गूगलचं ऑफिसपण पुण्यात आलंय, आता महाराष्ट्र आयटी क्षेत्रात टॉप मारेल का?

करोना लॉकडाऊनमध्ये इतर सगळे उद्योग थंडावले असताना IT उद्योगाची घोडदौड मात्र जोरात चालू होती. तुमच्या IT मधल्या मित्रांच्या वाढलेल्या पगारावरून तरी तुम्हाला कळलंच असेल.

आता फॅक्टस् मध्ये सांगायचे म्हटल्यास सौदी अरेबियन जेवढं तेल निर्यात केलंय त्यापेक्षा जास्त भारतानं सॉफ्टवेअर संबंधित सर्विस निर्यात केल्यात.

 सौदी अरेबियाने यावर्षी ११३ बिलियन डॉलरचे तेल निर्यात केले, तर भारताने १३३ बिलियन डॉलरचे सॉफ्टवेअर.

‘डेटा इज न्यू ऑइल’ म्हणतात त्याचं प्रत्यक्ष उदाहरण भारताच्या या कामिगिरीवरून दिसतंय. भारताच्या ITक्षेत्रातल्या चढत्या आलेखामुळे या क्षेत्रातल्या नोकऱ्या देखील वाढल्यात. पण ही वाढ काही राज्यांपुरतीच मर्यादित आहे. म्हणजे कोणती राज्य सगळ्यात जास्त IT सर्विसेस एक्स्पोर्ट करतात यांचा क्रम लावल्यास कर्नाटक, तेलंगणा आणि महाराष्ट्र यांचा क्रमांक लागतो. मग बाकीची राज्य यांच्यापेक्षा बरीच मागं आहेत. 

आता या राज्यात पण सगळीकडे  IT कंपन्या पसरलेल्या नाहीयेत. बंगलोर, हैद्राबाद, चेन्नई, पुणे आणि मुंबई जवळपास या पाच शहरांत सगळी IT  इंडस्ट्री सामावलेली आहे.

 त्यामुळं पहिल्या पाच मध्ये दोन शहरं असणाऱ्या महाराष्ट्राला IT क्षेत्रात टॉप करण्याची संधी असते असं जाणकार सांगतात. 

विशेषतः मुंबई पुणे या दोन शहरांमधील कमी अंतर पाहता त्यांचा ‘ट्वीन सॉफ्टवेअर सिटीझ’ म्हणून विकास करण्यास अजून स्कोप असल्याचं तज्ञांचं म्हणणं आहे. त्यासाठी काही बाबातींवर महाराष्ट्राला काम करावा लागेल असं सांगण्यात येतं.

पुण्याला अजून स्वतःच विमानतळ नाहीये तर मुंबई विमानतळावरील भार हलका करण्यासाठी जे नवी मुंबई विमानतळ बांधण्यात येणार आहे त्याचही बांधकाम अजून झालेलं नाहीये. 

मुंबई-पुणे यांच्यातील प्रवासाचा वेळ अजून कमी करण्यासाठी हायपरलूप सारखे प्रोजेक्ट ज्यामुळं मुंबई ते पुणे हे अंतर २५ मिनटांपर्यंत कमी होईल असं सांगण्यात आला होतं ते लवकरात लवकर पूर्ण करणे गरजेचे आहे.याचबरोबर स्टार्ट-अप इकोसिस्टिम डेव्हलप करण्यासाठी ही विशेष प्रयत्नांची गरज  आहे. सगळ्यात जास्त स्टार्ट-अप मध्ये ही बंगलोरचं भारतात टॉपला आहे.  

आता एवढा सगळं ऐकल्यानांतर महाराष्ट्र्र लैच मागं असल्याचा विचार करू नका. आपल्या शहरात उत्कृष्ट शैक्षणिक आणि संशोधन संस्था आहेत. मोठ्या मॅनुफॅक्चुरिन्ग कंपन्या, सॉफ्टवेअर आणि आयटी कंपन्या स्टार्ट-अप इकोसिस्टमसाठी महत्वाच्या आहेत.पुण्यासारख्या शहरात भारतातील काही मोठ्या शहरांच्या तुलनेत शहरामध्ये वर्षभर उत्कृष्ट हवामान आणि जीवनमान आहे.त्यामुळं महाराष्ट्राला स्कोप  आहे. अनेक कंपन्या आजही महाराष्ट्राला पसंती देतात.

पुण्यात येऊ घातलेलं गुगलच नवीन ऑफिस याचंच एक प्रतीक आहे. मुंबई, गुडगाव, बंगलोर आणि हैदराबाद यानंतर आता पुण्यात गुगल ऑफिस उघडतंय. गुगलच्या क्लाउड कॉम्पुटिंग विभागाचं हे ऑफिस २०२२च्या उत्तरार्धारत चालू होईल असं कंपनीकडून सांगण्यात येतंय.

आमच्या क्लाउड कॉम्पुटिंगच्या भारतातल्या विस्तारासाठी पुण्यामध्ये आम्हला चांगला टॅलेंट मिळेल असं  गुगलनं म्हटलंय. 

बाकी आता तुम्ही या क्षेत्राशी संबंधित असाल तर नोकरीची अजून एक नवीन संधी म्हणून तुम्ही याकडं पाहू शकतात. बाकी याचा महाराष्ट्राला किती फायदा होईल हे बाकी येणाऱ्या वर्षातच कळेल.

हे हि वाच भिडू :

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.