पुढे घेऊन जाणार आहोत अशी घोषणा जनहीत पक्षाने केली आहे. भाजपचा पारंपारीक मतदान करणार हाच वर्ग आहे. तसेच भाजपचे विचार पोहचवण्याच कामही अप्रत्यक्षरिता या लोकांकडूनच होतं, तेच लोक आज विरोधात बसल्यामुळे नक्कीच याचा फायदा इतर पक्षांना म्हणजे काँग्रेसला अधिक प्रमाणात होऊ शकतो. मध्यप्रदेशमध्ये २३० जागा आहेत सर्व जागांवर प्रस्थ उभारणं सध्या तरी कठीण आहे. पण, निश्चितच भाजपला काही प्रमाणात याचा फटका बसल्या शिवाय राहणार नाही.
सध्यातरी हा पक्ष मध्यप्रदेशची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काम करत असला. तरीही आरएसएस संघटेनेच्या सर्व माजी स्वयंम सेवक व प्रचार आसल्या कारणाने हा पक्ष बाहेरच्या राज्यातही पक्ष विस्तारण्याचा विचार येणाऱ्या काळात करू शकतो ही शक्यता नाकारता येणार नाही. आता हे सर्व तर येणाऱ्या काळातच ठरेल पण, येणाऱ्या विधानसभा व लोकसभेसाठी भाजपला या नव्या पक्षाला तोंड द्याव लागेल हे अंतिम सत्य आहे.
हे ही वाच भिडू:
- आरएसएसचे स्वयंसेवक भगव्या ध्वजाची पूजा का करतात ?
- आरएसएसचा जन्मच मुळात कॉंग्रेसच्या एका संघटनेमधून झालाय.
- भाजपचे जेष्ठ नेते ज्यांचे सल्ले ऐकायचे ते संघाचे मदनदास देवी कोण होते ?
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.