ट्रॅव्हल एजेन्सी ते विमान कंपनीचे मालक असं स्वप्न पूर्ण केलं मात्र ते टिकवता आलंच नाही…

आपण अनेकांच्या शुन्यातून विश्व निर्माण केल्याच्या स्टोरीज ऐकल्या असतील. आपल्या डोळ्यासमोर अनेक उदाहरणही आले असतील. संघर्ष करत अगदी मेहनतून नाव लौकीक मिळवण्यासाठी अनेक वर्ष लागतात.पण, ते नाव पडद्या आड जाण्यासाठी अगदी काही दिवस. असचं काहीस घडलं आहे एका प्रसिध्द विमान मालका सोबत कंपनी तर बंद झालीच. पण, इडीकडून अटकही करण्यात आली. जेट एअरवेजचे मालक नरेश गोयल यांना कँनरा बँकेतील ५३८ कोटी घोटाळ्याप्रकरणी शुक्रवारी रात्री अटक करण्यात आली.

नरेश गोयल यांचा प्रवास कसा होता जाणून घेऊयात.

नरेश गोयल यांचा जन्म २९ डिसेंबर १९४९ रोजी पंजाबमधील संगरूर येथे एका सोन्याचे व्यापारी असलेल्य कुटुंबात झाला, तरीही नरेश गोयल यांना लहानपणापासूनच अडचणींचा सामना करावा लागला. लहानपणीच वडिलांच्या आकस्मिक निधनाने वडीलांच छत्र हरवलं. त्यानंतर नरेश गोयल याचं सरकारी शाळेत शिक्षण झालं.त्या वेळी ते फक्त ११ वर्षांचा होते.

तेव्हा ते आणि त्याचे कुटुंब मोठ्या आर्थिक संकटातून जात होते. बँकेच्या कारवाईमुळे गोयल कुटुंबाची जवळपास सर्व मालमत्ता जप्त करण्यात आली. ज्यामध्ये त्यांच स्वतःच घरही गेलं. त्यावेळी त्यांच्या मामाने त्यांना मदत केली. पदवीपर्यंतचा शिक्षणाचा खर्च मामानी उचलला. त्यांना सी.ए. बनायचं होतं. पटियालाच्या विक्रम कॉलेज ऑफ कॉमर्समधून बी.कॉम केलं. पण, वडील गेल्या नंतर जगण्याचा संघर्षच त्यांच्या समोर होता.

त्यामुळे त्यांनी १९६७ मध्ये दिल्ली गाठली आणि आपला मावस भाऊ चालवत असलेल्या कॅनॉट प्लेसच्या बाहेर एका ट्रॅव्हल एजन्सीमध्ये महीना ३०० रूपये पगारात काम केल.

त्यानंतर त्यांनी या व्यावसायात आपल प्रस्थ वाढवण्याची सुरवात केली. १९७३ मध्ये गोयल यांनी स्वतःची ट्रॅव्हल एजन्सी उघडली आणि जेट एअर असे नाव ठेवल. जेव्हा ते कागदी तिकिटं घेण्यासाठी विमान कंपन्यांच्या ऑफीसमध्ये जायचे तेव्हा तिथले लोक त्यांना आपल्या ट्रॅव्हल एजन्सीचे नाव एअरलाइन कंपनीसारखे असल्याचे सांगून त्यांची खिल्ली उडवायचे. तेव्हा गोयल म्हणायचे की, एक दिवस ते नक्कीच स्वतःची एअरलाइन कंपनी उघडतील. हेच स्वप्न उराशी बाळगुन त्यांनी त्या दरम्यानच्या काळात त्यांचे मित्र जे जॉर्डन, आखाती आणि दक्षिण पूर्व आशिया या विदेशी एअरलाइन्सचे असल्यामुळे त्यांनी विमान वाहतूकीचा संपूर्ण व्यवसाय समजून घेतला.

तिकीटांच्या वाटपा पासून ते भाडेतत्त्वावर विमान घेण्यापर्यंत त्यांनी चांगला आभ्यास केला.

त्यानंतर १९७४ मध्ये त्यांनी ALIA, Royal Jordanian Airlines चे प्रादेशिक मॅनेजर म्हणून काम केल. मिडल ईस्टर्न एअरलाइन्सच्या भारतीय ऑफीसमध्ये  काम करून त्यांनी तिकीट, आरक्षण आणि विक्री यासारख्या विविध विभागात काम करत अनुभवही मिळवला. त्यानंतर त्यांची फिलीपीन एअरलाइन्सचे प्रादेशिक मॅनेजर म्हणून निवड करण्यात आली, जिथ त्यांनी भारतातील एअरलाइन्सच्या उद्योगाचं काम केलं. १९७४ मध्ये त्यांनी आईकडून काही पैसे घेऊन आणि एअर फ्रान्स, ऑस्ट्रेलियन एअरलाइन्स आणि कॅथे पॅसिफिकच्या धर्तीवर जेट एअर नावाची स्वतःची एजन्सी सुरू केली.

१९९१ मध्ये एअर टॅक्सीच्या रुपयात जेट एअरवेजची सुरूवात करत गोयल यांनी स्वप्न पूर्ण केल. एक वर्षानंतर त्यांनी चार जेटचा ताफा तयार केला आणि जेट विमानांचे पहिल उड्डाण सुरू झाल.  एअर जेटचं प्रस्थ चांगलच वाढलं. २००२ हे वर्ष जेट एअरवेजसाठी ऐतिहासिक ठरलं कारण या वर्षी जेट एअरवेजने भारतीय एअरलाइन्सला मागे टाकलं.

२००५ मध्ये एअरलाइनने भांडवली बाजारात इन्ट्री केली आणि २० टक्के भागीदारीसह गोयल यांची एकूण संपत्ती ८,००० कोटी रुपयांच्या पुढे गेली.

पण, जेटच्या सुरुवातीपासुनच कंपनीच्या पैशाचा सोर्स कोणता हा प्रश्न उपस्थित होत होता. त्यातच विदेशात उड्डाण करणारी जेटला एक नंबरची कंपनी बनवण्याच्या नादात २००७ मध्ये  एअर सहारा कंपनी विकत घेण्यात आली. या डीलमध्ये जेट एअरवेजला २७ विमानं आणि काही आंतरराष्ट्रीय मार्ग मिळाले. गोयल यांच्या या निर्णयाकडे चूक म्हणून पहिल जाऊ लागल, तेव्हापासून कंपनी खऱ्या अर्थाने आर्थिक अडचणीतून कधीच सावरू शकली नाही. नरेश गोयल यांनी एअर सहाराचे नाव बदलून जेटलाइट असं केलं आणि स्वस्त तिकिटांसह ती पूर्ण सेवा विमान कंपनी म्हणून चालवली. येथूनच कंपनी आर्थिक अडचणीत सापडल्याची तज्ज्ञांच म्हणणं आहे. या काळात जेट एअरवेजच्या विस्तारावरही भरपूर पैसा खर्च झाला. त्या अगोदर २००० मध्ये त्यांच्या विरोधात एक जनहीत याचिका दाखल करण्यात आली. ज्यात त्यांचे दाऊद सोबत संबध असल्याचे बोलल जात होत.

कंपनीची स्थापना दाऊद याने केली अशीही चर्च सुरू होती. पण, ती चर्चा थांबली आणि त्यांना क्लिन चिट देण्यात आली.

काही काळानंतर भारतीय विमान वाहतूक क्षेत्रात बजेट एअरलाइन्सच्या एन्ट्रीमुळे संपूर्ण उद्योगाची परिस्थिती बदलत होती. २००४ आणि २००५ मध्ये बजेट एअरलाइन्सने विमान व्यावसाय कायमचा बदलला. इंडिगो आणि स्पाइसजेट सारख्या विमान कंपन्यांनी त्यांच्या कमी किंमतीच्या, नो-फ्रिल मॉडेलने संपूर्ण व्यवसायाला हादरवून सोडल. २०१२ मध्ये भारताच्या विमान वाहतूक क्षेत्रात मोठा बदल घडला जेव्हा इंडिगोने स्थानिक मार्केटमधील शेअर्समध्ये जेट एअरवेजला मागे टाकल. त्याच वेळी रुपयाची घसरण आणि तेलाच्या वाढत्या किंमती यामुळे विमान कंपन्यांसाठी अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे विमान कंपन्यांच संकट वाढतच गेल.

जेटने एकूण १३,००० कर्मचाऱ्यांपैकी १,९०० कर्मचाऱ्यांना काढून टाकले. कंपनीच्या या निर्णयामुळे नरेश गोयल यांच्यावर अनेक प्रश्न उपस्थित झाले.

नंतर शासनाच्या मध्यस्थीनंतर कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घ्याव लागल. २०१३ मध्ये, UAE च्या इतिहादने जेट एअरवेजमध्ये २४ टक्के हिस्सा विकत घेतला. पण गोयल यांनी त्यांची ५१ टक्के हिस्सेदारी कायम ठेवली.तरीही जेटचा कंपनीचा पाहिजे तितका फायदा होत नव्हता. जेट एअरवेजवर २५  इतर बँकांच ८,५०० कोटी रुपयांच कर्ज होत. याशिवाय, कंपनीने २३,००० कर्मचारी १३,००० कोटी रुपये देणे बाकी होते.

नोव्हेंबर २०१८ पासून कंपनीला अनेकवेळा नुकसान सहन करावे लागल. त्यानंतर २२ नोव्हेंबर २०१८ रोजी कंपनीचे स्वतंत्र संचालक रंजन मथाई यांनीही राजीनामा दिला. तेव्हापासून कर्मचाऱ्यांना पगार मिळू शकला नाही. एप्रिल २०१९ मध्ये मोठ्या कर्जाबाजीपनामुळे कंपनी बंद झाली. त्यानंतर कंपनीचे मालक नरेश गोयल यांच्यावर विदेशी कंपन्यांमध्ये पैसे गुंतवण्याचा आणि अनेक देशांमध्ये चुकीच्या पद्धतीने गुंतवणूक केल्यामुळे व कॅनरा बँकेशी संबंधित ५३८ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोपही त्यांच्यावर झाला. ईडीच्या चौकशीत ते दोशी आढळल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

एके काळची ब्रॅंड म्हणून हवेत असलेली एअर जेट कंपनी कायमची खाली आली. नरेश गोयल यांनी स्वप्न बघितलं पुर्णही केलं. पण, ते टीकवता आलं नाही असंच म्हणावं लागेल.

हे ही वाच भिडू:

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.