भारत आणि कॅनडचा वादात चर्चेत आलेली, फाईव्ह आईज अलायन्स काय आहे?
भारत आणि कॅनडा या दोन्ही देशांमधला सुरु झालेला वाद आता अतिशय गंभीर वळणावर आला असून, दोन्ही देशांमध्ये याचे पडसाद उमटतानाही दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी देशाच्या संसदेमध्ये केलेल्या आरोपांमुळे हा संघर्ष टोकाला गेलाय. खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्या प्रकरणात भारताचा सहभाग असल्याचा थेट आरोप ट्रूडो यांनी केला होता.
यानंतर आरोपांचं हे सत्र सुरुच राहिलं आणि अखेर भारतातूनही कॅनडाचा विरोधात कारवायांना सुरवात केली. आता या सगळ्यात एका संघटनेची चर्चा होत आहे ती म्हणजे, फाईव्ह आय इंटेलिजन्स अलायन्सची. सध्या कॅनडा फाईव्ह आय इंटेलिजन्स अलायन्सकडून पाठिंबा मिळावा अशी अपेक्षा करत आहे. फाईव्ह आय अलायन्स काय आहे? भारत कॅनडा वादात या अलायन्सची भुमिका काय आहे? भारत आणि कॅनडाचा वाद अलायन्स मिटवणार का? जाणून घेऊयात.
सुरवातीला पाहू फाइव्ह आय अलायन्सची सुरवात कशी झाली?
फाईव्ह आय अलायन्स पाच देशांची आंतरराष्ट्रीय सुरक्षा संघटना आहे. ज्यामध्ये अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि कॅनडा या पाच देशांचा समावेश आहे.
या संघटनेची सुरवात १९४३ मध्ये यूके-यूसए यांच्या कराराने झाली. ज्याला ब्रुसा करार म्हणून ओळखल जातं.
पुढे १९४७ मध्ये कॅनडा आणि त्यानंतर १९५६ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचा त्यात समावेश झाला.
जेव्हा दुसरं महायुध्द झालं तेव्हाच खऱ्या अर्थाने या संघटनेची औपचारीक सुरवात झाली होती. त्यानंतर शीत युध्द सुरू झालं या महायुध्दापासून एकमेकांना मदत करण्यासाठी, देशांना सुरक्षित ठेवण्यासाठी एकत्र काम करत आहेत. दहशतवाद, सायबर हल्ले, आणि इतर समस्यांबद्दल हे देश चर्चा करून त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत असतात.
फाईव्ह आय अलायन्सची ताकद किती आहे?
फाईव्ह आय अलायन्स ही जगातील सर्वात तकादीची सिग्नल इंटेलिजन्स आहे. माहीती गोळा करणं हा महत्वाचा अजेंडा या संघटनेचा आहे. विशेष म्हणजे सायबर हल्ले शोधण्यासाठी आणि करण्यासाठीही ओळखली जाणारी ही संघटना आहे. या संघटनेतल्या देशांकडे जगातील सर्वात प्रगत असं तंत्रज्ञान, साधणं आणि काम करणारे लोक आहेत. तसेच त्यांचे माहीती गोळा करणारे उपकरनही अनेक ठीकाणी विस्तारलेले आहेत. ज्यामुळे त्यांना माहीती गोळा करणे सहजपणे शक्य होतं.
ज्याचा फायदा ते अधिक प्रमाणात घेत असतात. तसेच एक विशेष म्हणजे पाचही देश वेगवेगळ्या पध्दतीने गुप्त माहीती गोळा करण्यात माहीर आसल्याचं त्यांच्या कामातून दिसुन येतं. मिळालेली माहीती योग्य आणि सोप्या पध्दतीने शेअर आणि सादर केली जाते. ज्यामुळे पुढील आमंलबजावणी करण्यासाठी त्यांना सोयीचं होतं. त्याच बरोबर पाचही देश सातत्याने माहीतीच्या संदर्भातले आपडेट एकमेकांना पुरवत असतात आणि त्यावर तोडगा काढत असतात. त्यामुळे त्यांच्या एकत्रीत येत काम करण्याच्या पध्दतीमुळे जगातील सर्वात लवकर आणि खरी माहीती गोळा करणारी संघटना म्हणून उदयास आली आहे. जे की, या संघटनेची ताकद आहे.
आता सध्या सुरू असलेल्या भारत आणि कॅनडा वादातही, फाईव्ह आय इंटेलिजन्स अलायन्समधील आपले सहकारी असलेल्या कॅनडाची मदत करण्यास मैदानात उतरली असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
पण, अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड यांचा पाठींबा मिळावा म्हणून कॅनडाचे प्रयत्न सुरू असल्याच्या बातम्या येत आहेत.
आता भारत आणि कॅनडा यांच्या वादात या फाईव्ह आय अलायन्समधील चार देशांनी काय भुमिका घेतली आहे, ते पहाणं महत्वाचं आहे.
भारत आणि कॅनडा या वादावर अमेरिकीने भारतावर लावले आरोप हे गंभीर आहेत असं म्हणलं आहे. तसेच या संदर्भात भारताने कॅनडाला चौकशीसाठी मदत करायला हवी असं म्हणत. भारत आणि कॅनडा यांच्यातील वादाला पडदा टाकण्यासाठी सध्या तरी अमेरिकेने पाऊल उचलण्याची तयारी सुरू केली. त्यानंतर फाईव्ह आय अलायन्समधील दुसरा देश ऑस्ट्रोलिया, ऑस्ट्रोलियानेही या आरोपावर चिंता व्यक्त केली आहे. तसेच आम्ही आमचं म्हणणं भारतातील उच्चस्थरीय अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवलं आहे.
सर्व देशांनी एकमेकांच्या सार्वभौमत्वाचा आणि कायद्याच्या राज्याचा आदर केला पाहिजे, यावर आमचा विश्वास असल्याचं ऑस्ट्रेलियानं म्हटलं आहे. अशी सावध प्रतिक्रिया देत ऑस्ट्रोलियानेही वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर तिसरा देश असलेल्या ब्रिटनेने या बाबत बोलताना त्यांच्या प्रवक्त्याने म्हटलं की, कॅनडाने भारतावर गंभीर आरोप केला आहे, मात्र सध्या यावर कोणतीही प्रतिक्रिया देणं योग्य ठरणार नाही. तर चौथा देश असलेल्या न्यूझीलंडने तर यावर काहीच वक्तव्य केलेलं नाही.
फाईव्ह आय अलायन्सच्या सदस्य असलेल्या कॅनडा सोडल्यातर चार पैकी तीन देशांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्नच केला आहे. तसेच वाद मिटवण्यासाठी पाऊलही टाकल्याचं दिसत आहेत. त्याची काही कारण आहेत.
त्याच कारण असं आहे, भारत, अमेरिका, ऑस्ट्रोलिया आणि जपान यांची क्वाड नावाची संघटना एकत्रीत काम करते. ज्याचा उद्देश देशातील सुरक्षा संबधीत आहे. त्यामुळेही अमेरिका आणि ऑस्ट्रोलिया भारताला उघडपणे विरोध करू शकत नाहीत. त्यात महत्वाची भुमिका आहे ती म्हणजे अमेरिकेची, त्याचं कारण असं आहे की, भारताच्या मदतीने अमेरिका चीनला काउंटर करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यातच रूस आणि युक्रेन युध्दातही भारताच्या समर्थनाची खुप मोठी गरज आहे. आता भारत आणि कॅनडा वादात अमेरिकेने कॅनडाची भुमिका घेतली तर त्यांच्यासाठी अडचणीचं होऊ शकतं. यामुळे या वादात अमेरिका जरा जपून पाऊलं टाकत आहे.
ऑस्ट्रोलिया भारता सोबत क्वाड या संघटनेत आहे. तसेच ऑस्ट्रोलियाने सुरक्षाच्या संदर्भात भारता सोबत एक सैनीकांसाठी अभ्यास सुरू केला होता ज्याला ऑस्ट्रा हिंद २०२२ असं नाव देण्यात आलं होतं. ऑस्ट्रोलिया आणि भारत हे दोन्ही देश सध्या आर्थिक आणि व्यापारी विषयावरती चर्चा करत आहेत. असं असताना ऑस्ट्रोलिया थेट कॅनडाची बाजु न घेता वाद मिटवण्याचा प्रयत्न करू शकते.
त्यानंतर येत ब्रिटन, ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान झाल्या पासुन भारत आणि ब्रिटनचे संबध अधिक चांगले झाले आहेत. भारत आणि ब्रिटनमध्ये शिक्षण आणि व्यापार या विषयावरही अधिक प्रमाणात चर्चा होत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे ब्रिटनने कुठलीच एक बाजु अजून तरी स्पष्ट केली नाही. त्यामुळे ब्रिटनचाही प्रयत्न हा वाद थाबण्याचा असु शकतो. यात आता न्यूझीलंडने भुमिका मांडली जरी आणि न्यूझीलंडचे भारताबरोबर संबध अधिक घट्ट जरी नसले तरीही, या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न न्यूझीलंडही करेल असं तज्ञांच म्हणंण आहे.
मिडिया रिपार्टनुसार फाईव्ह आय अलायन्स वाढण्याची शक्यता ज्यामध्ये आणखी चार देशांचा समावेश करण्यात येऊ शकतो ज्यात भारताचं नावही आघाडीवर आहे.
असं असताना फाईव्ह आय अलायन्स भारताच्या विरूध्द भुमिका न घेता हा वाद संपवण्याचा प्रयत्न करू शकते.
भारत आणि कॅनडाचे वाद आता दिवसेंदीवस वाढतच आहेत. त्यात फाईव्ह आय अलायन्स या संघटनेची होत असलेली चर्चा, यामुळे या वादाची आता अंतरराष्ट्रीय चर्चा होत आहे असं दिसून येत आहे. या आधीही दुसऱ्या महायुध्दाच्या वेळेस शांतता प्रास्थापित करण्याचं आणि विश्वयुध्द थांबण्याचे प्रयत्न अमेरिका आणि यूके या दोन देशांनी केले होते. त्यामुळे आता या देशांनी घेतलेली दोन्ही देशाच्या बाजुची सामंजस्य भुमिका भारत आणि कॅनडाचा वाद मिटवणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
हे ही वाच भिडू:
- 1929 पासून सुरू झालेलं खलिस्तानचं वारं पुन्हा एकदा वाहू लागलंय, पण यावेळी कॅनडामधून
- कॅनडाच्या ११ मोस्ट वॉन्टेड गॅंगस्टर्स पैकी ९ जण भारतीय वंशाचे आहेत
- पंजाबी लोकांनी कॅनडात इतका दरारा कसा निर्माण केला आहे…?
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.