भाजपच्या बंडखोरांना कॉंग्रेसमध्ये आल्यावर अध्यक्षपद दिले जाते, या मागे कोणतं राजकारण आहे?

पंजाब कॉंग्रेसमध्ये महिनाभर चाललेल्या राजकीय उलाथापालथीमुळे नवज्योतसिंग सिद्धू यांनी अलीकडेच पंजाब प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला आहे. सिद्धू यांनी कॉंग्रेसमध्ये पक्षात प्रवेश करून फक्त चारच वर्षे झालीत पण त्यापूर्वी ते एका दशकाहून अधिक काळ भाजपाचे सदस्य होते.

कॉंग्रेसचे जुने आणि अनुभवी नेते याच विचारसरणीवर अजूनही विसंबून आहेत की, आपली कॉंग्रेसी  विचारसरणी आणि पक्षनिष्ठा हाच त्यांचा आधार आहे. पण आता राहुल गांधी यांना आता या निष्ठेचं  फारसं महत्त्व राहिलं नाही त्यांना आता पक्षाचं भविष्य बघायचं ज्या साठी ते इतर पक्षातील बंडखोरांना आपल्या पक्षात तर घेतच आहेत वरून त्यांना महत्वाचे पदही देऊ करत आहेत.

याचे उदाहरण म्हणजे राहुल यांनी एके काळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे एबीव्हीपीचे कार्यकर्ते असलेले रेवंत रेड्डी यांना तेलंगाना कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बनवल्यानंतर त्याच्या काही दिवसानंतर भाजपचे माजी खासदार सिद्धू यांनीही पंजाब कॉंग्रेसचे अध्यक्ष म्हणून नेमलं आहे.

महाराष्ट्रातलं पहायचं झालं तर, नाना पटोले यांनी २०१८ मध्ये भाजपमधून कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर अगदी तीनच वर्षांनंतर त्यांना फेब्रुवारी २०२१ मध्ये महाराष्ट्राचं प्रदेशाध्यक्ष केलं गेलं.

खरं तर नाना पटोले यांनी १९९० मध्ये कॉंग्रेसबरोबरच आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरूवात केली होती, परंतु मध्ये दोनदा त्यांनी पक्ष सोडला.  २००९ ते २०१८ या काळात ते भाजपसमवेत होते. या व्यतिरिक्त त्यांनी स्वतंत्र राजकीय नेते म्हणून राजकीय कारकिर्दीचा एक काळ त्यांनी घालवला.

कॉंग्रेस पक्षामधील महत्त्वाच्या पदांवर दलबदलू लोकांना बसविण्याच्या या ट्रेंडने पक्षाच्या नेत्यांना मात्र चांगलाच घाम फुटलाय.

उदाहरणार्थ, पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग जे सिद्धू यांच्यामुळे पक्षातील आपल्या वर्चस्वासाठी लढा देत आहेत. ते उघड म्हणतात कि, पक्षासाठी ज्यांनी इतकी वर्षे दिलेत त्यांना डावलून, काहीच वर्षांपूर्वी ज्यांनी पक्षात प्रवेश केला त्यांच्यासाठी कॉंग्रेसने त्यांना इतक्या महत्वाच्या पदासाठी विचार केला हे जरा आश्चर्यकारकच आहे.

कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सांगितल्या प्रमाणे, पटोले आणि रेड्डी यांना पार्टी हाय कमांडच्या मंजूरीचा शिक्काच मिळाला आहे.

कॉंग्रेसच्या नेत्यांनी म्हणजेच राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची अशा पदोन्नतीला मंजुरी असल्यामुळे आता हे तर स्पष्टच झाले आहे कि आता त्यावर कोणीही प्रश्न करू शकत नाही.

गांधी भावंडांनी घेतलेला निर्णय आता अंतिम आणि निर्विवाद असेल असा संदेशच कॉंग्रेसचे काही वरिष्ठ नेते देत आहेत.

वर नमूद केलेल्या तीन राज्यांपैकी कॉंग्रेस सध्या पंजाब आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारमधील युतीच्या सहाय्याने सत्तेत आहे. कॉंग्रेसकडे महाविकास आघाडीमध्ये सर्वात कमी जागा आहेत.  महाराष्ट्र विधानसभेतल्या आघाडीच्या १४७ जागांपैकी फक्त ४४ जागा कॉंग्रेसच्या आहेत.

तर तेलंगानामध्ये १२० सदस्यीय विधानसभेमध्ये कॉंग्रेसच्या फक्त ६ जागा आहेत.

असे म्हणले जातेय कि, रेवंत रेड्डी यांनी राहुल गांधींच्या जवळच्या सहकाऱ्यांशी घनिष्ठ संबंध वाढवले आणि राहुल गांधींच्या नजरेत स्वतःला योग्य दाखवलं आहे. सिद्धू यांनीही राहुल गांधींना भेटल्यानंतरच कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. पटोले हेदेखील राहुल गांधींचे निकटवर्तीय मानले जातात.

अशा दलबदलू नेत्यांची पदोन्नती म्हणजे भाजपाशी लढण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकाचे कॉंग्रेसमध्ये  स्वागत होणं हे राहुल गांधींच्या रणनीतीचा एक भाग आहे.

गेल्या आठवड्यात कॉंग्रेसच्या सोशल मीडिया टीमच्या बैठकीत बोलताना राहुल यांनी ‘संघाला घाबरू  नये म्हणून भाष्य केले. जो कोणी संघाला घाबरत असेल तो कॉंग्रेस पक्ष सोडून जाऊ शकतो, आणि ज्या लोकांना भाजपा आणि आरएसएसशी लढा द्यायचा असेल त्यांचं कॉंग्रेस मध्ये स्वागत आहे.
महाराष्ट्र कॉंग्रेसच्या एका नेत्याने सांगितले की, “पटोले यांनी २०१८ मध्ये भाजप पक्ष सोडला आणि आपली खासदारकीही सोडली. त्यांच्यासाठी हे करणे आणि कॉंग्रेसची निवड करण्याला कॉंग्रेसने  खुल्या मनाने स्वागत केले आहे.
ज्या वेळी जेव्हा कॉंग्रेसचे नेते मोठ्या संख्येने भाजपमध्ये जाण्यासाठी पक्ष सोडत होते, त्यावेळी पाटोले  भाजप सोडून कॉंग्रेसमध्ये सामील झालेत हि मोठी गोष्ट होती. 

पंजाबमध्ये पक्षाचे काही सदस्य अमरिंदर सिंग यांना फारसे पसंद करीत नसतील तरी ते सिद्धू यांच्या प्रगतीवर नाराज असल्याचे मानलं जातंय.

तिकडे तेलंगाना मध्ये कॉंग्रेसच्या नव्या अध्यक्षपदी रेवंत रेड्डी यांची नियुक्ती झाली आणि राज्यात अनेक प्रश्न निर्माण झाले. एबीव्हीपी चे कार्यकर्ते असलेल्या रेवंत रेड्डी यांना इतकं मोठं पद देण्यामागे राहुल गांधी यांनी त्यांची स्पेशल रणनीती अवलंबवली आहे. रेड्डी यांनी त्यांच्या राज्यात मोठी लोकप्रियता मिळवली आहे. तरुणाई गटात त्यांचे आकर्षण, त्यांची राजकारणातील आक्रमक शैली आणि पॉलीटिकल रेकॉर्ड याच कारणामुळे त्यांची नियुक्ती केल्याचे म्हंटले जात आहे.

शेवटी हि रणनीती कोणत्याही पक्षात अंमलात आणणं सामान्य गोष्ट आहे, आता हेच कॉंग्रेसमध्ये चालू आहे तर त्याचे नवल वाटायला नको. भाजपप्रमाणेच कॉंग्रेस देखील आता विरोधी पक्षातील बंडखोरांना एकत्रित करून आपल्या पक्षात घेत आहे आणि महत्वाची पदे देऊ करत आहेत.

हे हि वाच भिडू : 

Leave A Reply

Your email address will not be published.