कोरोना ते निपाह कोणत्याही रोगाचा भारतातील पहिला रूग्न केरळातच का आढळतो?

देवाचा स्वतःचा देश म्हणून प्रसिद्ध असलेलं केरळ आपल्या नैसर्गिक सौंदर्याने सर्वांना मोहून टाकतं. नारळ आणि खजुराचे झाडं, घनदाट जंगल, भातशेती आणि उंच डोंगर यासाठी केरळला ओळखलं जातं. निसर्गदेवतेचा वरदहस्त लाभलेलं केरळ हे इथल्या निसर्गासोबतच इथल्या सुशिक्षित नागरिकांमुळे कायम चर्चेत राहिलेलं आहे. मात्र, हे सोडल्यास केरळ सध्या ओळखलं जातं, ते कोणत्याही व्हायरल आजाराचा पहिला रुग्ण सापडणारं राज्य म्हणून.

पुन्हा एकदा केरळमध्ये निपाह या रोगाने तोंड वर काढलंय आणि त्यामुळे केरळसह भारतात या रोगामुळे भितीचं वातावरण निर्माण होत आहे. कोरोनासारखा हा संसर्ग आधिक प्रमाणात वाढत नसला तरीही कोरोनापेक्षाही हा रोग घातक आसल्याचं तज्ञाचं म्हणंण आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार या विषाणूमुळे संसर्ग झालेल्या रुग्णांचा मृत्युदर हा ४० ते ७५ टक्के एवढा आहे. त्यामुळे ही चिंतेची बाब आहे असचं म्हणावं लागेल. पण, या आणि अशा कितीतरी रोगांच सेंटर केरळच का आहे? केरळपासूनचं या रोगांचा संसर्ग का वाढतो? आत्तापर्यंत कोणत्या संसर्गाने केरळला वेढलेलं आहे. जाणून घेऊयात.

सुरवातीला आपण जाणून घेऊया कि आत्तापर्यंत केरळमध्ये कोणत्या रोगांचे रूग्न सापडले आहेत.

चिकनगुनिया, जापनीज एनसेफ्लायटिस, एक्युट एनसेफ्लायटिस सिंड्रोम, वेस्ट नाइल एनसेफ्लायटिस, तसंच डेंग्यू, व्हायरल हिपेटायटीस, स्वाइन फ्ल्यू, टोमॅटो फ्ल्यू, मंकीपॉक्स, या आजारांचा भारतातला पहिला रुग्ण केरळमध्येच आढळला. काही वर्षांपूर्वी ज्या आजाराने संपुर्ण जगाल हादरून टाकलं होतं. त्या महाभयंकर कोरोनाचाही भारतातील पहिला रुग्ण केरळमध्येच सापडला होता आणि आता जुनाचं पण नव्यानं आलेल्या ही पहिला निपाह रोगाचा पहिला रुग्ण इथेच सापडला आहे. त्यामुळे कोणताही रोग भारतात आला तर त्याचा पहिला रूग्न हा केरळमध्येच सापडला जातो. या सर्व रोगाचं सेंटर केरळ राज्य बनण्याचे अनेक कारणंही आहेत.

केरळ हे राज्य रोगांच सेंटर बनन्यां पहिलं कारण म्हणजे बाहेर देशातला वाढता प्रवास.

केरळ एक असं राज्य आहे कि त्या राज्यातील बहूतांश कुटूंबातील एक तरी व्यक्ती बाहेरच्या देशात नोकरीसाठी किंवा शिक्षणासाठी गेलेला आहे. बहूतांश विद्यार्थी हे वैद्यकीय शिक्षण घेतात व डॉक्टर म्हणून काम करततात. त्यामुळे त्या ठिकाणच्या आजारांचा सामना त्यांना करावा लागतो. त्यामुळे केरळमध्ये संसर्ग आढळण्याचं पहिलं आणि मुख्य कारण म्हणजे केरळी लोक आहेत.

केरळ राज्य जगाच्या वेगवेगळ्या भागासोबत जोडलं गेलेलं आहे. तसेच केरळ राज्याला एक नैसर्गिक देण आहे. त्यामुळे भारताच्या इतर भागासहीत विदेशातील पर्यटकही आधिक प्रमाणात केरळला येत असतात. भारतातील इतर पर्यटन क्षेत्रापैकी केरळला येण्याचा कल अधिक प्रमाणात आहे. तज्ञांचं व संशोधकाचं म्हणणं आहे कि विदेशात वेगवेगळ्या भागात राहणारे व्यक्ती जेव्हां केरळमध्ये येतात. तेव्हा ते व्यक्ती संसर्ग वाढवण्यासाठी कारणीभूत आसण्याची शक्यता अधिक प्रमाणात असते.

केरळ सेंटर बनण्याचं दुसरं कारण म्हणजे सतर्क प्रशासन

केरळ हे दाट लोकसंख्येचे राज्य आहे ज्यामध्ये विविध पार्श्वभूमीतील लोक मोठ्या संख्येने आहेत आणि विविध स्तरांवर आरोग्य सेवा उपलब्ध आहेत. कमी लोकसंख्या असल्यामुळे आणि आरोग्य विषय सर्व सुविधा आसल्यामुळे लोकांच्या तपासण्या आधिक गतीने होण्यास त्या ठिकाणी मदत मिळते. याचा अर्थ असा की या राज्यात कोणताही नवीन विषाणू ओळखला जाण्याची अधिक शक्यता असते.

राज्यात चांगल्या प्रकारे विकसित आरोग्य पायाभूत सुविधा आहेत ज्यामुळे कोणत्याही नवीन विषाणूचे जलद निदान आणि उपचार करता येतात. तसेच त्या ठिकाणचं प्रशासनही कुठलाही व्हायरस असेल तर ते लगेच जाहीर करतात, यामुळे लोक आधिक सतर्क होतात व तपासण्या करतात. हे एक केरळमध्ये सर्वाधिक रूग्न आढळण्याचं कारणही आहे. यामुळे त्या ठिकाणचे लोक आरोग्याला आधिक प्रमाणात प्राधान्य देतात व तपासण्या करतात. यामुळे इतर राज्यापेक्षा रूग्न आढळण्याचं प्रमाण केरळमध्ये आधिक प्रमाणात आहे.

आणखी एक महत्वाचं कारण म्हणजे जंगलांचा होणारा ऱ्हास.

केरळ हे पर्यटनासाठी ओळखल जाणारं राज्य आहे. त्यामुळे राज्यात छोट्या मोठ्या उद्योगाला चालना मिळत आहे. त्यामुळे जंगली भागात हॉटेल्स व छोटो दुकानं आणि घरं बाधण्याचे प्रमाण आधिक प्रमाणात वाढलं आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात जंगल नष्ट होत आहेत. जंगलातील प्राणी मानव वस्तीकडे येण्यास सुरवात झाली आहे. जगंल तोड झाल्यामुळे जंगलातील फळ किंवा अन्न म्हणून वापरणाऱ्या सर्व गोष्टी संपुष्टात येत आहेत. अन्नाच्या व निवाऱ्याच्या शोधात त्या ठिकाणच्य प्राण्यांनी आणि पक्षांनी आपला मोर्चा मानव वस्तीकडे वळवला आहे.

जंगलात मानव वस्ती तयार झाल्यामुळे वटवाघूळ सारखे पक्षी मानवी वस्तीकडे आकर्षित होत आहेत.

वटवाघूळ या पक्षामुळे अनेक प्रकारचे रोग पसरण्याची भिती काही तज्ञांनी व्यक्त केली आहे. वटवाघूळ हा पक्षी अनेक रोग घेऊन फीरत असतो असं तज्ञांनी केलल्या आभ्यासात समोर आलेलं आहे.

जंगलात राहणाऱ्या सिव्हेट मांजरीही आता शहरात राहणाऱ्या प्राणी बनल्या आहेत. या मांजरीमुळे अनेक रोगांना सहजतेने लोकांपर्यंत पोहचण्यास मदत होत असते. आता सध्या चर्चेता असलेला निपाह हा रोग वटवाघूळ आणि मांजरी पासुनच पसरलेला आसल्याचं तज्ञांचं म्हणणं आहे. शिवाय शहरातील वाढता कचरा जंगल परिसरात फेकल्यामुळे जमीनीत वास्तव्याला असलेली उंदीरही आता बाहेर निघत आहेत. उंदीर लेप्टोस्पायरोसिससारखे रोग पसरवण्यासाठी ओळखले जातात. अशा कितीतरी प्राणी, पक्षी आणि लहान जीवांमुळे रोग उदयास येण्याचं आणि वाढण्याचं प्रमाण केरळात अधिक प्रमाणात आहे.

केरळ राज्यात सर्वात पहिले संसर्ग आढळण्याचे कारणं काही चांगले तर काही वाईटही कारणं आहेत. प्रशासन व नागरीकांची आरोग्याविषयी आसलेली खबरदारी ही एक जमेची बाजू आहे. तर बाहेरील नागरीकांचा वाढता कल आणि पर्यावरणाचा ऱ्हास. या सर्व गोष्टीमुळे केरळमध्ये कोणत्याही आजाराचा पहिला रूग्न सापडतो.

हे ही वाच भिडू:

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.