पुण्याच्या गणेश बिडकरांनी ५०० हून अधिक रुग्णांना बेड मिळवून दिलेत

तुम्ही लोकप्रतिनिधी असाल आणि खरच तुम्हाला जाणीव असेल व त्या जाणिवेतून तुम्ही ५०० हून अधिक लोकांना मदत केली असेल तर ती चांगली गोष्ट झाली. पण महत्वाचा मुद्दा हा की या ५०० हून अधिक लोकांच्यात सर्वांधिक लोक हे रिक्षाचालक, सफाईकामगार, कष्टकरी, हमाल काम करणारे, घरकाम करणारे असतील तर ती गोष्ट अधिक चांगली म्हणावी लागले.

पुण्याचे दोन भाग पडतात. एक नदीच्या अलीकडचा व दूसरा नदीच्या पलीकडचा. नदीच्या पलीकडचं पुणे म्हणजे मागावून वसलेलं दगडी बंगल्यांच आखीव रेखीव पुणे. पूर्वीचं पुणे म्हणजे नदीच्या अलीकडचं पेठांच पुणे.

या पेठांच्या पुण्यात पण जशा पेठा बदलतात तस कल्चर बदलतं. सदाशिव पेठ हा पांढरपेशी, उच्चभ्रू लोकांचा भाग, नवी पेठ हा त्यानंतर मागाहून आलेल्या लोकांचा भाग. 

याच पेठांमधला रास्ता पेठ, कसबा पेठ, मंगळवार पेठ, सोमवार पेठ म्हणजे अगदी गावठाणाचा भाग. छोटे रस्ते, दाट लोकवस्ती. कामगार, कष्टकरी लोकांची वसाहत म्हणजे हा भाग अशा भागात कोरोना काळात काम करणं हाच एक मोठ्ठा टास्कचं काम.

पण गणेश बिडकरांनी इथल्या भागात नियोजन लावून काम केलं, हे नियोजन कसं होतं आणि ते का महत्वाच आहे हे सांगणाराच हा लेख. 

कोरोना रुग्णांना बेड मिळवून देण्यासाठी उभारलेलं मॉडेल, रुग्णवाहिकांपासून ते इतर वैद्यकिय सेवांसाठी उभारलेलं मॉडेल इथपासून ते कष्टकरी, मजूर लोकांचे लॉकडाऊनमुळे झालेले आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी केलेली मदत ते महानगरपालिकने खुल्या पद्धतीने लसी विकत घेण्यासाठी टेंडर काढावे यासाठी देशात पहिल्यांदा केलेली मागणी इथपासून ते बिघडलेले व्हेंटिलेटर दुरूस्त करुन लोकांच्यासाठी उपलब्ध करुन देण्यासाठी केलेली कामगिरी अशा अनेक गोष्टी गणेश बीडकरांनी तडीस नेल्या आहेत.

गणेश बिडकरांनी कोरोना लढाईसाठी वापरलेलं मॉडेल नेमकं काय आहे..

कोरोनाच्या पहिल्या लाटेतच गणेश बिडकर यांनी सोमवार पेठेतील कार्यालय कोव्हिड मदत केंद्रात रुपांतरीत केलं. पक्ष कार्यालयांचे कोव्हिड मदत केंद्रात रुपांतर केल्यानंतर ते २४ तास सुरू राहील याकडे लक्ष देण्यात आले. त्यासाठी कार्यकर्त्यांची एक टिम आळीपाळीने इथे थांबू लागली.

याचा महत्वाचा उद्देश हा की रात्री-अपरात्री देखील कोणी मदत मागण्यासाठी आला तर त्याची गैरसोय होवू नये. 

कोरोना काळात प्रभागातील नागरिकांचे काम करण्यासाठी गणेश बिडकर यांचे ५० कार्यकर्ते तळ ठोकून होते. त्यासाठी प्रत्येकांनी ५-५ जणांना ग्रुप तयार केला. सोमवार पेठेतील चार गल्ल्या एका ग्रुपने तर मंगळवार पेठ, रास्ता पेठ अशा ठिकाणी इतर ग्रुप असे नियोजन करण्यात आले. त्याचा फायदा काय झाला तर लोकांसोबत थेट संपर्क करणं सोप्प होवून गेलं.

मदत कोण करणार, त्याचा फॉलोअप कोण घेणार, कोणता व्यक्ती कोणाला फोन करणार ही पद्धत झाल्यानंतर दूसरीकडे रुग्णांना बेड मिळवून देण्यासाठीचं नियोजन आखण्यात आलं.

रुग्णांना बेड कसा मिळवून दिला जातो

मदत केंद्रावर गेल्यावर त्या भागात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा मोबाईल नंबर देण्यात येतो. एम्बुलंस पासून ते हॉस्पिटल मध्ये बेड मिळवून देण्याचे काम मग संबधित कार्यकर्ता करतात.  

खासगी रुग्णालयात बेड मॅनेजमेंट करणारे आणि बिडकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये समन्वय तयार करण्यात आला.

ज्यावेळी प्रभागातील कोरोना रुग्णाला हॉस्पिटलची गरज लागते. त्यावेळी कार्यकर्ते थेट हॉस्पीटला फोन करून बेड उपलब्धते बाबत माहिती मिळवतात. तसेच महापालिकेच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या हेल्प लाईनशी बोलून सरकारी-खासगी रुग्णालयात बेड उपलब्ध आहे का याची माहिती घेवून संबधित कोरोना बाधीताला हॉस्पिटल मध्ये भर्ती केले जाते.

गणेश बिडकर यांनी उभारलेली ही व्यवस्था कशी आहे याची नेमकी माहिती घेण्यासाठी आम्ही कसबा पेठेत राहणाऱ्या मनोज शेडगे यांना फोन केला.

ते बोलभिडू सोबत बोलताना म्हणाले, 

“माझ्या भावाच्या कुटूंबातील सर्वजण कोरोना पॉझिटिव्ह आले होते. सर्वांची तब्येत व्यवस्थित होती मात्र सासरे वयोवृद्ध असल्याने त्यांची काळजी वाटत होती. आम्ही त्यांना नायडू हॉस्पिटलमध्ये घेवून गेलो. तिथे त्यांचा ऑक्सिजन ७० पर्यन्त खाली आल्याचं समजलं.

भावाच्या सासऱ्यांना ॲडमीट करणं गरजेचं होतं, पण बेड शिल्लक नसल्याचं नायडू हॉस्पीटलने सांगितलं. आम्ही लागलीच महानगरपालिकेच्या हेल्पलाईनवर संपर्क केला. मात्र तिथूनही बेड शिल्लक नसल्याची माहिती मिळाली. ॲडमीट करण्याची गरज होती, कदाचित व्हेंटिलेटर देखील लावावा लागणार होता, पण बेडच शिल्लक नव्हते.

अशा वेळी  गणेश बिडकर यांच्या कार्यालयाचा पत्ता देण्यात आला. आम्ही थेट कार्यालय गाठले आणि तिथे असणाऱ्या कार्यकर्त्यांना परिस्थिती सांगितली. पुढच्या तासाभरात आम्हाला नवले हॉस्पीटलमध्ये पेशंटला घेवून येण्यास सांगितले.

काही दिवस उपचार झाले आणि आमच्या भावाचे सासरे सुखरूप घरी आले.”

ही झाली रुग्णाला बेड मिळवून देण्यासाठी उभारलेली सिस्टीम,

पण दूसरीकडे गणेश बिडकर महानगरपालिकेच्या माध्यमातून देखील सक्रिय राहिले.

गणेश बिडकर हे पुणे महानगरपालिकेचे सभागृह नेते आहेत. एकीकडे रुग्णांना बेड मिळवून देण्यासंबधीत सिस्टीम उभा केल्याने त्यांना नियोजनात असणाऱ्या नेमक्या मर्यादा समजत होत्या. हे प्रश्न तातडीने सोडवणं हा उद्देश ठेवण्यात आला.

उदाहरणार्थ लोकांना व्हेटिलेटर बेड हवेत पण ते मिळत नाही याची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ त्यांनी व्हेटिंलेटर बेडच्या संदर्भातून माहिती घेण्यास सुरवात केली. ससून रुग्णालयात २५ व्हेंटिलेटर असून ते धूळखात पडले आहेत अशी माहिती त्यांना मिळाली. तेव्हा त्यांनी प्रयत्न करुन त्यातील २१ व्हेंटिलेटर दुरूस्त करुन घेतले.

ग्लोबल टेंडरची संकल्पना त्यांनीच प्रथम मांडली त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र पाठवून महानगरपालिकेला ग्लोबल टेंडर काढण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली होती.

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.