पब्जीच्या खोट्या युद्धातले सैनिक करत आहेत खऱ्या शहिदांच्या कुटुंबियांना मदत

पब्जी हा गेम आपल्यापैकी कुणाला माहिती नसेल असे होणार नाही. अनेकजण खेळत ही असालच. पण हा गेम जसा भारतात प्रसिद्ध झाला तसेच या गेमचे अनेक दूषपरिणाम समोर येऊ लागले आहेत. गेम च्या आहारी जाऊन कोणी खून केला तर कोणी अत्महत्या. महाराष्ट्र, गोवा राज्यात यावर बंदी आण्याची मागणी देखील होत आहे. तसेच देशभरात अनेक ठिकाणी या गेमवर बंदी घालण्याबाबत याचिका दाखल होत आहेत. गेमिंग हे एकदा व्यसन झालं कि त्याचे दूषपरिणाम भोगावे लागतातच.

पण जशा प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात तसेच या गेमची आणि तो खेळणाऱ्यांची एक चांगली बाजू देखील आहे. त्याबद्दल आम्ही तुम्हाला सांगूच पण त्याआधी थोडीशी या गेमची माहिती घेऊ.

‘पब्जी’ या गेमची निर्मिती ‘ब्ल्यूहोल’ या कंपनीने २०१७ साली केली आहे. या गेमचे मोबाइल व्हर्जन ‘टेन्सेंट मोबाइल’ कंपनीने बाजारात आणले. ‘पब्जी’ मध्ये तीन मुख्य जागा असून, त्याचे नकाशे आपल्याला दिसतात. त्यापैकी एक नकाशा निवडून आपण खेळायला सुरुवात करू शकतो. हा गेम एकट्याने किंवा दोघांत किंवा चौघांतही खेळला जाऊ शकतो. हा गेम अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही ऑपरेटिंग सिस्टीमवर उपलब्ध आहे.

शिवाय हा गेम कॉम्प्युटरवर देखील उपलब्ध आहे. सध्या मोबाइल डेटा अतिशय स्वस्तात उपलब्ध असल्याने गल्लोगल्ली मोबाइल आडवा धरून कानात हेडफोन घालून मुले, मुली आणि काही ज्येष्ठ मंडळीही हा गेम खेळताना दिसतात.

ब्रेंडन ग्रीन हा पबजी गेममागील खरा चेहरा आहे. आजपर्यंत सगळ्यात जास्त खेळला गेलेला गेम म्हणून याने विक्रम ही नोंदवला आहे.

 आपण आपल्या नाण्याची दुसरी बाजू जाणून घेऊ.

तर या गेमच अजून एक वैशिष्ट्य म्हणजे हा गेम खेळत असतांना तुम्ही तो युट्यूब वर लाइव्ह प्रसारीत करू शकतो ते ही. हे करतांना तुम्ही सुपरचॅट करून या खेळणाऱ्या लोकांना पैसे देऊ शकता. असे अनेक स्ट्रीमर सध्या युट्यूबवर धुमाकूळ घालत आहे. यांचे २ मिलियन पर्यंत सबस्क्रायबर्स आहेत. युट्यूब या सुपरचॅट मधली ३० टक्के रक्कम कर म्हणून घेत असल्याने यांच्या पैकी अनेकांनी पेटीयम,गुगल पे अशा माध्यमांचा देखील उपयोग करून घेत आपला ह्या गेमिंगच्या नादाचे व्यवसायात रुपांतर केले आहे.

१४ फेब्रुवारी हा दिवस आपल्या सगळ्यांसाठीच वेदना देणारा होता. पुलवामा येथे झालेल्या अतिरेकी हल्यानंतर सगळा देश दुखाच्या लाटेत होता. आपल्या पैकी कित्येक जणांनी आपल्या शहीद वीर जवानांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी म्हणून पैसे देखील दान केले आहेत. अशा परिस्थितीत आपण सगळेच एकत्र होऊन निषेद करण्या बरोबरच सैनिकांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या पाठीमागे ठामपणे उभे आहोत.

असेच दान या गेम खेळणाऱ्या, आपल्या मते काम नसलेल्या मुलांनी देखील केले. या गेमचे मागील दोन दिवस या युट्यूब स्ट्रीमरस पैकी अनेकांनी भारतीय जवानांना समर्पित स्ट्रीम केल्या. या माध्यमातून लोकांनी त्यांना पेटीयम, गुगल पे, सुपरचॅटच्या माध्यमातून भरभरून पैसे देखील दिले. हे सगळे पैसे ही तरुण मूलं जवानांच्या कुटुंबियांना दान करणार आहेत.

सगळ्यात महत्वाचे म्हणजे असे किती गोळा झाले असतील ?

दान करतांना या प्रश्नाचे काहीच महत्व नसले तरी असा प्रश्न आपल्याला पडलाच असेल. तर या तरुणांना मध्ये सगळ्यात प्रसिद्ध असणऱ्या डायनमो या गेमरने सुमारे दीड लाख रुपये एकत्रित केले, तसेच कॅरीमिनाटी नावाच्या दुसऱ्या गेमरने देखील एका लाख ५८ हजार इतकी रक्कम जवानांसाठी एकत्रित केली आहे.

याच पद्धतीने अल्फा, गरीबो, श्रीराम, अशा अनेक तरुणांनी या गेमच्या माध्यमातून एकत्रित केलेले पैसे सैन्यासाठी दान करायचे ठरवले आहे. आम्ही आपल्याला युट्यूब घेत असलेल्या ३० टक्के रकमे बद्दल सांगितलेच आहे, तर ही कापण्यात आलेली रक्कम ही तरुण मुल स्वतः दान करणार आहेत.

खरच एखाद्या गोष्टीचा जितका म्हणून गैफायदा तरुण घेतात, त्यांच्यावर त्यासाठी जितकी विखारी टीका होते. त्याच पातळीवर ही पिढी आदर्शवत अशी काम देखील करते याचेच हे उदाहरण आहे.

या तरुणांनी केलेले हे कार्य खरच अनेकांसाठी प्रेरणादायी असेच आहे.

हे ही वाच भिडू.

1 Comment
  1. Shubham pawar says

    Best article

Leave A Reply

Your email address will not be published.