त्रिनिदादच्या बेटांवर गावसकरांचा पोवाडा गायला जातो

ते ठिकाय पण हे त्रिनिदाद कुठय. कसय काही भिडू लोकांचा भुगोल कच्चा असण्याची शक्यता आहे. ज्यांना त्रिनिदाद बद्दल सगळं माहित आहे त्यांनी थेट निम्म्यातून वाचायला सुरवात केली तरी चालेल.

ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी आपण लेखात थोडं पाणी ओतण्याचं काम करू. 

त्रिनिदाद म्हणजे आपली तीच वेस्ट इंडिजची टिम. कॅरेबियन बेटांचा समूह हाच वेस्ट इंडिजची टिम म्हणून ओळखला जातो. छोट्या छोट्या देशांनी एकत्र ऐवून क्रिकेटची टिम बांधली. आत्ता इथंल दूसरं वैशिष्ट म्हणजे इथे मुबलक प्रमाणात इंडियन लोक भेटतात.

आत्ता हे इंडियनच म्हणून तूम्ही त्यांना मग तूम्ही कुठलं कोल्हापूरचं की लातूरचं असा संवाद साधायला गेला तर घोळ होवू शकतो. कारण कुठल्यातरी भारीतल्या IIT मधून पास होवून आयटी कर्मचारी म्हणून इथे नोकरीला हे लोक गेले नाहीत.

हे स्थलांतर १८४५ पासून सुरू झालेल्या. त्या काळात भारतातला दूष्काळ, पैसे मिळवण्याची गरज म्हणून मोठ्या प्रमाणात उत्तर भारतातून मजूर इथे गेले. कालांतराने त्यांची आडनाव फक्त इंडियन राहिली. म्हणूनच वेस्ट इंडिजच्या टिममध्ये अनेक भारतीय नाव आणि आडनाव असणारी माणसं दिसतात.

आत्ता किस्सा गावसकरांचा.

सुनिल गावसकरांची लेजेण्ड्री, कॅरेबियन बेटांच क्रिकेट प्रेम यात वेळ घालवायला नको. आपण थेट मुद्यावर येवू. तर झालेलं अस की तेव्हा भारताचे पंतप्रधान म्हणून अटल बिहारी वाजपेयी होते. परराष्ट्र संबध सुधारण्याच्या हेतूने वेगवेगळ्या देशांमध्ये दौरे आखले जात असत.

असाच दौरा ८ व ९ फेब्रुवारी १९९९ रोजी अटल बिहारी वाजपेयीं यांनी आखला होता. या तारखांना ते त्रिनिनादमध्ये असणार होते. त्रिनिनादचे तत्कालिन पंतप्रधान वासुदेव पांडे यांनी अटल बिहारींचा पाहूणचार करण्यात कोणतीच कमतरता जाणवू दिली नव्हती.

झालं अस की वाजपेयींसाठी खास रात्रीची पार्टी आयोजित करण्यात आली होती. तीन दशकांनंतर भारतीय पंतप्रधान इथे त्रिनिदादमध्ये आल्याने लोकांच्यात देखील उत्साहाच वातावरण होतं. समोर भारताचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि त्यांच्या शेजारी त्रिनिदादचे पंतप्रधान वासुदेव पांडे बसले आहेत. सोबत इतर मान्यवर आणि समोर एक-एक स्थानिक व्यक्ती येवून आपल्या देशाचे सांस्कृतीक कार्यक्रम सादर करत आहे अस एकंदरित चित्र होतं.

या दरम्यान एक त्रिनिदादचे शिघ्रकवी समोर आले, त्यांनी आपल्या लहेजात पोवाडा गाण्यास सुरवात केली. त्या पोवाड्याची सुरवात होती,

वी डोन्ट वॉन्ट गावस्कर, ॲट ऑल ॲज ही इज ए वॉल

संपूर्ण पोवाडा गावस्करांच्या पराक्रमांनी आणि वेस्ट इंडिजला वाटणाऱ्या गावस्करांची भितीने भरलेला होता.

कॅरेबियन लोकांच्या जगण्यात संगीत महत्वाचं राहिलं आहे, आणि यामध्ये गावस्करांच्या खेळाची दहशत अनेकदा वर्णन केलेली असते. गावसकरांसोबत भारतीय क्रिकेट प्लेअर्स व वेस्टइंडिजबरोबरच्या लढतींची वर्णन देखील पोवाड्याच्या स्वरूपात गायली जातात. त्याचसोबत भारतीय संगीत व स्थानिक भाषेतील संगीत यांच्या मिश्रणातून चटणी संगीत ही एक वेगळीच कलाकृती देखील तिथे अविष्कारास आली आहे.

हा किस्सा जेष्ठ पत्रकार राजेंद्र दर्डा यांनी १९९९ साली लिहलेल्या लेखात सांगितला आहे.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.