या कारणांमुळेच प्रशांत किशोरचं सगळ्याच पक्षांसोबत बिनसतंय

बनाया था जिन्हें हमने प्यार के काबिल…

वो इतने काबिल हो गए, कि हम उनके काबिल ना रहे

प्रशांत किशोर यांची सध्या माझी अशीच अवस्था झाली आहे असं म्हणत असणार आहेत. भाजप, नितीश कुमारांचा जनता दल , काँग्रेस, जगनमोहन यांची वाईएसआर काँग्रेस,डीएमके या पक्षांबरोबर प्रशांत किशोर यांनी काम केलं. मात्र यातील आज एकाही पक्षानं प्रशांत किशोर यांना जवळ केलेलं नाहीये. यानंतर प्रशांत किशोर यांनी तृणमूल काँग्रेस बरोबर काम करण्यास सुरवात केली. ममता बॅनर्जी यांना बंगाल मध्ये सत्तेत बसण्यास मदत केल्यानंतर प्रशांत किशोर ममतांना राष्ट्रीय राजकारणात टॉपवर नेण्यास निघाले होते.

मात्र तिथंही आत बिनसलंय. एवढं की तृणमूल काँग्रेस प्रशांत किशोर यांना बाहेरचा रस्ता दाखवण्याचा मार्गावर आहे.

आधीच गोव्याच्या निवडणुकीत प्रशांत किशोर यांनी नको तेवढा हस्तक्षेप केला आहे त्यामुळं त्यांच्याबद्दल तृणमूलच्या नेत्यांचा राग होता.

 आता त्यांना बंगालच्या लोकल बॉडीच्या इलेक्शनमध्ये केलेल्या लुडबुडीमुळे प्रशांत किशोर यांनी आता बाऊंड्री ओलांडल्याचे सांगितलं जातंय. त्यामुळं प्रशांत किशोर यांचं सर्व पक्षांशी बिनसण्याची  ही कारणं सांगितली जातात.

नको तेवढा हस्तक्षेप –  प्रशांत किशोर यांच्या काम करण्याच्या पद्धितीवर अनेकांनी आक्षेप नोंदवले आहेत. प्रशांत किशोर यांचे काम स्ट्रॅटेजी बनवण्याचं आहे मात्र अगदी उमेदवार निवडीपर्यंत त्यांचा हस्तक्षेप असतो. आणि पक्षाच्या उमेदवारी निवडीत जेव्हा एकदा बाहेरचा व्यक्ती हस्तक्षेप करतो तेव्हा पक्षाशी एकनिष्ठ राहणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये असंतोष पसरतो. तृणमूल मध्ये सध्या तेच झालंय.

प्रशांत किशोर यांची राजकीय आकांक्षा– प्रशांत किशोर यांना नुसतं आपलं काम करून आपला काय  आहे ते कॉन्ट्रॅक्ट पूर्ण करून शांत बसायचं नसतंय. त्यांची राजकीय महत्वकांक्षा असल्याचंही निरीक्षण राजकीय जाणकार नोंदवतात. प्रशांत किशोर यांनी नितीश कुमार यांच्या जनता दलात पदही घेतलं होतं. पण त्यांच्या या राजकीय आकांक्षा पचवून घेण्यास पक्षांची तयारी नसते आणि वेळ बघून प्रशांत किशोर यांना बरोबर त्यांची जागा दाखवून देतात. त्यात भाऊंना हलका फुलकं पद देऊनही भागात नाही. त्यांना सरळ पक्षात २नंबरच पद पाहिजे असतंय. जनता दल (युनाइटेड)मध्ये पण तेच झालं आणि तृणमूलमध्ये पण तेच होतं आहे हे सांगण्यात येतंय.

राजकारण बुद्धीबळाचा खेळापेक्षाही जास्त असतंय– प्रशांत किशोर यांची स्ट्रॅटेजी ही रेडिमेड प्यादे एक पक्षातून दुसऱ्या पक्षात आणणे यावरचं जास्त अवलंबून असते असं जाणकार सांगतात. मात्र पक्षाचा व्यापक जनाधार वाढवण्याचा प्रश्न येतो तेव्हा त्यांची रणनीती फेल होते असं सांगितलं जातं.

प्रशांत किशोर यांचे जवळपास सगळ्याच पक्षांशी दुरावलेला संबंध- अखिलेश यादव प्रशांत किशोर यांनी जबरदस्तीने काँग्रेसशी युती करायला लावली होते म्हणून नाराज आहेत तर काँग्रेस UPA मध्ये फूट पाडली म्हणून प्रशांत किशोर यांच्यावर नाराज आहेत. तसाच किस्सा भाजप, जनता दल यांच्याबरोबर पण आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी यांना पण प्रशांत किशोर हे त्यांच्या राष्ट्रीय पातळीवरील महत्वकांक्षांसाठी आता अडथळा ठरू लागले आहेत. तसेच शरद पवारांसारखे नेते प्रशांत किशोरांतर्फे बोलणी करायला सरळ नकार देत आहेत.

त्यामुळं प्रशांत किशोर यांचे ग्रह फिरल्याचं सांगितलं जातंय. तुम्हाला या बाबतीत काय वाटतं हे खाली कंमेंट करून जरूर सांगा.

 

 

1 Comment
  1. kiran says

    Graha vagare kahi nast.nisarganpramane sarv ht swabhav koncha badlat nasto

Leave A Reply

Your email address will not be published.