G-23 नेत्यांना दाखवून दिलं, अजून आपणच बॉस आहे !

कॉंग्रेस पक्षाला राष्ट्रीय अध्यक्ष मिळेना म्हणून जिकडेतिकडे चर्चा चालू असतात मात्र यावर खुद्द कॉंग्रेसचे सद्याचे नेतृत्व सांभाळत असलेले राहुल गांधी देखील या बाबी वर बोलण्यास नेहेमीच टाळाटाळ करत असतात. आणि सोनिया गांधी देखील यावर उत्तर द्यायचं टाळतात.

शंभर वर्षांहून अधिक जुन्या राष्ट्रीय स्तरावरील पक्षासाठी भारतात अध्यक्ष नियुक्त करता येत नाही, राजकीय वर्तुळात अशी चर्चा नेहेमीच केली जात असायची. इतकच नाही तर राष्ट्रीय अध्यक्षांच्या नियुक्तीची बाब आता सामान्य लोकांच्या चर्चेचा भागही बनलेली आहे.

पण आता त्या चर्चेला आता पूर्णविराम लागणार आहे.

कारण आजच दिल्लीत काँग्रेस कार्यकारिणीची बैठक झाली आणि या बैठकीत एक मोठी घोषणा सोनिया गांधी यांनी केली आहे.

या बैठकीला पक्षाचे सर्व मोठे नेते उपस्थित होते. सुरुवातीच्या भाषणातच सोनिया गांधींनी बैठकीत पक्षाची रणनीती आणि संघटनेवर चर्चा करण्यापूर्वी टीकाकारांना उत्तर दिले. सोनिया गांधींनी पक्षाच्या G-२३  नेत्यांना स्पष्ट संदेश दिला आहे की, त्याच पक्षाच्या पूर्णवेळ अध्यक्षा आहेत. आणि याबद्दल  माध्यमांद्वारे त्यांच्याशी बोलण्याची गरज नाही असंही त्या म्हणाल्या.

काही वृत्तसंस्थांच्या अहवालानुसार, सोनिया गांधींनी म्हटले आहे की पक्षीय संघटनाच्या मनात देखील हीच प्रबळइच्छा आहे कि, काँग्रेसने पुन्हा उभे राहावे, परंतु जर पुन्हा उभं राहायचं असेल तर त्यासाठी एकता आणि पक्षीय हित सर्वांत वर म्हणजेच प्राथमिक स्तरावर ठेवणे आवश्यक आहे. त्याहूनही स्वतःवर नियंत्रण ठेवण्याची आणि शिस्त पाळण्याची गरज आहे.

विधानसभा निवडणुकीची तयारी देखील कधीच सुरू झाली आहे. आमच्या समोर अनेक आव्हाने आहेत, यात शंका नाही, पण जर आपण एकजूटीने राहिलोत, जर आपण शिस्तबद्ध राहिलोत आणि केवळ पक्षाच्या हितावर लक्ष केंद्रित केले तर मला खात्री आहे की आपण नक्कीच काही तरी चांगले करू.

सोनिया गांधींनी पूर्णवेळ, व्यावहारिक पक्षाध्यक्ष म्हणून आपली भूमिका स्पष्ट केली.

त्यांनी काँग्रेसच्या पूर्णवेळ अध्यक्ष निवडीसाठी लवकरच पूर्ण संघटनात्मक निवडणुका होणार आहेत पण सद्या तरी मीच अधिकृत अध्यक्ष असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

अध्यक्षच्या प्रश्नावर सोनिया म्हणाल्या की, आम्ही ३० जूनपर्यंत काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक निश्‍चित करण्यासाठी एक रोडमॅप केंव्हाच तयार केला होता, परंतु कोरोना संसर्गामुळे हि निवडणूक पुढे ढकलली आहे.

दुसरीकडे, जी -२३ नेते गुलाम नबी आझाद म्हणाले की, आम्हाला सोनिया गांधींवर पूर्ण विश्वास आहे. सीडब्ल्यूसीच्या बैठकीत गुलाम नबी आझाद म्हणाले की, कोणीही सोनिया गांधींच्या नेतृत्वावर प्रश्न विचारत नाही आणि विचारले जाऊ नये. अलीकडेच काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद आणि कपिल सिब्बल यांनी सीडब्ल्यूसीची बैठक घेण्याची मागणी केली होती आणि मग हि बैठक झाली.

तसेच या बैठकीत सोनिया गांधी यांनी युवक काँग्रेस आणि कार्यकर्त्यांचे कौतुक केले. सोनिया गांधी म्हणाल्या की, गेल्या दोन वर्षात आमच्या सहकाऱ्यांनी, विशेषत: तरुणांनी मोठ्या संख्येने पक्षाची धोरणे आणि कार्यक्रम राबवले.  शेतकऱ्यांची चळवळ असो, साथीच्या काळात दिलासा देण्याची मोहीम असो किंवा मुद्दे अधोरेखित करणे असो. असे सगळेच कार्यक्रम कार्यकर्त्यांनी राबविले लोकांपर्यंत कॉंग्रेस आणि विचार पोहोचवण्याची महत्वाची  भूमिका बजावली आहे.

आता सोनिया यांनी घोषित तर केलेय कि, त्याचं सद्याच्या पूर्णवेळ अध्यक्ष आहेत. त्यांनी जाहीर केल्याप्रमाणे अन तसेच एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, काँग्रेस अध्यक्षांची निवड सप्टेंबर २०२२ मध्ये होऊ शकते.

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.