आज मी ३० वर्षांचा आहे, तरिही मी आज “तिरंगाच” बघणार कारण…

सॅट मॅक्स आणि सुर्यवंशमच एक नात आहे. लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात तसच हे नातं. 90’s म्हणून मिरवणारे मुलं “दिल मेरे तू दिवानां हे” म्हणून झोपत होती अस हे नातं. असच दूसरं नात म्हणजे तिरंगा आणि क्रांन्तीवीर सिनेमाचं.

२६ जानेवारी आणि १५ ऑगस्टला सकाळी शाळेत कपडे घालून जायचं असतं. NCC वाल्यां मुलांसाठी हा दिवस खास असायचा. खिश्यावर तिरंगा असायचा. तेव्हा इतकं प्लॅस्टिक नसायचं असा तो काळ. कागदाचा झेंडा आणि त्याला कुल्फीला असायची तसली काडी. बस इतक्याच गोष्टीत खर देशप्रेम असायचं.

१५ ऑगस्ट असला तर जिलेबी असायचं. बर हे सर्व करुन जास्तीत जास्त अकरा वाजता घरी यायचो. दूरदर्शनचा काळाबरोबर झी दिसत होता. केबल वाल्यांनी ८० रुपयाच्या पॅकेजमध्ये खंडीनपिंडी चॅनेल दाखवण्यास सुरवात केली होती.

असो पण ते महत्वाच नाही, महत्वाचा आहे तो ब्रिगेडियर सुर्यप्रताप सिंग, इन्स्पेक्टर वागळे आणि प्रलयनाथ. हा खेळ सुरू व्हायचा तो या सगळ्या गोष्टींमधून मोकळं झाल्यानंतर. खरा देशप्रेमाचा ज्वर तिथे असायचा.

प्रोफेसर साब वो फोन हमने हिं आपके पत्नी से करवाया थां. ये पुलिस भी हमारी हें. पहिल्याच शॉटला थेट अणुबॉम्ब करण्याच्या ताकदीच्या तिघा संशोधकांच अपहरण करुन हा खेळ सुरू करण्यात येतो. भारताला गुलाम बनवण्याची मनीषा असणारा प्रलयनाथ गुंडास्वामी पूर्ण देशात हथियारोंका नंगा नाच सुरु करतो.

गेंडास्वामीच्या प्लॅनमध्ये आडकाठी करत असतो डिआयजी रुद्रप्रताप चौहान (सुरेश ओबेरॉय, आद्य देशभक्त विवेक ओबेरॉयचे बाबा). तर या रुद्रप्रताप चौहानला गुंडास्वामी बीचवर घोडेस्वारी करत करत तलवारीने मारून टाकतो.(GOT च्या भक्तांनी हा सीन आवर्जून पहावा…क्लिगेन भावंडाची टूर्णी फिकी पडेल.) गुंडास्वामी प्रत्येक खून केल्यावर जे काही हसतो त्याची तुलना गब्बरसिंग बरोबर करावी.

रुद्रप्रतापसिंग यांच्या अंत्यसंस्कारच्या वेळी एन्ट्री होते इन्स्पेक्टर वागले(पिक्चर मध्ये वागले खरोखर वागळे). रोल केला आहे ‘अरे निखील तुही चांगला आहेस” म्हणणारे नाना. पहिल्याच सीन मध्ये नाना दिल्लीला आणि मंत्र्याला आपल्या टाळ्याखाऊ स्टाईलमध्ये शिव्या घालतो. हळूहळू सगळ्यांची एन्ट्री होत असते पण हिरो कुठ आहे?

गृहमंत्री झालेले संस्कारी बाबूजी आलोकनाथ हे प्रलयनाथ गुंडास्वामीला संपवण्याची जबाबदारी मिल्ट्रीवर द्यायची का याची चर्चा करत असतात त्यावेळी कोणीतरी त्यांना सांगतो प्रलयनाथला संपवायला एक अधिकारीच बास आहे

“ब्रिगेडियर सूर्यदेव सिंग”

सगळ्यांप्रमाणेच गेंडास्वामीला उत्सुकता असते हा ब्रिगेडियर आहे तरी कोण? त्याला एक थिएटरमध्ये डॉक्युमेंट्री दाखवण्यात येते ज्यात १९६२च्य युद्धात केलेल्या पराक्रमाबद्दल परमवीरचक्र वगैरे सूर्यदेव सिंगच्या पराक्रमाच्या गाथा सांगितल्या जातात. गेंडास्वामी म्हणतोय त्याला गोळ्या घालून संपवून टाकू. एवढ्यात थिएटरच्या अंधारात फेमस खर्जातला आवाज येतो,

“न तलवार की धार से ना गोलीयो की बोछारसे बंदा डरता है तो सिर्फ परवरदिगार से.”

डायरेक्ट व्हिलनच्या घरात घुसून त्याला घाम फोडणारी इंट्री करणे हे फक्त राजकुमारलाच शोभते. असे हे डायलॉगचे दोन बादशाह नाना पाटेकर आणि राजकुमार जेव्हा एकत्र येतात तेव्हा बॉम्बची गरजच काय? दर एकएक मिनिटाला डायलॉगचे बॉम्ब फुटत असतात.

जर लॉजिक लावून बघायचा झाला तर या सिनेमामध्ये अनेक लॉजिकच्या पलीकडच्या गोष्टी आहेत. यात गळ्यात तिरंग्याचा पट्टा घालणाऱ्या सूर्यप्रतापची चोररस्ता असलेली बुलेटप्रुफ कार आहे, नाना पाटेकरला स्वप्नात जाऊन कानाखाली मारणारी वर्षा उसगावकर आहे, जीपीएससारखं लोकेशन सांगणारा ट्रान्समीटर आहे. अणुबॉम्ब डिफ्युज करणारा फ्युज कंडक्टर आहे.

Cth9oIMWIAAYSvP

देशभक्तीच्या मोजपट्टीत १० पैकी १० स्टार मिळवणारा हा सिनेमा लॉजिकच्या पट्टीवर शून्य स्टार मिळवणारा होता. याचा डायरेक्टर मेहुल कुमार याने या सिनेमानंतर समाजात क्रांती आणणाऱ्या कलमवाल्या बाईचा क्रांतिवीर बनवला.

तिरंगा मध्ये मराठा एक तो मरता है या मारता है असले डायलॉग म्हणणारा नाना या सिनेमात हिंदू का खून कोनसा मुसलमान का खून कोनसा असा पुरोगामी झाला होता.

आजकाल नेटफ्लिक्स वर इंग्लिश सिनेमे बघणारे हे सिनेमे बघून हसतात. पण ऐंशीच्या दशकात मारधाड सिनेमा आणि आजच्या पब्जीच्या, गेम ऑफ थ्रोंसच्या पिढीला जोडणारी नव्वदीत जन्मलेली माझी पिढी मात्र आजही हा सिनेमा बघून हळवी होते.

दरवर्षी पंधरा ऑगस्ट, २६ जानेवारीला राजकुमार सारखं कॉलर ताठ करून हे पिक्चर बघतो. नाना पाटेकरसारखं आमच्या पण स्वप्नात वर्षा उसगावकर सारखी क्रश कानाखाली वाजवते, पिल्यावर आम्ही पण दोस्ताबरोबर पिले पिले ओ मेरे राजा गाणं म्हणतो आणि कार बुक करताना बॉम्ब लावल्यावर पळून जायला चोरवाट आहे का हे विचारतो, आणि सर्वात महत्वाच देशभक्तीच प्रमाण आम्ही ब्रिगेडियर सुर्यदेव सिंग यांच्यापासून मोजायला सुरवात करतो.

हे ही वाचा. 

1 Comment
  1. मयूर says

    खरं आहे, मनातलं लिहिलंय.???? भारी.

Leave A Reply

Your email address will not be published.