हॉलिवूडचे पिक्चर बघून हुशार बनला, पण डोकं बायको आणि गर्लफ्रेंडचा खून करण्यात वापरलं…

आरोपी शोधण्यासाठी पोलिसांकडून नवीन तंत्रज्ञनाचा उपयोग होत आहे. तर दुसरीकडे आरोपी सुद्धा पोलीस यंत्रणा कुठल्या पद्धतीने काम करते याचा विचार करून काम करत आहेत. गुन्हेगारांना वाटत की, आपण गुन्हा करताना काळजी घेतोय त्यामुळे आपण सापडणार नाही. मात्र आरोपी गुन्हा करताना एखादी अशी चूक करतो की, तो शेवटी पोलिसांना सापडतोच.

या प्रकरणात तर आरोपीने हॉलिवूडच्या थ्रिलर पिक्चरची स्क्रिप्ट सुद्धा फिकी पडेल, असं डोकं लावलं होतं. आरोपीने काही महिन्यांआधी बायकोचा खून केला हे कोणाला समजले सुद्धा नाही. यानंतर पुन्हा एकदा त्याने हा प्रयोग केला. यावेळी सुद्धा त्याने कुठलाच पुरावा ठेवला नव्हता. प्रत्येकवेळी गुन्हा करून आपण सही सलामत बाहेर पडू असे त्याला वाटले होते. मात्र शेवटी तो पोलिसांच्या हाती लागला आणि त्याला जेलची हवा खावी लागली.

तर ही गोष्ट आहे पटियाला येथील नवनिंदरप्रीत पाल सिंह याची

दोन वर्षांपूर्वी बायकोचा मृत्यू झाल्याने नवनिंदरप्रीतने लग्न करण्याचा निर्णय घेतला. छपिंदरपाल कौर या तरुणीसोबत त्याचा विवाह ठरला होता. शॉपिंग करायची आहे म्हणून त्याने होणारी पत्नी छपिंदरपालला भठिंडावरून पटियाला येथे ११ ऑक्टोबर रोजी बोलावून घेतले होते. 

 दोघांनी मिळून शॉपिंग केली. मात्र १३ तारखेनंतर छपिंदरपालने घरी फोनच केला नाही. यामुळे तिच्या घरचे काळजीत पडले होते. तिच्या वडिलांनी फोन केल्यानंतर तो फोन नवनिंदरप्रीत म्हणजेच तिच्या होणाऱ्या नवऱ्याने उचलला. त्याने मुलीच्या वडिलांना सांगितले की, १४ तारखेला शॉपिंग दरम्यान त्या दोघात भांडणे झाली आणि ती इथेच मोबाईल टाकून निघून गेली. 

यानंतर छपिंदरपाल घरी न आल्याने १५ ऑक्टोबर तिचे वडील पटियाला येथे आले. नवनिंदरप्रीत याने त्यांना बरोबर उत्तरे दिली नाही. त्यामुळे शेवट तिच्या वडिलांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दिली. 

नवनिंदरप्रीत पोलिसांना सुद्धा उडवाउडवीचे उत्तरे देऊ लागला होता. 

तसेच त्याने छपिंदरपाल पासून पहिल्या लग्नाची गोष्ट लपवली होती. तसेच साखरपुड्यानंतर नवनिंदरप्रीत तिच्याशी लग्न करण्याचे टाळू लागला होता. यामुळे पोलिसांचा संशय वाढला त्यामुळे नवनिंदरप्रीतला पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्याची अख्खी कुंडलीच बाहेर काढली. 

नवनिंदरप्रीतने आपण छपिंदरपालचा खुन केल्याचे मान्य केले. मात्र त्याची खून करण्याची पद्धत पाहून पोलीस सुद्धा हैराण झाले होते. त्याने होणाऱ्या बायकोला नायट्रोजन गॅस देऊन खून केला होता आणि त्यानंतर तिचे शरीर घरातच पुरले होते. 

अशा प्रकारे खून केल्यामुळे आपण कोणालाच सापडणार नाही असा विश्वास त्याला होता. जर गळा दाबला, चाकू वापरला तर पुरावा मागे राहतो. त्यामुळे नवनिंदरप्रीतने शोधलं की कुठल्या प्रकारे खून केला तर पुरावे मागे राहणार नाही. त्यासाठी त्याने हॉलिवूड आणि साऊथचे सस्पेन्स थ्रिलर पिक्चर पाहिले. या पिक्चरमधून त्याला समजले होते की, एखाद्याच्या शरीरात ऑक्सिजनऐवजी नायट्रोजन गॅस सोडला तर त्या व्यक्तीला ऑक्सिजन मिळणार नाही. आणि जेव्हा एखाद्याला ऑक्सिजन मिळत नाही तेव्हा त्याचा नैसर्गिक मृत्यू होतो. 

त्याने नायट्रोजन गॅस देऊन छपिंदरपालला मारण्याचे ठरवले. पण प्रश्न असा होता की, तिच्या शरीरात नायट्रोजन गॅस सोडायचा कसा. त्याला एक कल्पना सुचली. लग्नापूर्वी चेहऱ्यावर चमक येण्यासाठी ऑक्सिजन घ्यावे लागेल असं तिला सांगितलं.

त्याने हुशारीने ऑक्सिजन सिलेंडरमध्ये नायट्रोजन गॅस भरून घरी आणला. नायट्रोजन गॅसने भरलेला सिलेंडर तिच्या समोर ठेवला आणि तिला मास्क घ्यायला लावला. यामुळे काही वेळातच तिचा मृत्यू झाला. यानंतर त्याने तिचे शरीर त्यांचे घरातच खड्डा करून पुरले होते.

नवनिंदरप्रीतने आपल्या बायकोला सुद्धा अशाच प्रकारे नायट्रोजन देऊन मारले होते.

नवनिंदरप्रीतचे १२ फेब्रुवारी २०१८ रोजी सुखदीप कौर हिच्याशी लग्न झाले होते. मात्र लग्नानंतर त्या दोघांमध्ये पटत नव्हते. त्यामुळे १९ सप्टेंबर २०२१ त्याने नायट्रोजन गॅस देऊन आपल्याला बायकोला मारले. यावेळी सुखदीप ही प्रेग्नंट होती. 

ऑक्सिजन दिले तर मुलगा चांगला होईल. त्यानंतर तिने नायट्रोजन गॅस मास्क लावला आणि त्यात तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर त्याने बायकोच्या घरच्यांना सांगितले होते की, हार्टअटॅक आल्याने सुखदीपचा मृत्यू झाला. तिच्या अंगावर जखमेच्या खुणा नव्हत्या आणि रक्तही बाहेर आले नव्हते. त्यामुळेच सुखदीपच्या घरचे शांत होते.   

नवनिंदरप्रीतने होणाऱ्या बायकोला मारले नसते तर सुखदीपचा मृत्यू हार्टअटॅक मुळेच झाला आहे हे सगळ्यांना पटले असते. मात्र एका गुन्ह्यात आपण सही सलामत वाचलो पुढे ही काही होणार नाही असा विश्वास त्याला होता, हाच विश्वास त्याला नडला आणि तो पद्धतशीरपणे सापडला.

हे ही वाच भिडू 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.